What is Mutual Funds – नमस्कार मित्रांनो! स्वागत आहे आमच्या नवीन पोस्ट मध्ये. या नवीन पोस्टमध्ये आम्ही म्युच्युअल फंड्स काय आहे (What is Mutual Funds) आणि म्युच्युअल फंड्स किती प्रकारचे असतात याबद्दल माहिती घेणार आहोत. त्याचप्रमाणे 2025 या वर्षामध्ये तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्वेस्ट (How to invest in Mutual Funds) करून आपल्या इन्व्हेस्टमेंट पासून चांगले रिटर्न मिळू शकतात याबद्दल देखील आपण चर्चा करणार आहोत. तर चला सुरू करू म्युच्युअल फंड काय आहे.
प्रत्येक माणसाला वाटते की आपण केलेली इन्व्हेस्टमेंट हे भविष्यामध्ये आपल्याला चांगला रिटर्न काढून देणार. त्याकरिता तो नवीन नवीन पर्याय शोधत राहतो. असाच एक पर्याय 2025 च्या इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये तुम्ही ऍड करू शकता. तो म्हणजे म्युच्युअल फंड! जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट आणि म्युच्युअल फंड या विषयाबद्दल नवीन असाल तर हा आर्टिकल पूर्ण वाचा. हा आर्टिकल तुमच्यासाठीच लिहिलेला आहे. आर्टिकल वाचून तुम्ही आपल्या इन्वेस्टमेंट यात्रेला सुरू करू शकता.

मागील 10 ते 15 वर्षांमध्ये म्युच्युअल फंड्स हा लोकांमध्ये खूप लोकप्रिय झालेला आहे. विविध पोर्टफोलिओच्या उपयोगातून म्युच्युअल फंडने निवेश करणाऱ्यांना चांगला रिटर्न दिलेला आहे. आर्टिकल वाचुन म्युच्युअल फंड बद्दल तुम्हाला अधिक माहिती मिळणार आहे. सोबतच आपण काही प्रश्नांची उत्तरे देखील या आर्टिकल मध्ये विस्तारित स्वरूपात जाणून घेणार आहोत.
Table of Contents
म्युच्युअल फंड काय आहे? What is Mutual Fund ?
म्युच्युअल फंड मध्ये निवेश करणाऱ्या व्यक्तींकडून पैसे गोळा केले जाते आणि जमा झालेल्या पैशांना वेगवेगळ्या पोर्टफोलिओ मध्ये निवेश केले जाते. हे निवेश म्युच्युअल फंड कंपनी करत असते. म्युच्युअल फंड कंपनी मध्ये म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केट संबंधित माहिती ठेवणारे लोक असतात. लोकांचे जमा केलेले पैसे हे ते स्टॉक्स, बॉन्ड्स आणि मनी मार्केट सोबतच वेगवेगळ्या स्कीम मध्ये निवेश करत असतात.
जमा केलेल्या सगळ्या पैशांना म्युच्युअल फंड कंपनीचा एक माणूस ज्याला की फंड मॅनेजर म्हटले जाते तो थोडा थोडा पैशांना त्याच्याकडे असलेल्या निवेश कौशल्यांच्या उपयोग करून विभिन्न वित्तीय साधनांमध्ये निवेश करतो.
म्युच्युअल फंड त्या लोकांसाठी गरजेचे आहे ज्या लोकांना शेअर मार्केट बद्दल पुरेशी माहिती नाही, त्यांना शेअर मार्केटमध्ये निवेश करायचे आहे. कारण की म्युचल फंड मध्ये निवेश केल्यानंतर त्यांच्या पैशांना हाताळण्यास फंड मॅनेजर असतो जो की आपल्या क्षेत्रामध्ये एक विशेषज्ञ असतो. फंड मॅनेजर लोकांकडून मिळालेल्या पैशांना वेगवेगळ्या स्टॉक मध्ये आणि शेअर मार्केटमध्ये निवेश करत असतो जेणेकरून निवेश केलेल्या पैशांवर चांगला रिटर्न मिळेल.
Also Read- How to improve CIBIL Score in 2025 : सिबिल स्कोर वाढवण्याची Step-by-step Process
म्युच्युअल फंड्स कसे काम करतात ? How Mutual Funds Work ?
