चार्टर्ड अकाउंटंट कसे बनायचे? How to become CA? CA course 2024-2025 पूर्ण माहिती!

How to become CA- आजच्या युगात फायनान्स आणि अर्थ क्षेत्रात खूप प्रगती होत चाललेली आहे आणि या संधीचा फायदा आजकालची युवक घ्यायला तयार आहेत. फायनान्स आणि अर्थ क्षेत्रामध्ये आपले करिअर बनवण्यासाठी आजकालच्या युवा पिढीमध्ये होड लागलेली आहे. भारताची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस मजबूत होत चाललेली आहे आणि याच कारणामुळे युवा पिढीला फायनान्स सेक्टरमध्ये आपल्या करिअरची चांगली ग्रोथ होण्याची संभावना दिसत आहे. त्यामुळे फायनान्स क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांची गरज वाढत चालली आहे. जर तुम्ही देखील या क्षेत्रामध्ये आपले करिअर घडू इच्छिता तर सीए बनने हा एक उत्तम पर्याय असू शकतो. तर या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेऊया की सीए कसे बनायचे How to become CA.

how to become CA
How to become CA

आजकाल विद्यार्थ्यांमध्ये सीए बनण्याची तयारी ही दहावीनंतर सुरू होते. दहावीनंतर अकरावी बारावी मध्ये ते कॉमर्स क्षेत्र निवडतात.

कॉमर्स म्हणजे काय? What is commerce?

कॉमर्स (Commerce) हा विज्ञान (Science) आणि कला (Arts) या विषयांसारखाच एक बारावी मध्ये शिकवला जाणारा विषय आहे. या विषयामध्ये तुम्हाला अकाउंटिंग (Accounting), ऑडिटिंग (Auditing) याबद्दल माहिती मिळते. कॉमर्स विषयाबद्दल सांगायचे झाले तर व्यापार आणि व्यवसाय यांच्या क्रियांशी संबंधित असणारा अभ्यास. अकरावी आणि बारावी मध्ये कॉमर्स ही ब्रांच निवडल्यानंतर तुम्हाला मुख्यतः अर्थशास्त्र (Economics), व्यवसाय (Business) आणि अकाउंटन्सी (Accountancy) या विषयांचा सखोल अभ्यास होतो. त्याचप्रमाणे गणित (Maths), इन्फॉर्मेशन (Information), इंटरप्रेनॉरशिप (Entrepreneurship) या विषयांच्या देखील अभ्यास होतो.

सीए बनण्यासाठी तुम्हाला बारावी नंतर सीए फाउंडेशन CA Foundation ची एक्झाम उत्तीर्ण करण्याची गरज पडते. या फाउंडेशन एक्झाम साठी तुम्हाला चार विषय यांचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही सीए इंटरमीडिएट CA Intermediate एक्झाम साठी क्वालिफाय होता. सीए इंटरमीडिएट परीक्षेमध्ये तुम्हाला सहा सब्जेक्ट अभ्यास करायचे असतात आणि शेवटची परीक्षा म्हणजे सीए फायनल CA Final ची परीक्षा असते. CA फायनल या परीक्षेमध्ये सहा सब्जेक्ट (Subject) असतात.

तुम्हाला सीए बद्दल कम्प्लीट सिल्याबसची (Syllabus) माहिती या वेबसाईटवर मिळून जाईल – www.icai.org

📖12वी सायन्स नंतर Top Career Options.जाणून घ्या तुमच्यासाठी कुठले बेस्ट!

सीए कोण असतो? What is CA?

सीए बनण्या अगोदर आपल्याला सीए कोण असते (What is CA), सीए चे काम काय असते हे जाणून घेणे गरजेचे आहे. सीए चे काम हे अर्थ लेखी-जोखी आणि त्यांची मॅनेजमेंट करणे असते. सीए हा एक अर्थ सलाहकार म्हणून देखील लोकांचे व्यवहार खाते सांभाळतो. त्याचप्रमाणे तो कर आणि फायनान्स रिलेटेड माहिती व्यापार करणाऱ्या लोकांना पुरवतो.

सीए या नावाचा फुल फॉर्म काय आहे? What is the full form of CA?

