मर्चंट नेव्ही (Merchant Navy) मध्ये करिअर जर करायचं असलं तर त्यात खूप संधी उपलब्ध आहेत. मर्चंट नेव्ही चे कर्मचारी कुठल्याही देशातून व्यापार करण्यात खूप महत्त्वाची भूमिका निभवतात. मर्चंट नेव्ही चा करिअर ही देशातील नौसेना पेक्षा वेगळी असते. एकीकडे नौसेना समुद्री जहाज तसेच समुद्री सीमांची रक्षा करतात तर मर्चंट नेव्ही दुसऱ्या देशाशी व्यापार आदान प्रदान करतात.
मर्चंट नेव्ही च्या करिअरला समुद्रात खूप रोमांचक आणि ग्लॅमरस जॉब अशी मानली जाते. मर्चंट नेव्ही या करिअरमध्ये समुद्री जहाज यांच्यामार्फत एका देशातून दुसऱ्या देशात माल वाहतूक केली जाते.मर्चंट नेव्ही मध्ये सॅलरी प्रति महिन्याला लाखांपर्यंतची असते.
या ब्लॉगमध्ये आपण How to join Merchant Navy मर्चंट नेव्ही मध्ये करिअर कसा करायचा, त्यात कुठले कोर्स आहेत, कॉलेज कुठले आहेत, जॉब कशी असते आणि सॅलरी कशी असते हे जाणून घेऊ.
Table of Contents
मर्चंट नेव्ही म्हणजे काय (What is Merchant Navy)?
जर तुम्हाला दुनिया फिरायची असेल समुद्राची एक रोमांचक यात्रा करायची असेल आणि तसेच ग्लॅमरस जॉब मिळवायची असेल तर नवीन युवांमध्ये मर्चंट नेव्ही या करिअरला खूप आकर्षण मिळत आहे. मालाची आदान प्रदान करणे यामध्ये मर्चंट नेव्ही ही खूप महत्त्वाची भूमिका निभवते. मर्चंट नेव्ही चा करिअर आर्थिक दृष्ट्या फायदेमंद तर आहेच पण सोबतच रोमांचक आणि संघर्ष पूर्ण देखील आहे.
मर्चंट नेव्ही चा सरकारी नोकरीत समाविष्ट न असता तिला खाजगी नोकरी मध्ये समाविष्ट केले जाते. ज्या विद्यार्थ्यांना समुद्रामध्ये करिअर करायचं आहे आणि ज्यांना देश प्रदेश फिरायचे आहे त्यांच्यासाठी मर्चंट नेव्ही हा एक उत्तम पर्याय आहे. मर्चंट नेव्ही मध्ये करिअर हा एक आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आमुलाग्र भाग आहे. मर्चंट नेव्ही मध्ये दहावी बारावी आणि इंजिनिअरिंग झालेले विद्यार्थी जॉब घेऊ शकतात. मर्चंट नेव्ही मध्ये नोकरी ही आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये असते.
मर्चंट नेव्ही मध्ये कोणते कोर्सेस उपलब्ध आहेत (What courses offered in Merchant Navy)?
मर्चंट नेव्ही मध्ये मुख्यता तीन विभाग असतात – डेक विभाग, इंजन विभाग आणि सलून विभाग.
डेक विभाग (Deck)-हा विभाग मुख्यतः जहाजाच्या नौकानयन याच्याशी संलग्न आहे. सोबतच कार्गो (Cargo) म्हणजेच माल लोडिंग डिस्चार्जिंग आणि जहाजाची दुरुस्ती करणे आणि तसेच जहाजावर असलेल्या सगळ्या कृ(crew)ची सुरक्षा या विभागाची कामे असतात.
इंजिन विभाग (Engine)-हा विभाग जहाजाच्या इंजिन आणि जहाजावर असलेले इतर तांत्रिक प्रणालींची देखभाल करणे तसेच जहाजावरील यंत्रणांची दुरुस्ती करणे या विभागाची कामे आहेत.
सलून विभाग (Catering)-या विभागाला केटरिंग विभाग देखील म्हटले जाते. या विभागामधील लोकांची कामे असतात जहाजावरील लोकांना खाण्यापिण्याची सोय करणे. शेफ(Chef), Steward इत्यादी या विभागातील मुख्य पदांची नावे आहेत.
पायलट(Pilot) कसं बनायचं? Eligibility Criteria, Admission Process, Course, Fees, 1लाखची Salary!
मर्चंट नेव्ही च्या कोर्सचा कालावधी(Course Duration in Merchant Navy)
मर्चंट नेव्ही च्या कोर्सचा कालावधी हा त्या कोर्सच्या प्रकारावर अवलंबून असतो.
डेक विभागामध्ये ऑफिसर्स रँकवर दोन कोर्सेस उपलब्ध आहेत.
1.बीएससी नॉटिकल सायन्स(B.Sc Nautical Science) हा तीन वर्षाचा कोर्स आहे हा पदवी कोर्स आहे. हा कोर्स डेक ऑफिसर्स (Deck Officers)साठी आहे.