एखाद्या व्यक्तीने म्युच्युअल फंड सुरू केले. ते काही पैसे म्युच्युअल फंड मध्ये निवेश करत असतात. त्यांनी निवेश केलेल्या पैशांवर काही युनिट्स मिळतात. हे युनिट्स त्या म्युच्युअल फंडच्या एनएव्ही NAV च्या आधारावर दिले जातात. एनएव्ही म्हणजे नेट असेट व्हॅल्यू Net Asset Value. सोप्या भाषेत म्हटले तर म्युच्युअल फंडची हे एका शेअरची मुल्य आहे.
समजा जर तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंड मध्ये निवेश केले. त्या फंडची एनएव्ही आहे 80 रुपये. तर ₹1000 निवेश केल्यावर तुम्हाला 80 रुपयाच्या एनएव्ही वर 12.5 युनिट्स मिळतील. ही एनएव्हीची व्हॅल्यू फंड जवळ असलेल्या टोटल संपत्तीच्या आणि वाचलेल्या शेअरच्या संख्या वर निर्भरित असते. उदाहरणार्थ जर कुठल्याही फंडची कुल संपत्ती हे 1 करोड रुपयांची असेल आणि त्या फंड मध्ये 1 लाख शेअर्स वाचलेले असतील. तर त्या फंडची एनएव्ही हे ₹100 च्या बरोबर असेल. ही NAV दिवसाला बदलत रहाते. या एनएव्हीच्या आधारावर निवेश केलेल्या फंडचे रिटर्न्स जास्त होत असते आणि निवेश कर्त्याच्या पोर्टफोलिओ मध्ये हे दिसत असते.
एनएव्ही शेअर मार्केटमध्ये होत असलेल्या उतार आणि चढावावर अवलंबून असते.

म्युच्युअल फंड किती प्रकारचे असतात ? Types Of Mutual Funds
खालील माहिती दिलेल्या माहितीच्या आधारावरून आपण जाणून घेऊ की म्युच्युअल फंड चे किती प्रकार आहेत आणि शेअर मार्केटमध्ये निवेश करताना कुठल्या म्युच्युअल फंड मध्ये आपण निवेश केल्याने आपल्याला जास्त रिटर्न्स मिळतील खालील काही म्युच्युअल फंड चे प्रकार आहेत
ओपन एंडेड म्युच्युअल फंड (Open Ended Mutual Fund)
ओपन एंडेड म्युच्युअल फंड मध्ये आपल्याला मिळालेल्या युनिट्सला आपण कधीही खरेदी किंवा विकू शकतो. या युनिटची कुठलीही अवधी नसते. या स्कीममध्ये लिक्विडिटी जास्त असते. परंतु काही ओपन एंडेड म्युच्युअल फंड मध्ये लॉकिंग पिरेड देखील असतो. उदाहरणार्थ ELSS. लॉकिंग पिरेडच्या वेळेस तुम्ही मिळालेल्या युनिट्सला रेडीम करू शकत नाही.
डेट फंड (Debt Fund)
डेट फंड मध्ये निवेश केलेल्या पैशांना फंड मॅनेजर डिबेंचर किंवा सरकारी योजनांमध्ये निवेश करतो. डेट फंड मध्ये खूप कमी रिस्क असते.
इक्विटी फंड (Equity Fund)
या फंड मध्ये निवेश केल्यानंतर निवेश केलेल्या पैशांना फंड मॅनेजर हा शेअर बाजारात लावतो. या फंडची रिपोर्ट मागील काही वर्षांमध्ये आपण पाहिली तर ती चांगली आहे. या इक्विटी फंड मध्ये कमीत कमी सात वर्षांपर्यंत निवेश करतो त्याला चांगले रिटर्न्स प्राप्त झालेले आहेत. या फंड मध्ये रिटर्न्स जास्त आहेत पण risk देखील जास्त आहे. इक्विटी फंड मध्ये काही फंड येतात जसे की स्मॉल कॅप small cap funds, मिड कॅप mid cap funds, लार्ज कॅप फंड large cap funds, इत्यादी.
