डॉक्टर कसे व्हायचे? How to become a Doctor- Step-by-Step गाईड जाणून घ्या!

How to become a doctor– मानवी जीवनामध्ये डॉक्टरची महत्त्वाची भूमिका असते. आपल्याला आजार, इजा किंवा शारीरिक काही त्रास झाल्यास सर्वप्रथम आपण डॉक्टर कडे धावतो. मानवी समाजामध्ये डॉक्टरचे खूप महत्त्व आहे. दैनंदिन दिवसांमध्ये छोट्या छोट्या समस्यांसाठी आपण डॉक्टरकडे जात असतो. डॉक्टरला चिकित्सक या नावाने देखील ओळखले जाते. डॉक्टर हे मानवी उपचार करणारेच नव्हे तर पशु पक्षांचे उपचार करणारे देखील डॉक्टर असतात.

आपण डॉक्टरांना देवाचा दर्जा देत असतो. अधिक तर विद्यार्थ्यांचा स्वप्न असतो की त्यांनी डॉक्टर व्हायचे. हा स्वप्न पूर्ण करण्याकरिता ते रात्रंदिवस मेहनत करतात. डॉक्टर बनण्यासाठी खूप स्पर्धा आणि विद्यार्थ्यांमध्ये होऊ लागलेली असते. परंतु मेहनती विद्यार्थ्यांनाच यश प्राप्त होत असते. दहावीनंतर विद्यार्थ्यांपुढे खूप मोठे आव्हान असते की आपल्याला डॉक्टर व्हायचे आहे तर त्यासाठी काय करावे लागेल. बरेचसे विद्यार्थी मेहनत केल्यानंतरही त्यांना अचूक माहिती न मिळाल्यामुळे डॉक्टर बनण्याचे त्यांचे स्वप्न अपुरे राहतात. या ब्लॉगच्या माध्यमातून आपण बारावी नंतर डॉक्टर कसे व्हायचे How to become a Doctor याबद्दल जाणून घेऊ.

How to become a doctor
How to become a doctor

📖12वी सायन्स नंतर Top Career Options.जाणून घ्या तुमच्यासाठी कुठले बेस्ट!

डॉक्टर कसे बनायचे? How to become a doctor in India?

दहावी नंतर कुठला विषय घ्यायचा मेडिकल या क्षेत्रामध्ये आवड असणारे काही विद्यार्थी आठवीपासूनच फाउंडेशन कोर्सेसच्या माध्यमातून डॉक्टर बनण्याची तयारी सुरू करतात. डॉक्टर बनण्यासाठी फोकस तयारी ही दहावी पास केल्यानंतरच सुरू होते. दहावीनंतर हायर एज्युकेशन मध्ये कुठला विषय निवडाचा हे अत्यंत गरजेचे ठरते. डॉक्टर बनण्याकरिता अकरावी आणि बारावी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर तुम्हाला भौतिकज्ञान, रसायन विज्ञान, इंग्लिश, जीव विज्ञान या विषयांचे निवड करणे गरजेचे ठरते.

डॉक्टर बनण्याकरिता कुठली परीक्षा देण्याची गरज असते? Which exam is necessary to become a doctor?

अकरावी आणि बारावी या परीक्षेमध्ये Science stream मध्ये विषय निवडल्यानंतर विद्यार्थ्यांना नीट (NEET) ची परीक्षा देणे गरजेचे ठरते. जे विद्यार्थी डॉक्टर बनण्याचा लक्ष घेऊन अभ्यास करतात त्यांना नीट या परीक्षेमध्ये चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होणे गरजेचे असते. नीट (National Eligibility cum Entrance Test) ही परीक्षा राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA – National Testing Agency) द्वारा आयोजित केली जाते. ही परीक्षा दरवर्षी होत असते आणि राष्ट्रीय स्तरावर डॉक्टरचा कोर्स करण्याकरिता या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणे गरजेचे ठरते.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स AIIMS आणि जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च JIPMER या काही नामांकित कॉलेजेसनी 2020 पासून फक्त नीट या परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश स्वीकारण्यात येत आहे. नीट ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थी मेडिकल कोर्सेस मध्ये ऍडमिशन घेतो. नीट ची परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थी एमबीबीएस (MBBS), बीडीएस (BDS), त्याचप्रमाणे बीएचएमएस (BHMS), बीएएमएस (BAMS), बीएसएमएस (BSMS), बीयुएमएस (BUMS), बीवीएससी आणि एएच मध्ये प्रवेश घेऊ शकतो.

