Actor कसे बनायचे ? How to become an Actor in India ? Free information in 2025

How to become an Actor in India – आपल्या भारत देशात चित्रपट आणि फिल्म यांचे चाहते लोक बरेच आहेत. मोठ्या पातळीवर भारत देशामध्ये सिनेमा बनतो आणि तेवढ्याच पातळीवर हा सिनेमा चाहत्यांकडून बघितला देखील जातो. त्यामुळे तेवढ्यात लोकांमध्ये त्यांच्या मनामध्ये देखील ॲक्टर actor बनण्याचा स्वप्न ते पाहत असतात. खरं तर मी देखील सिनेमा आणि चित्रपट पाहून पाहून ॲक्टर बनण्याचा स्वप्न पाहिला होता. दरवर्षी विविध राज्यांमधून महाराष्ट्राच्या मुंबई या शहरामध्ये बरेच लोकं ॲक्टर बनण्याकरिता येत राहतात.

How to become an Actor in India
How to become an Actor in India

मुंबई या शहराला चित्रपट नगरी ओळखले जाते. मोठमोठे प्रोडक्शन हाऊस, डायरेक्टर आणि मोठमोठे सेलिब्रिटी आणि ॲक्टर या शहरामध्ये राहत आहेत. त्यामुळे बरेचसे लोक मुंबई या शहरामध्ये ॲक्टर बनण्याचा स्वप्न साकार करण्याकरिता येत असतात. लाखोंनी येणाऱ्या लोकांमध्ये खूप कमी लोक असतात ज्यांचे स्वप्न पूर्ण होत असतात. परंतु जर ॲक्टर बनण्याची प्रोसेस पूर्णपणे फॉलो केली तर आजच्या या युगामध्ये आणि सोशल मीडियाच्या युगामध्ये तुम्ही सहजरीत्या acting करियर मध्ये नाम कमवू शकता. आजच्या या आर्टिकल How to become an Actor in India मध्ये आम्ही ॲक्टर कसे व्हायचे याबद्दल माहिती देणार आहोत. हा ब्लॉग How to become an Actor in India पूर्ण वाचा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा.

एक्टिंग ही एक कला आहे. या कलेला व्यक्ती शिकू शकतो आणि कालांतराने अनुभवा सोबत या मध्ये तो पारंगत होऊ शकतो. सिनेमेची दुनिया ही चकमकीने भरलेली आहे. त्यामुळे बरेच लोक या क्षेत्राकडे आकर्षित होत राहतात. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये छोटा-मोठा रोल मिळते देखील खूप नशिबाचे काम असते. फिल्मी दुनियामध्ये ॲक्टर बनाये याला खूप मेहनत, नशीब लागते असे म्हणतात. परंतु या How to become an Actor in India आर्टिकलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला गाईड करणार आहोत की ॲक्टर बनण्याकरिता तुम्हाला काय काय करावे लागणार आहे.

Also Read- Fashion Designer कसे बनायचे ? Full Information | 2025 मधील Best Career opportunity !

बॉलीवूड मध्ये ॲक्टर बनायला आणि या मध्ये एक्टिंग करियरला खूप स्कोप मिळत आहे. बरेचसे लोक आता फिल्म मेकिंगमध्ये रुजू झाले आहेत. त्याकरिता डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर, प्रोडक्शन हाऊस, स्पॉट बाय, कला, डान्स अशा अनेक फिल्मीशी निगडित क्षेत्रामध्ये लोक करिअर घडवत आहेत. तुम्हाला सांगू इच्छितो की ॲक्टर बनण्या अगोदर चांगला असिस्टंट डायरेक्टर होणे खूप गरजेचे आहे. सुरुवातीला असिस्टंट डायरेक्टर केल्यानंतर तुम्हाला अनुभव येईल. तुम्ही एक चांगले ॲक्टर बनाल. उदाहरणार्थ सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन हे सगळे असिस्टंट डायरेक्टर होते.

बॉलीवूड मध्ये ॲक्टर कसे बनवायचे ? How to become an Actor in India

जर तुम्हाला बॉलीवूड मध्ये ॲक्टर actor बनायचे असेल तर तुम्हाला बरेच गोष्टी लक्षपूर्वक वाचावे लागतील आणि त्या अंगीकृत करावे लागणार. खालील दिलेले काही स्टेप्स आहेत जे तुम्ही फॉलो करू शकता.