2.डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स(DNS-Diploma in Nautical Science) हा डिप्लोमा कोर्स आहे. या कोर्सचा कालावधी 18 ते 24 महिन्यांचा असतो. हा कोर्स देखील डेक ऑफिसर(Deck Officers) साठी उपलब्ध आहे.
इंजिन विभागासाठी ऑफिसर्स रँकवर दोन कोर्सेस उपलब्ध आहेत.
1.बी टेक मरीन इंजीनियरिंग(B.Tech Marine Engineering) हा चार वर्षाचा पदवी कोर्स आहे. हा कोर्स केल्यानंतर जहाजाच्या इंजिन विभागाला आपली नोकरी लागते.
2.ग्रॅज्युएट मरीन इंजीनियरिंग(GME Graduate Marine Engineering) हा कोर्स एका वर्षाचा असतो. हा कोर्स करण्यापूर्वी तुमच्याकडे मेकॅनिकल इंजिनिअरिंग ची पदवी असणे आवश्यक असते. मेकॅनिकल इंजीनियरिंग केल्यानंतर एक वर्षाचा ग्रॅज्युएट मरीन इंजीनियरिंग कोर्स करावा लागतो त्यानंतर तुम्ही मर्चंट नेव्ही मध्ये जॉब करू शकता.
3.इलेक्ट्रो टेक्निकल ऑफिसर(ETO- Electro Technical Officer) हा चार महिन्याचा कोर्स आहे हा कोर्स करण्याअगोदर उमेदवाराला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी असणे गरजेचे असते.
मर्चंट नेव्ही साठी पात्रता(Eligibility Criteria for Merchant Navy)
ऑफिसर्स रँकवर खालील विभागासाठी शैक्षणिक पात्रता
डेक विभाग– विज्ञान शाखा गणित आणि भौतिक शास्त्रांसह उत्तीर्ण. पीसीएम(PCM) सरासरी कमीत कमी 60% आणि दहावी बारावी परीक्षेत इंग्रजी विषयात किमान 50 टक्के गुण.
इंजिन विभागासाठी बारावी विज्ञान शाखा, गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रासह उत्तीर्ण.
मर्चंट नेव्ही साठी लागणारे वय(Age Criteria)
प्रत्येक विभागाने वेगवेगळे वय पात्रता ठरवलेली असते पण साधारणतः सरासरी 17 ते 26 वर्षे पुरुष आणि 17 ते 24 वर्षे महिला या वयोगटातील उमेदवार पात्र ठरतात.
शारीरिक आणि वैद्यकीय पात्रता(Medical Fitness Criteria)
- रंगदृष्टी आणि चांगली दृष्टी.
- चांगली शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती आणि निर्धारित वैद्यकीय मानकांमध्ये बसणे आवश्यक आहे.
याचबरोबर रेटिंग साठी देखील डेक विभागात आणि इंजिन विभागात कोर्सेस उपलब्ध आहेत.
त्याची शैक्षणिक पात्रता दहावीत किमान 60% गुण आणि इंग्रजी विषयात किमान 50% गुण अशी असते. दहावीनंतर आयटीआय(ITI) झालेले विद्यार्थी देखील रेटिंग चे कोर्स करू शकतात.
मर्चंट नेव्ही साठी प्रवेश प्रक्रिया(Admission Procedure For Merchant Navy)
उमेदवाराला प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. परीक्षेचे या प्रवेश परीक्षेचे नाव आय एम यु सी इ टी(IMU-CET) आहे. दरवर्षी ही परीक्षा आयोजित केली जाते. त्यामध्ये गणित, भौतिकशास्त्र, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातात.
मेडिकल टेस्ट- परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आयएमयू(IMU) द्वारे आयोजित वैद्यकीय तपासणीत उमेदवाराला उत्तीर्ण होणे हे गरजेचे असते.
इंटरव्यू पात्र उमेदवारांना आयएमयू(IMU)द्वारे मुलाखती करिता बोलावले जाते.
याच सोबत काही महत्त्वाच्या गोष्टी देखील आहेत. विविध पदांसाठी आणि विविध कोर्स साठी मर्चंट नेव्ही मध्ये विविध प्रकारच्या प्रवेश प्रक्रिया आहेत. प्रत्येक कोर्सची प्रवेश प्रक्रिया ही भिन्न असू शकते.
अधिक माहितीसाठी आयएमयू च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या- https://www.imu.edu.in/
मर्चंट नेव्ही चे कोर्सेस कुठे करता येते(Colleges for Merchant Navy)?