नीट ही परीक्षा वर्षातून एकदा होत असते. ही परीक्षा ऑफलाइन मोडमध्ये आयोजित केली जाते. या परीक्षेमध्ये फिजिक्स या विषयाचे 45 प्रश्न, केमिस्ट्री या विषयाचे 45 प्रश्न तथा बायोलॉजी या विषयाचे 90 प्रश्न विचारले जातात. केमिस्ट्री आणि फिजिक्स हे दोन्ही विषय मिळवून 180 गुण असतात. बायोलॉजी या एकाच विषयाला 360 मार्क असतात. बरोबरीच्या उत्तराला चार गुण दिले जातात आणि प्रत्येकी चुकीचे उत्तराला निगेटिव्ह मार्किंग असते. निगेटिव्ह मार्किंग ही एक मार्काची असते.

अधिक माहितीसाठी वाचा (How to become a doctor)- exams.nta.ac.in 

नीट कौन्सिलिंग काय असते? What is NEET Counselling?

डॉक्टर बनण्याकरिता नीटची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नीट कौन्सिलिंग हा एक महत्त्वाचा घटक आहे. नीट काउंसिलिंग ही दोन लेवलवर होत असते- एक ऑल इंडिया आणि दुसरी राज्य लेव्हलवर. नीट काउन्सिलिंग ही भारतातून 15 टक्के सीटांसाठी कौन्सिलिंग केली जाते. पंधरा टक्के सीटा जागा ह्या सरकारी कॉलेजेस मध्ये असतात. राज्यस्तरावर नीट काउन्सिलिंग ही उरलेल्या 85% सरकारी जागींसाठी असते.

नीट काउन्सलिंग (NEET Counselling) ही ऑनलाईन मोडणे आयोजित केली जातात जाते आणि नीट कौन्सिलिंग मध्ये भाग घेण्यासाठी नीट या परीक्षेत आवश्यक पर्सेंटाइल मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे चयन केले जाते. नीट कौन्सिलिंग मध्ये भाग घेऊन विद्यार्थ्याला मेडिकल कॉलेज अलॉट होते. मेडिकल कॉलेज अलॉट झाल्यानंतर त्याचा डॉक्टर बनण्याचा कोर्स सुरू होतो. सीट अलॉटमेंट झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया हे औपचारिक रित्या पार पाडली जाते. कॉलेज अलोट झाल्यानंतर विद्यार्थ्याला प्रवेश पूर्ण करण्याकरिता अलॉट झालेल्या कॉलेजमध्ये रिपोर्ट करणे गरजेचे ठरते.

📖मर्चंट नेव्ही(How to join Merchant Navy)-करिअर, कोर्स, जॉब आणि लाखोंची सॅलरी!

नीट ची परीक्षा दिल्यानंतर कुठले कोर्सेस करू शकतो? Courses necessary to become a doctor

डॉक्टर बनण्यासाठी नीट ची परीक्षा देणे गरजेचे असते. नीट (NEET) ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर आपण खालील दिलेले कोर्सेस करून डॉक्टर बनू शकतो.

  • एमबीबीएस – बॅचलर ऑफ मेडिसिन बॅचलर ऑफ सर्जरी
  • बीडीएस – बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी
  • बी ए एम एस – बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी
  • बी एच एम एस – बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी
  • बी एस एम एस – बॅचलर ऑफ सिद्धा मेडिसिन अँड सर्जरी
  • बीवीएससी अँड बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स अँड ऍनिमल हसबंडरी

एमबीबीएस कोर्स काय असते? What is MBBS Course?

नीट (NEET) ची परीक्षा पास केल्यानंतर एमबीबीएस कोर्समध्ये प्रवेश मिळतो. या कोर्समध्ये प्रवेश मिळण्याकरिता विद्यार्थ्याला अथक परिश्रम घेणे गरजेचे असते. नीट एमबीबीएस या कोर्स साठी प्रतिस्पर्धा अधिक वाढलेली आहे. त्यामुळे एमबीबीएस कोर्स मध्ये प्रवेश घेण्याकरिता त्याचा कट ऑफ देखील जास्त असतो. नीट च्या परीक्षेमध्ये एमबीबीएस कोर्स साठी लागणाऱ्या निर्धारित कट ऑफ मिळाल्यानंतर विद्यार्थ्याला एमबीबीएस कोर्स करता येऊ शकतो.

एमबीबीएस कोर्स हा साडेपाच वर्षांचा असतो. एमबीबीएस कोर्स सोबतच विद्यार्थ्याला एक वर्षाची इंटर्नशिप करण्याची गरज पडते. इंटर्नशिप करताना विद्यार्थ्याला मेडिकल या क्षेत्राची संबंधित सगळ्या गोष्टींची माहिती असणे आवश्यक असते. इंटर्नशिप मध्ये विद्यार्थ्यांना वॉर्ड मॅनेजमेंट, स्टाफ मॅनेजमेंट, कौन्सिलिंग स्किल्स, स्टॅंडर्ड क्लिनिकल केअर इत्यादी गोष्टी शिकवल्या जातात. एमबीबीएस मध्ये ऍडमिशन घेण्या अगोदर एमबीबीएस कोर्सला लागणारी फीज ही किती असेल याची पुरेपूर माहिती घेणे गरजेचे असते.