लिक्विड फंड (Liquid Fund)
जर तुम्हाला कमी रिस्क घ्यायची असेल आणि निवेश करण्याची कालावधी ही देखील कमी असेल तर तुम्ही लिक्विड फंड मध्ये निवेश करू शकता. या फंड मध्ये फंड मॅनेजर short term debt instruments मध्ये निवेश करतो.
बॅलेन्स फंड (Balanced Fund)
जो निवेशक एकदमच कमी रिस्क मध्ये चांगले रिटर्न्स मिळण्याची अपेक्षा ठेवतो तर बॅलन्स फंड हा त्याच्यासाठी एक चांगला विकल्प आहे. या फंड मध्ये फंड मॅनेजर हा काही प्रमाणात इक्विटी मध्ये निवेश करतो तर काही प्रमाणात सिक्युरिटीज मध्ये निवेश केला जातो.
फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन (Fixed Maturity Plan)
आपल्याला या नावावरूनच समजते की निवेश केलेल्या पैशांची मॅच्युरिटी असणार. हे फंड जास्ती तर debt फंड मध्ये निवेश करतात. या फंड मध्ये तुम्हाला चार्जेस देखील कमी द्यावे लागतात.
म्युच्युअल फंड मध्ये निवेश कसे सुरू करायचे ? How to invest in Mutual funds ?
म्युच्युअल फंड मध्ये साधारणतः त्याचे तीन सामान्य रस्ते आहेत.
बँकेच्या माध्यमातून– भारत देशातील आज मोठमोठ्या खाजगी, सरकारी बँकांमध्ये म्युच्युअल फंड सुरू करण्याची उपलब्धता आहे. जर तुम्हाला म्युच्युअल फंड सुरू करायचे असल्यास तुम्ही आपल्या जवळच्या बँकेच्या मॅनेजरशी संपर्क साधू शकता. बँकेमध्ये तुम्हाला नेट बँकिंग किंवा इंटरनेट किंवा मोबाईल बँकिंगच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून म्युच्युअल फंड मध्ये निवेश करता येतो.
म्युच्युअल फंड कंपनीच्या वेबसाईट द्वारे – अशा परिस्थितीमध्ये निवेश करणाऱ्या व्यक्तीला म्युच्युअल फंड कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याला त्याचे डिमॅट अकाउंट उघडायचे आहे. मार्केटमध्ये अनेक प्रकारचे म्युच्युअल फंड कंपन्या आहेत. निवेश करतानी सगळ्या कंपन्यांचा चांगला अभ्यास असणे गरजेचे आहे. हे केल्याने आपण केलेल्या निवेश वर चांगले रिटर्न्स मिळण्यास मदत होईल.
ब्रोकरेज ऐप– आता सध्या मार्केटमध्ये बरेचसे ब्रोकरेज ऐप अवेलेबल आहेत. जसे की एंजल वन Angel one, ग्रो Groww, Upstock इत्यादी. हे ॲप डाऊनलोड करून तुम्ही रजिस्ट्रेशन आणि डिमॅट अकाउंट ओपन करू शकता आणि तुमच्या रिसर्च नुसार या ॲपद्वारे म्युच्युअल फंड मध्ये निवेश करू शकता. या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्यासाठी तुमच्या निवेशच्या रकमेवर कुठले म्युच्युअल फंड तुमच्यासाठी चांगले आहेत हे देखील शोधण्यात मदत मिळते. त्याचप्रमाणे निवेश केल्यानंतर मिळालेल्या रिटर्न्सला तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्यात सहज withdraw करू शकता.

म्युचल फंड मध्ये वेस्ट केल्याचे काय फायदे आहेत ? Advantages of Mutual Funds Investment
- जगभराच्या इतिहासामध्ये इंडेक्स फंड 12% चे रिटन दिले आहे. जे की एफडी FD च्या तुलनेमध्ये जास्त आहे. तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये निवेश केल्यानंतर विविधकरण पाहायला मिळेल. त्यामुळे तुमचे जोखीम देखील कमी होणार.
- तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये करतानी जास्त रिसर्च करण्याची गरज पडत नाही. हे काम त्या म्युच्युअल फंडचा फंड मॅनेजर करीत असतो.