उमेदवाराला त्याच्या इच्छेनुसार त्याच्या आवडीच्या विभागात कोर्स करता येतो. परंतु हे कोर्स ज्या कॉलेजमध्ये शिकवले जातात तो कॉलेज डीजी अप्रूव्ह्ड(DG Approved) असणे आवश्यक आहे. खालील दिलेल्या काही डीजी अप्रूव्ह्ड कॉलेजेस ची नावे-
- Anglo Eastern Maritime Academy
- Tolani Maritime Institute
- Great Eastern Institute Of Maritime Studies
- Applied Research International
- International Maritime Institute
- Institute Of Maritime Studies (IMS,Goa)
- Training Ship Rahaman
- Samundra Institute Of Maritime Studies
मर्चंट नेव्ही जॉब(Merchant Navy Job)
मर्चंट नेव्हीतील पदे –
डेक विभाग (Deck)
- Deck Cadet
- 3rd Officer
- 2nd Officer
- Chief Officer
- Captain
इंजिन विभाग (Engine)
- Engine Cadet
- 4th Engineer
- 3rd Engineer
- 2nd Engineer
- Chief Engineer
मर्चंट नेव्ही सॅलरी (Salary in Merchant Navy)
आज-काल मर्चंट नेव्ही मध्ये करिअर घडवण्यासाठी खूप लोक येत आहेत कारण मर्चंट नेव्ही मध्ये चांगला पगार मिळतो. सुरुवातीला मर्चंट नेव्हीचे कोर्स केल्यानंतर ट्रेनिंग करावी लागते. ट्रेनिंग मध्ये पगार सुरुवातीला कमी असतो. नंतर अनुभव वाढल्यानंतर पगार देखील वाढतो. मर्चंट नेव्ही मध्ये पगार हा दोन-तीन गोष्टींवर अवलंबून आहे. तुम्ही कुठल्या जहाजावर आहात, तुम्ही कुठल्या विभागामध्ये कार्यरत आहात आणि तुमचा रँक काय आहे यावर तुमचा पगार अवलंबून असतो. सगळ्यात जास्त पगार कॅप्टन (Captain) आणि चीफ इंजिनियर(Chief Engineer) चा असतो.
Position in Merchant Navy | Average salary in INR in Merchant Navy |
Cadet(Deck/Engine) | 25000-40000 |
4th Engineer/3rd Officer | 150000-220000 |
3rd Engineer/2nd Officer | 310000-400000 |
2nd Engineer/Chief Officer | 500000-700000 |
Chief Engineer/Captain | 800000-100000 |
मर्चंट नेव्ही चे फायदे आणि तोटे(Pros & Cons Of Merchant Navy)
फायदे (Pros)
- देश-विदेश फिरण्याची संधी
- रोमांचक जॉब
- चांगला पगार
- वेगवेगळ्या देशांची संस्कृती पाहण्याची संधी
- वेगवेगळ्या लोकांशी भेटण्याची संधी
तोटे(Cons)
- सहा ते आठ महिने फक्त समुद्रातच राहणे
- इंटरनेट सुविधा कमी
- फक्त 20 ते 25 लोकांशीच संपर्क
- घरापासून आणि नातेवाईकांपासून दूर
टीप – वरील दिलेली माहिती ही सामान्य माहिती आहे. बदलत्या वेळेनुसार ही माहिती देखील बदलू शकते. प्रवेश घेताना अधिकृत वेबसाईटला जाऊन माहिती वाचा.
FAQs about Merchant Navy
1.दहावीनंतर मर्चंट नेव्ही कशी जॉईन करायची?
👉दहावीनंतर मर्चंट नेव्ही जॉईन करण्यासाठी तुम्हाला जीपी रेटिंग(GP Rating) चा कोर्स करावा लागेल.
2.मर्चंट नेव्ही मध्ये महिला येऊ शकतात का?
👉होय आता मर्चंट नेव्ही मध्ये महिला देखील विविध पदांवर कार्यरत आहेत.
3.मर्चंट नेव्ही चे कोर्सेस कठीण असतात का?
👉नाही मर्चंट नेव्हीचे कोर्सेस जास्त कठीण नसतात परंतु तुम्हाला एकाग्रतेने अभ्यास करावा लागेल.
4.मर्चंट नेव्ही मध्ये सुरुवातीचा पगार किती असतो?
👉सुरुवातीला तुम्ही मर्चंट नेव्ही मध्ये कॅडेट(Cadet) म्हणून जॉईन करता. त्यात तुम्हाला सरासरी 25 ते 40 हजार पगार मिळतो.
5.मर्चंट नेव्ही मध्ये किती दिवसांच्या सुट्ट्या मिळतात?
👉मर्चंट नेव्ही मध्ये तुम्हाला साधारणतः दोन ते तीन महिन्याच्या सुट्ट्या मिळतात.
6.कमी कालावधीचा कोर्स कुठला आहे?
👉मर्चंट नेव्ही मध्ये कमी कालावधीचा कोर्स म्हणजे इलेक्ट्रो टेक्निकल ऑफिसर(ETO)चा आहे. हा कोर्स चार महिन्याचा आहे. या कोर्स करिता तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी असणे आवश्यक आहे.
7.आयटीआय(ITI) झालेले विद्यार्थी मर्चंट नेव्ही जॉईन करू शकतात का?
👉होय आयटीआय झालेले विद्यार्थी ()GP Rating)चे कोर्स करून मर्चंट नेव्ही मध्ये प्रवेश घेऊ शकतात.
8.कम्प्युटर सायन्स इंजीनियरिंग चे विद्यार्थी मर्चंट नेव्ही जॉईन करू शकतात का?
👉नाही कम्प्युटर सायन्स इंजीनियरिंग चे विद्यार्थी मर्चंट नेव्ही जॉईन करू शकत नाही.