One Student One Laptop Yojana 2025 : नमस्कार मित्रांनो ! आजच्या आधुनिक युगामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप प्रगती होत आहे आणि या प्रगतीला अंगीकृत करायला विद्यार्थी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी विद्यार्थी तांत्रिक क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेत आहेत. परंतु आर्थिक परिस्थिती कमजोर असल्याने शैक्षणिक क्षेत्रामध्ये लागणाऱ्या वस्तूंना घेण्याकरिता विफल होत आहेत. अशाच आर्थिक दृष्ट्या कमजोर विद्यार्थ्यांकरिता भारत सरकार घेऊन आलेली आहे एक नवीन योजना. या योजनेचे नाव आहे वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजना 2025 (One Student One Laptop Yojana 2025). या योजनेमुळे पात्र असलेल्या आर्थिक दृष्ट्या कमजोर विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासाकरिता मोफत लॅपटॉप दिले जाणार आहे. आजच्या या आर्टिकलच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ की फ्री मध्ये लॅपटॉप मिळण्याकरिता रजिस्ट्रेशन कसे करायचे, सोबतच या योजनेला पात्रता काय आहे. तर हा ब्लॉग पूर्ण वाचा.

Table of Contents
One Student One Laptop Yojana 2025 काय आहे ?
अखिल भारतीय तांत्रिक शिक्षा परिषद (AICTE) या समितीने तांत्रिक महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजनेचे फायदे मिळावे त्याकरिता ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या अंतर्गत असे विद्यार्थी जे तांत्रिक महाविद्यालयामध्ये आपले पदवीचे अभ्यासक्रम घेत आहेत आणि जे विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या कमजोर आहेत, त्याचप्रमाणे दिव्यांग वर्गामधील विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप दिले जाणार आहे. लॅपटॉप मिळाल्यानंतर विद्यार्थी आपले अभ्यासक्रम पूर्ण करू शकणार. या योजनेच्या माध्यमातून पात्र विद्यार्थ्यांना प्रौद्योगिकीचे उपयोग होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या मोफत लॅपटॉप मुळे ते आपल्या विषयाशी संबंधित माहिती आणि अभ्यास डिजिटल रूपाने ग्रहण करू शकणार आहेत.
Key Points | Details |
---|---|
Name of Yojana | One Student One Laptop वन स्टूडेंट वन लॅपटॉप |
Objective of Yojana | पात्र असलेल्या आर्थिक दृष्ट्या कमजोर विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासाकरिता मोफत लॅपटॉप दिले जाणार आहे. |
Target beneficiaries of Yojana | ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी दिव्यांग वर्गातून येणारे विद्यार्थी वार्षिक उत्पन्न कमी असलेले विद्यार्थी |
Official Website of Yojana | Click Here |
केंद्र सरकारचा हा नवीन उपक्रम आहे जो की विद्यार्थ्यांना ई-लर्निंग E-learning बद्दल माहिती प्रदान करणे आहे आणि या नवीन डिजिटल युगामध्ये त्यांना सशक्त बनवणे आहे. या योजनेच्या माध्यमातून मुलांना मोफत किंवा सबसीडी लॅपटॉप मिळणार आहे जेणेकरून ते शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये उंच भरारी घेऊ शकणार.
Also Read- Pradhan Mantri Internship Yojana 2024 in Marathi : पात्रता,आवेदन,लास्ट डेट| Step-by-step Easy Guide
वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजनेचे मुख्य उद्दिष्टे (Important Points of One Student One Laptop Yojana 2025)
डिजिटल शिक्षणाचा प्रसार- भारताचा प्रत्येक विद्यार्थी याला नवीन टेक्नॉलॉजीचा अभ्यासाकरिता वापर करता यावा.
डिजिटल युगात असमानता कमी करणे– या योजनेमुळे डिजिटल गोष्टींची सगळ्यांना माहिती होणार ज्यामुळे डिजिटल असमानता कमी होण्यास मदत मिळेल आणि सगळे विद्यार्थी डिजिटल साक्षर होतील.
ऑनलाइन लर्निंगला बढावा देणे– या योजनेमुळे विद्यार्थ्यांना ई-लर्निंग आणि ऑनलाइन लर्निंगचे नवीन प्लॅटफॉर्म मिळण्यास मदत मिळेल.
रोजगार कौशल्य वाढवण्यास मदत– कम्प्युटरचे कौशल्य असल्याने विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्यास मदत होईल.
वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजनेच्या अंतर्गत येणारे अभ्यासक्रम किंवा पाठ्यक्रम (Academic courses eligible for One Student One Laptop Yojana 2025)
खालील दिलेले काही क्षेत्र आहेत ज्यामध्ये तुम्हाला वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजनेचा फायदा मिळू शकणार आहे.
- इंजीनियरिंग (अभियांत्रिकी) – Engineering
- मॅनेजमेंट – Management
- प्लॅनिंग – Planning
- आर्किटेक्चर – Architecture
- फार्मसी – Pharmacy
वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजनाचे फायदे (Benefits of One Student One Laptop Yojana 2025)
- वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजना ही राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 च्या अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे.
- या योजनेच्या अंतर्गत विज्ञान, इंजिनिअरिंग, प्रबंधक, कला, वाणिज्य, प्रौद्योगिकी, फार्मसी या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप प्रदान करण्यात येणार आहे.
- या योजनेमुळे महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रम घेत असलेल्या विद्यार्थ्यांना फ्री लॅपटॉप उपलब्ध करुण मिळेल.
- एआयसीटीई (AICTE) पात्र असलेल्या कॉलेजांना प्रशंसा पत्र प्रदान करणार आहे ज्यामुळे महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप प्रदान करण्यात येईल.
- ही योजना विद्यार्थ्यांना उच्च शिक्षा घेण्यास मदत मिळेल आणि इतर विद्यार्थ्यांना देखील उच्च शिक्षण घेण्यास प्रवृत्त करेल.
- आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना या योजनाचे लाभ होणार आहे.
- विद्यार्थ्यांना निशुल्क लॅपटॉप मिळाल्यामुळे त्यांच्या अभ्यासामध्ये वाढ होणार आहे.
वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजने करिता लागणारी पात्रता (Eligibility required for One Student One Laptop Yojana 2025)
जर तुम्हाला वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजनेचे लाभ घ्यायचे असेल तर खालील दिलेली पात्रता तुम्हाला पूर्ण करायची आहे. ती पात्रता अशा प्रकारे आहे-
- भारत देशातील आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना या योजनेचे लाभ घेता येणार आहे.
- त्याचप्रमाणे दिव्यांग वर्गच्या विद्यार्थ्यांना देखील या योजनेचे लाभ मिळणार आहे.
- अशी व्यक्ती जे तांत्रिकी महाविद्यालयामध्ये आपले उच्चशिक्षण घेत आहेत.
- शैक्षणिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून असे विद्यार्थी त्यांचे पर्सेंटेज 75% च्या वरती आहे असे विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकणार.
- अशा विद्यार्थी ज्यांच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न हे 2 लाखांपेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना प्रेफरन्स दिले जातील.
- विद्यार्थी हा एआयसीटीई (AICTE) प्राप्त महाविद्यालया किंवा युनिव्हर्सिटी मध्ये शिक्षण घेत असावा.
- ही योजना एससी SC, एसटी ST, ओबीसी OBC, आणि अल्पसंख्यांक वर्गांसाठी MINORITY आहे.
वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजना करिता लागणारे आवश्यक कागदपत्रे (Important Documents required for One Student One Laptop Yojana 2025)
वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजनेचे फायदे घेण्याचे असल्यास पात्र विद्यार्थ्याला खालील पत्रे जोडणे गरजेचे आहे. हे कागदपत्र व्हेरिफिकेशनसाठी सत्यप्रत देणे गरजेचे आहे. खालील कागदपत्रे अशा प्रकारे आहेत-
- आधार कार्ड
- निवास प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
- दिव्यांग प्रमाणपत्र
- परिवाराचे वार्षिक वेतन किंवा इन्कम सर्टिफिकेट
- कॉलेजचे बोनाफाईड किंवा अलॉटमेंट लेटर
- कॉलेजमध्ये फी भरल्याची पावती
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ई-मेल ऍड्रेस
वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजना करिता आवेदन कसे करायचे ?
वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजनाचा फायदा घेण्यास इच्छुक असलेल्या पात्र विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना या योजने करिता रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. हे रजिस्ट्रेशन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. खालील दिलेले काही स्टेप्स आहेत. या स्टेप्सचा वापर करून तुम्ही या करिता आवेदन फॉर्म आणि रजिस्ट्रेशन करू शकता आणि या योजनेच्या फायदा घेऊ शकता.
- सगळ्यात आगोदर तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे. अधिकृत वेबसाईटवर जाण्याकरिता तुम्ही खालील दिलेल्या संकेतस्थळाचा वापर करू शकता.
- Click Here for Link

- त्यानंतर तुम्हाला वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजनाची लिंक दिसेल.