📖पायलट(Pilot) कसं बनायचं? Eligibility Criteria, Admission Process, Course, Fees, Salary

एमबीबीएस कोर्स मध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बनण्याकरिता कुठले पर्याय उपलब्ध आहेत? (How to become a doctor in India after NEET)

एमबीबीएस कोर्स मध्ये प्रवेश घेण्याकरिता नीट परीक्षेचा कटऑफ हा जास्त असतो. त्यामध्ये सहाजिक आहे की प्रत्येक विद्यार्थी हा एमबीबीएस कोर्स करू शकत नाही. परंतु एमबीबीएस कोर्समध्ये प्रवेश न मिळाल्यास हताश होऊ नये कारण की नीट या परीक्षेच्या आधारावर देखील आपण इतर कोर्सेस करून डॉक्टर बनू शकतो. खालील दिलेले काही कोर्सेसची नावे आहेत –

दातांचे डॉक्टर (How to become a doctor of teeth -dentist)

डेंटिस्ट बनण्याकरिता विद्यार्थ्याला बीडीएस बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी. हा कोर्स करणे गरजेचे असते. या कोर्समध्ये दातांशी संबंधित अभ्यासक्रम शिकवला जातो. हा कोर्स चार वर्षांसाठी असतो. त्यानंतर एका वर्षाची इंटर्नशिप असते. या कोर्समध्ये विद्यार्थ्याला डेंटल ॲनाटोमी, ओरल मेडिसिन, कम्युनिटी डेंटिस्ट्री, सर्जिकल ट्रीटमेंट याबद्दल माहिती प्रदान केली जाते. बीडीएस कोर्स केल्यानंतर नीट पीजी परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही डेंटिस्ट या क्षेत्रामध्ये मास्टर ऑफ डेंटल सर्जरी हा एक पोस्ट ग्रॅज्युएट डेंटिस्ट्री कोर्स करू शकता.

आयुर्वेदिक डॉक्टर (How to become a doctor in Ayurveda)

आयुर्वेदिक डॉक्टर बनण्याकरिता नीट या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन तुम्हाला बीएएमएस चे कोर्स करावे लागते. हा कोर्स सरकारी, अर्ध सरकारी किंवा खाजगी कॉलेजेस मध्ये शिकवला जातो. या कोर्सची अवधी देखील साडेपाच वर्ष असते आणि एका वर्षाची इंटर्नशिप करण्याची गरज पडते. या कोर्समध्ये आधुनिक चिकित्सा, व्यवहारिक प्रशिक्षण आणि अष्टांग आयुर्वेद याबद्दल संपूर्ण माहिती प्रदान करण्यात येते.

होमिओपॅथिक डॉक्टर (How to become a doctor in Homeopathic)

होमिओपॅथिक डॉक्टर बनण्याकरिता तुम्हाला बीएचएमएस BHMS चे कोर्स करणे गरजेचे ठरते. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या सेंट्रल कौन्सिल ऑफ होमिओपथी CCIH द्वारा बीएचएमएस कोर्स मध्ये प्रवेश मिळू शकतो. हा कोर्स देखील साडेपाच वर्षांचा असते आणि त्याच्यानंतर एक वर्षाची इंटर्नशिप करणे गरजेचे ठरते. बीएचएमएस कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्याला होमिओपॅथी औषधे तसेच सर्जरी याबद्दल ज्ञान प्राप्त होते. बी एच एम एस कोर्स केल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या कॉलेजेस मध्ये शिकवायला पात्र ठरतात. बीएचएमएस नंतर तुम्ही पीएचडी कोर्स साठी देखील आवेदन करू शकता.

पशुपक्ष्यांचे डॉक्टर (How to become Veterinary Doctor)

बॅचलर ऑफ व्हेटर्नरी सायन्स अँड ऍनिमल हसबंडरी हा कोर्स पाच वर्षांचा असतो. या कोर्सच्या अभ्यासाने विद्यार्थ्यांना पशु चिकित्सक ही पदवी प्राप्त होते. हा कोर्स देखील पाच वर्षांचा असतो आणि सहा महिन्याची इंटर्नशिप करण्याची गरज पडते. या कोर्समध्ये पशुंना येणारी बिमारी आणि त्याचे मेडिकल डायग्नोस्टिक आणि त्यांच्या संबंधित उपचार याबद्दल माहिती प्रदान केली जाते.

वरील दिलेल्या ब्लॉग मधील माहिती तुम्हाला आवडली असल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा आणि करिअर बद्दल अधिक माहिती मिळवण्याकरिता आमचा ब्लॉग Vidyarthiyash नेहमी वाचा.

Leave a Comment