1. सकारात्मक माईंड सेट बनवणे

जर तुम्ही निश्चित केलं की तुम्हाला तुमचे करिअर acting मध्येच घडवायचे आहे तर तुम्हाला एक सकारात्मक माईंड सेट बनवावे लागेल. माईंड सेट बनवणे खूप गरजेचे आहे कारण की माईंड सेट बनवल्यानंतर तुम्हाला हे डिसाईड करायला सोपे जाणार आहे की तुम्हाला एक्टिंग किंवा ॲक्टर का बरं बनायचे आहे. जर तुम्हाला फक्त तुमच्या मनोरंजनासाठी किंवा शोका करीता ॲक्टर बनायचे असेल तर तुम्ही सहजरीत्या यूट्यूब किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून एक्टिंग स्किल शिकु शकता. त्याचप्रमाणे तुम्ही छोटे-मोठे एक्टिंगचे क्लास देखील लावू शकता.

परंतु जर तुम्हाला बॉलीवूड मध्ये actor बनायचे असेल तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला acting class जॉईन करावी लागेल.

बरेचसे लोक मोठमोठे सुपरस्टार यांच्याकडे पाहून ॲक्टर बनायला येतात. परंतु या सुपरस्टार लोकांनी देखील बरीच मेहनत घेतलेली आहे. तशी मेहनत तुम्हाला देखील घ्यावी लागणार आहे.

एक सक्सेसफुल ॲक्टर बनण्याचा स्वप्न पूर्ण करण्याकरिता तुम्हाला स्ट्रगल करावी लागणार आहे. तुम्हाला लगेच सिनेमामध्ये काम मिळणार नाही. डेली सोप एड्स, सिरीयल तथा काही थेटर मध्ये स्ट्रगल करावे लागणार आहे.

2. प्रोफेशनल ॲक्टींग कोर्स करणे

आपल्या देशामध्ये मोठमोठ्या शहरांमध्ये ॲक्टींग स्कूल Acting School आहेत जसे की दिल्लीमध्ये, नोयडा फिल्म सिटी, मुंबई फिल्म सिटी अशा बरेच शहरात एक्टिंग स्कूल Acting School आहे जिथे तुम्हाला प्रोफेशनल ऍक्टिंगचे कोर्स शिकवले जाते. फिल्म इंडस्ट्रीमध्ये करियर बनवण्याचा हा एक मात्र आणि सरल उपाय आहे. यामध्ये तुम्हाला ॲक्टिंग शिकवली जाते. तुमच्या एक्टिंग मध्ये सुधारणा केली जाते आणि कुठल्याही कॅरेक्टर मध्ये भूमिका कशी निभवावी याबद्दल पूर्ण माहिती प्रदान केली जाते. म्हणून प्रत्येक ॲक्टरच्या जीवनामध्ये एक्टिंग कोर्स करणे हे खूप गरजेचे आहे.

सिनेमामध्ये मोठे मोठे डायरेक्टर कॅरेक्टर करण्याकरिता बरीच मेहनत घ्यावी लागते.

  • प्रचलित हिट सिनेमे जसे की सुपर 30 मध्ये Hrithik Roshan या ॲक्टर ने एका बिहारी व्यक्तीच्या भाषेमध्ये भूमिका केली होती. त्याकरिता त्याला बिहारी भाषा शिकावी लागली होती.
  • दंगल या सिनेमामध्ये आमिर खानने पहलवानी आणि कुस्ती शिकली होती.
  • भाग मिल्खा भाग या सिनेमामध्ये फरहान अख्तर या अभिनेत्याने शारीरिक परिश्रम केले होते. ज्यामुळे सिनेमा सुपरहिट झाला होता.

प्रोफेशनल ऍक्टिंग कोर्समध्ये मोठमोठे डायरेक्टर, ॲक्टर लोक येतात आणि ते तुम्हाला एक्टिंग चांगलं कसं करता येईल याबद्दल मार्गदर्शन करतात.

त्यामुळे तुम्हाला जर एक्टिंग मध्ये करिअर घडवायचे असेल तर एक्टिंग स्कूल Acting School मध्ये एक प्रोफेशनल ऍक्टिंग कोर्स करणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये शिकलेले तुम्ही एक्टिंग स्किल्स सिरीयल तथा सिनेमा मध्ये तुमच्या उपयोगी येऊ शकते.

3. थिएटर जॉईन करावे लागणार

असे लोकं ज्यांच्याकडे एक्टिंग स्कूल Acting School मध्ये शिकण्याकरिता पुरेसे पैसे नसतात असे टॅलेंटेड लोकं थिएटर जॉईन करतात. बरेचसे कलाकार जसे की इरफान खान आणि खूप सारे सुपरस्टार आहेत जे थिएटर मधून फिल्म इंडस्ट्री मध्ये पदार्पण केले आहेत. फिल्म हा ग्लॅमरस क्षेत्र आहे. परंतु थिएटर हा आपल्या मातीशी जोडलेला क्षेत्र आहे. यामध्ये तुम्हाला तुमच्या एक्टिंगला अजून प्रभावी बनवण्याची संधी मिळते. थिएटर जॉईन करणारा विद्यार्थी किंवा ॲक्टर याच्या अंगी एक वेगळेच प्रकारची एक्टिंग स्किल उत्पन्न झालेली असते. तो कुठलाही रोल सहजरित्या पार करू शकतो.