- तुम्ही जेव्हा वाटेल तेव्हा म्युच्युअल फंड मधून आपले निवेश केलेले पैसे विथ ड्रॉ withdraw करू शकता.
- तुम्हाला वाटले की तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये अधिक पैसा इन्व्हेस्ट करायचा आहे तर ते देखील तुम्ही करू शकता.
- म्युच्युअल फंड तुम्ही ₹500 पासून सुरू करू शकता आणि भविष्यामध्ये चांगले रिटर्न्स मिळवू शकता.
म्युचल फंड मध्ये निवेश करण्याचे तोटे काय ? Disadvantages of Mutual Funds Investment
- म्युच्युअल फंड हा एक रिस्की निवेश आहे.
- म्युचल फंड मध्ये तुम्हाला loss देखील होऊ शकतो.
- म्युच्युअल फंड हा शेअर बाजारावर अवलंबून असते.
- म्युचल फंड मध्ये एक्सप्लेन रेशिओ expense ratio, स्टॅम्प ड्युटी stamp duty, exit load अशा अनेक चार्जेस मुळे रिटर्न्स कमी होण्याची शक्यता आहे.
- म्युचल फंड मध्ये तुमच्या हातात काहीच नसते. म्हणजे तुम्ही म्युच्युअल फंडला नियंत्रित करू शकत नाही.
- म्युच्युअल फंड मध्ये मिळालेल्या रिटनचा मोठा कारण हा फंड मॅनेजर असू शकतो.
निष्कर्ष Conclusion
मागील दिलेल्या काही रिपोर्टच्या आधारावर आपण असे म्हणू शकतो की म्युच्युअल फंड मध्ये पैसे निवेश केल्यानंतर आपल्याला दरवर्षाला कमीत कमी 12% रिटर्न्स मिळण्याची शक्यता आहे. परंतु असे काही वर्षे देखील आले आहेत जिथे म्युचल फंडने negative रिटर्न्स दिले आहे. निवेश करणारे व्यक्तींचे बरेचसे पैसे बुडाले देखील आहे. म्हणून निवेश करताना किंवा म्युच्युअल फंड मध्ये निवेश करतानी निवेश सल्लागाराला किंवा स्वतःची रिसर्च करणे खूप गरजेचे आहे. वरील दिलेली माहिती ही फक्त सर्वसामान्य माणसांसाठी आहे. त्यांना सामान्य ज्ञान असणे खूप गरजेचे आहे. म्हणून म्युच्युअल फंड बद्दल वरील आर्टिकल लिहिलेला आहे. Vidyarthiyash कुठल्याही शेअर बाजारात, म्युच्युअल फंड मध्ये निवेश करण्यास सांगत नाही ज्याच्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकेल. म्हणूनच भविष्यामध्ये, कुठल्याही परिस्थितीमध्ये निवेश करताना स्वतःची रिसर्च करणे अति आवश्यक आहे.
FAQs on Mutual Funds
1. मी 100 रुपयांपासून म्युच्युअल फंडमध्ये इन्वेस्ट करू शकतो का?
हो. काही असे फंड देखील आहे जिथे तुम्ही 100 रुपयांपासून देखील निवेश करू शकता.
2. म्युचल फंड मध्ये आपण किती वर्षे निवेश करू शकतो?
म्युचल फंड मध्ये किती वर्षे निवेश करायचे आहे हे त्या निवेश करणाऱ्या व्यक्तींवर अवलंबून असते. तुम्ही पाच वर्षे, 10 वर्षे, 20 वर्षेनिवेश करू शकता.
3. म्युचल फंड मध्ये निवेश करण्याचा सोपा पर्याय कोणता?
म्युच्युअल फंड मध्ये निवेश करण्याचा सोपा पर्याय हा म्हणजे एसआयपी SIP आहे. यामध्ये दर महिन्याला तुमच्या बँक खात्यातून तुम्ही ठरवलेली निर्धारित रक्कम हे म्युच्युअल फंड मध्ये जमा होत जाते.
4. म्युच्युअल फंड मध्ये निवेश करण्याचे best mutual funds to invest कोणते?
याबद्दल आम्ही कुठलीही माहिती देऊ शकत नाही. निवेश करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या निवेशन नुसार रिसर्च करणे गरजेचे आहे.