- या लिंकवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे
- समोर आलेल्या स्क्रीन मध्ये रजिस्ट्रेशन फॉर्म येणार.
- या रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये न चुकता आपले नाव, गाव, पत्ता, आयु, शिक्षा योग्यता, मोबाईल नंबर अशा प्रकारच्या अनेक माहिती भरायचे आहे.
- या फॉर्ममध्ये मागितले असलेल्या आवश्यक कागदपत्रांना स्कॅन करून अपलोड करून घ्यायचे आहे.
- सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करून झाल्यानंतर आवेदन फॉर्म पुन्हा एकदा तपासून घ्यायचा आहे.
- सगळी माहिती बरोबर भरल्यानंतर तुम्हाला सबमिट बटन प्रेस करायचे आहे.
- अशा प्रकारे तुम्ही वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजने करिता रजिस्ट्रेशन करू शकता.

वरील दिलेल्या पोर्टलवर तुम्हाला वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजनेबद्दल लिंक प्रदान करण्यात येईल. या लिंक वर क्लिक करून तुम्ही या योजनेबद्दल अधिक माहिती घेऊ शकता आणि या करिता रजिस्ट्रेशन कसे करायचे हे देखील त्या लिंक वर दिलेल्या माहितीमध्ये उपलब्ध आहे. जर तुम्हाला या लिंक वर वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजनेची लिंक दिसत नसेल तर तुम्हाला काही वेळ वाट पहावी लागणार आहे आणि जेव्हा देखील या संकेतस्थळावर या योजनेबद्दल लिंक ओपन होईल तेव्हा तुम्हाला रजिस्ट्रेशन करायची आहे.
Conclusion
वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजना One Laptop Yojana 2025 ही भारत सरकारने सुरू केलेल्या एका मुख्य योजनेमध्ये सामील होते. या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या विद्यार्थ्यांना तांत्रिक क्षेत्रामध्ये डिजिटल शिक्षण घेण्यास मदत मिळेल. मिळालेल्या फ्री लॅपटॉपचा वापर करून विद्यार्थी आपल्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेऊ शकतात. या योजनेमुळे कौशल्य प्राप्त विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्याची संधी देखील आहे. या योजनेचा वापर केल्याने डिजिटल असमानता कमी होण्यास मदत मिळेल आणि भारताचा प्रत्येक विद्यार्थी हा डिजिटल साक्षर होईल. या योजनेचा फायदा असा की विद्यार्थ्यांना नवीन ई-लर्निंगचे प्लॅटफॉर्म मिळतील. पुढे आपल्या क्षेत्रामध्ये अभ्यास करून नवीन गुणवत्ता प्राप्त करणार.
जगामध्ये होत असलेल्या डिजिटल युगामुळे आता प्रत्येक विद्यार्थी हा माहितीपासून वंचित राहणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला कम्प्युटरचे शिक्षण घेण्यात येईल आणि मोफत लॅपटॉप प्रदान केल्याने त्यांच्या अभ्यासक्रमात खूप मदत होणार आहे.
FAQs on One Student One Laptop Yojana 2025
1. या योजनेचे लाभ कोणाला मिळणार आहे?
वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजनेचे लाभ तांत्रिक महाविद्यालय आणि विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या आर्थिक कमजोर असलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
2. या योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना काय मदत मिळणार आहे ?
या योजनेच्या अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप वितरित केले जाणार आहे.
3. AICTE चे फुल फॉर्म काय आहे?
AICTE चे फुल फॉर्म- All India Council for Technical Education.
4. ही योजना भारताच्या प्रत्येक राज्यात सुरू आहे का ?
ही योजना राज्य सरकारवर निर्भर असते. वेगळ्या नावाने ही योजना सुरू आहे.
5. रजिस्ट्रेशन केल्यानंतर फॉर्मचे स्टेटस कसे बघायचे ?
अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करून तुम्ही Track Your Application वर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्मचे स्टेटस पाहू शकता.
6. मिळालेल्या मोफत लॅपटॉप मध्ये खराबी आल्यानंतर काय होणार?
बरेचसे प्रोग्राम वितरीत केलेल्या लॅपटॉपची वॉरंटी आणि सर्विस सपोर्ट देखील प्रदान करते.
7. या योजने करिता प्राप्त होण्यासाठी परिवाराचे वार्षिक उत्पन्न किती असणे गरजेचे आहे ?
या योजने करिता प्राप्त होण्यासाठी तुम्हाला योजनेच्या संकेतस्थळावर जाऊन माहिती प्रदान करायची आहे.