Also Read- Air Hostess काय असते ? Full Information | Uplift Career in 2025

4. Rehearsal आणि प्रॅक्टिस

कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला नाव कमवायचे असेल तर तुम्हाला त्या क्षेत्राशी निगडित प्रॅक्टिस करणे खूप गरजेचे आहे. त्याचप्रमाणे फिल्मी दुनियेत देखील एक्टिंग करियर घडवायची असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस करणे खूप गरजेचे आहे. कुठलाही सुपरस्टार हा एका रात्री फेमस झालेला नाही. त्याकरिता त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. आपल्या skills वर काम केलेले आहे. जी कला त्यांच्याकडे नाही आहे ती शिकलेली आहे. त्यामुळे तुम्हाला देखील प्रॅक्टिस निरंतर करत राहावी लागणार आहे. आपल्या परिवारामध्ये, मित्रांमध्ये कुठल्याही एका सिनेमाचा scene करू शकता किंवा सत्य आधारित असलेला सीन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आता सध्या तर सोशल मीडियावर तुम्ही आपल्या एक्टिंग स्किल्सला शेअर करू शकता.

मोबाईल मध्ये तुम्ही एक्टिंग रेकॉर्ड करू शकता आणि तुमची एक्टिक मध्ये असलेल्या कमतरता चेक करू त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करू शकता. प्रॅक्टिस केल्याने एक्टिंग मध्ये तुमचा आत्मविश्वास हा वाढत जातो. घरी जर प्रॅक्टिस करायची असल्यास तर तुम्ही आरशासमोर येऊन प्रॅक्टिस करू शकता. याने तुमचा आत्मविश्वास वाढणार. आपल्या प्रत्येकाच्या घरी टीव्ही आहे. घरी प्रॅक्टिस करताना त्या टीव्ही सिरीयलचा कुठलाही एक सीन प्रॅक्टिस करायचा. याने तुम्हाला डायलॉग बोलण्यात, त्याचे हावभाव देण्यात, हालचाली करण्यात सोपे जाईल आणि तुमच्या एक्टिंग मध्ये आत्मविश्वास येईल.

5. सोशल मीडिया मार्केटिंग

सध्याच्या काळात यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, अशा बऱ्याचशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बरेच लोक आपल्या व्हिडिओ बनवून अपलोड करत आहे. त्यांना त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जर तुमच्या अंगी टॅलेंट आहे तर ते तुम्ही यूट्यूब, इंस्टाग्राम वर व्हिडिओ अपलोड करून लोकांपर्यंत पोहोचू शकता. सध्याच्या युगामध्ये बॉलीवूड मध्ये एक्टिंग करायला किंवा ॲक्टर बनायला खूप स्पर्धा लागलेली आहे. तर बरेचसे लोकं यूट्यूब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या एक्टिंगचे स्किल्स टाकून व्हिडिओ तयार करत आहेत. इतकेच नव्हे तर यूट्यूब वर त्यांनी स्वतः हाऊस देखील उघडलेले आहेत. आधी शॉर्ट मूव्हीज माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचत आहेत.

आपल्या टॅलेंटला ते दाखवून फेमस होत आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून बरेच लोकं डायरेक्टर आणि प्रोड्यूसर नजरेमध्ये आलेले आहे. आपल्याला माहीत आहे की सोशल मीडियावर फेमस झालेला व्यक्ती याला कुठल्या ना कुठल्या टीव्ही सिरीयल किंवा फिल्म किंवा ad मध्ये ठेवले जाते. इतकेच नव्हे तर टीव्ही रियालिटी शो मध्ये देखील यांना बोलावले जाते. यूट्यूब वर बरेच लोकं शॉर्ट फिल्म्स बनवत आहेत. फक्त मोबाईलचा वापर करीत आहेत. त्यांच्यामध्ये असलेला टॅलेंट हा मोबाईल मध्ये रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये देखील निरखून येत आहे.

6. एक्टिंगशी रिलेटेड पुस्तके वाचा

बरेचसे मोठे मोठे ॲक्टर आणि सुपरस्टार लोक एक्टिंगला सुधारण्याकरिता एक्टिंग बद्दल पुस्तके वाचत राहतात. ही पुस्तके तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमात मिळतील. यामध्ये तुम्हाला शिकवले जाते की ॲक्टर कसे बनायचे, ऍक्टिंग मध्ये करिअर कसा घडवायचा, ऑडिशन कसे द्यायचे, ऑडिशन देताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे, फिल्म इंडस्ट्री मध्ये कसे जायचे, अजून कुठल्या जॉब्स आहे याबद्दल तुम्हाला माहिती मिळत असते. ही पुस्तके मोठमोठ्या सुपरस्टार, डायरेक्टर, प्रोड्युसर, स्कूल मध्ये शिकवणाऱ्या लेक्चरर द्वारा लिहिली जाते. या पुस्तकांमध्ये त्यांच्या जीवनाचा पूर्ण अनुभव लिहिलेला असतो.

7. स्वतःचा पोर्टफोलिओ बनवा

कुठल्याही डायरेक्टरला किंवा प्रोड्यूसरला तुम्हाला अप्रोच करायचे आहे तर त्यांना तुमचा पोर्टफोलिओ दाखवायचा असतो. यामध्ये तुमचे फोटो असतात. या फोटो अल्बम मध्ये एका फोटोग्राफर कडून काढलेले फोटो असतात आणि तुम्हाला जेव्हा देखील संधी मिळेल तर हा पोर्टफोलिओ तुम्ही डायरेक्टर आणि प्रोड्यूसरला दाखवू शकता. या फोटोला तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्राम वर देखील अपलोड करू शकता. सोशल मीडियावर तुम्ही अपलोड केलेली तुमची फोटो ही रात्री मध्ये व्हायरल होऊ शकते.

8. तुमच्या पर्सनॅलिटी आणि शरीराकडे लक्ष ठेवावे

मॉडलिंग आणि सिनेमा मध्ये तुमच्या शरीराची आणि तुमच्या पर्सनॅलिटी कडे आकर्षित केंद्र असते. या क्षेत्रामध्ये पर्सनॅलिटी आणि शरीर यष्टी खूप महत्त्वाची भूमिका काम करत असते. तुमचे लुक्स वर तुमची image असते त्यामुळे तुम्ही gym जॉईन करा आणि चांगली बॉडी बनवा.

9. मिळेल तिथे ऑडिशन द्या

कुठल्याही ॲक्टरला काम करायचे असल्यास त्याने ऑडिशन देणे खूप गरजेचे आहे. हे ऑडिशन डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर घेत असतात. कुठल्याही टीव्ही सिरीयल आणि सिनेमासाठी हे ऑडिशन घेतल्या जाते. हे ऑडिशन कुठल्याही प्रोडक्शन हाऊस किंवा स्टुडिओ मध्ये घेतले जातात. ऑडिशन कुठे सुरू आहे हे माहीत करून घेणे तुमचे काम आहे त्याकरिता तुम्ही सोशल मीडियाचा वापर करू शकता.

जेव्हा तुम्ही ऑडिशन द्यायला जातात तर कास्टिंग डायरेक्टर तुमच्या लुक्स आणि पर्सनॅलिटी त्याच बरोबर तुमच्या कॉन्फिडन्स वर मार्क्स देत असतो आणि तुम्ही कुठल्या रोलसाठी सूटेबल आहात याबद्दल तो ठरवत असतो.

ऑडिशन डायरेक्टर तुम्हाला एक स्क्रिप्ट देतो. या स्क्रिप्ट मध्ये काही डायलॉग्स दिलेले असतात. ही स्क्रिप्ट वाचून तुम्हाला काही वेळातच आपल्या एक्टिक कौशल्याच्या बळावर तुम्हाला कास्टिंग डायरेक्टरला इम्प्रेस करायचे असते. ऑडिशन दिल्यानंतर तुम्ही घरी परत येत असता आणि जर तुम्ही दिलेला ऑडिशन हा कास्टिंग डायरेक्टरला आवडला असल्यास तो तुम्हाला सिलेक्शन लेटर पाठवत असतो. फोन करून दिले जाते. ऑडिशन करताना फक्त तुमचे नाव आणि मोबाईल नंबर एवढीच माहिती मागितली जाते.

पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट ऑडिशन घेत असलेला व्यक्ती हा कधीही पैशाची माग करत नसतो. जो कोणी व्यक्ती ऑडिशन करिता तुमच्या कडून पैशाची डिमांड करेल असा व्यक्ती हा खोटा आहे. बॉलीवूडमध्ये बरेचसे सुपरस्टार आहे ज्यांनी आपल्या सुरुवातीच्या काळामध्ये खूप ऑडिशन दिले आहेत. हे ऑडिशन तुम्ही मराठी, हिंदी, भोजपुरी अशा अनेक भाषेमध्ये बनणाऱ्या सिनेमे करिता देऊ शकता.

Top Acting School in India

  • National School of Drama, Delhi
  • Film and Television institute of India, Pune
  • Delhi Film Institute, New Delhi
  • Barry John Acting Studio, Mumbai
  • Zee Studio of Media Arts, Mumbai
  • Ramesh Sippy academy of Cinema and Entertainment, Mumbai

Top Actor in India

  1. Shahrukh Khan
Shahrukh Khan
Source- Instagram

2. Salman Khan

Salman Khan
Source- Instagram