सीए चा फुल फॉर्म हा चार्टर्ड अकाउंटंट Chartered Accountant असं असतो.

सीए बनण्यासाठी पात्रता (How to become CA-Eligibility)

सीए बनण्यासाठी तुम्हाला बारावीची परीक्षा पास करणे गरजेचे असते. त्यानंतर तुम्हाला Commerce Stream मधून पदवी उत्तीर्ण करायची असते. तुमची पदवी ही किमान 55 टक्क्यांची असायला गरजेचे आहे.

Steps on How to become CA-

सीए बनण्याकरता सर्वोत्तम उपाय असे की दहावीनंतर तुम्हाला अकरावी बारावी मध्ये वाणिज्य किंवा कॉमर्स ही स्ट्रीम निवडायची असते. बारावीची परीक्षा पास केल्यानंतर तुम्हाला सीए फाउंडेशन CA Foundation कोर्स साठी रजिस्ट्रेशन करायचे असते. सीए फाउंडेशन मध्ये चार विषय असतात आणि या चार विषयांवर तुमची परीक्षा होत असते. खालील दिलेले असे चार विषय आहेत-

  1. Accounts
  2. Business Laws
  3. Quantitative Aptitude
  4. Business Economics

या चारही विषयांमध्ये कमीत कमी 40 टक्के गुण घेणे गरजेचे असते आणि पूर्ण चारही पेपर मिळून तुम्हाला पन्नास टक्के (50%) गुण घेणे गरजेचे असते. चारही पेपर मिळून तुम्हाला 200 मार्क्स घेणे गरजेचे असते. 200 मार्क्स घेतल्यानंतर तुम्ही सीए फाउंडेशनची परीक्षा उत्तीर्ण होता.

सीए फाउंडेशनची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला सीए इंटरमीडिएट CA Intermediate या परीक्षेसाठी रजिस्टर करणे गरजेचे असते. इंटरमिजिएट परीक्षेमध्ये तुम्हाला सहा पेपर्स असतात जे की दोन ग्रुप मध्ये विभाजित केले असतात. खालील दिलेले सहा विषय आहेत-

  • Subjects Of Group 1
    • Advanced Accounting
    • Corporate and Other Laws
    • Taxation
  • Subjects Of Group 2
    • Cost and Management Accounting
    • Auditing and Ethics
    • Financial Management and Strategic Management

इंटरमीडिएटची परीक्षा पूर्ण उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला दोन वर्षाची आर्टिकल ट्रेनिंग (Article Training) पूर्ण करण्याची गरज असते. ही आर्टिकल ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सीएच्या फायनल परीक्षेसाठी पात्र ठरता. सीए फायनल CA Final या परीक्षेमध्ये तुम्हाला सहा सब्जेक्ट दिलेले जातात जे की दोन ग्रुप मध्ये विभाजित केले असतात. खालील दिलेले हे सहा विषय आहेत-

  • Subjects Of Group 1
    • Financial Reporting
    • Advanced Financial Management
    • Advanced Auditing, Assurance and Professional Ethics
  • Subjects Of Group 2
    • Direct Tax Laws and International Taxation
    • Indirect Tax Laws
    • Integrated Business Solutions

📖वकील (Vakil) कसं बनायचं? How to become a Vakil?

सीए फाउंडेशन कोर्स करिता काय करावे?

बारावीनंतर सीए बनण्याकरिता तुम्हाला सीए फाउंडेशन CA Foundation ही परीक्षा देणे गरजेचे असते. त्याकरिता तुम्हाला सीए फाउंडेशन कोर्स करणे गरजेचे आहे. हा कोर्स अगोदर CPT च्या नावाने ओळखला जायचा जो की एंट्रन्स टेस्ट म्हणून होता. परंतु नंतर याचे नाव सीएफ फाउंडेशन (CA Foundation) कोर्स असे करण्यात आले आणि बारावीनंतर यात रजिस्ट्रेशन केला जातो. विद्यार्थ्याला ICAI च्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून सिए फाउंडेशन कोर्ससाठी रजिस्टर करायचे असते. मे 2025 साठी रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे या रजिस्ट्रेशनची अंतिम तारीख 1 जानेवारी 2025 आहे.

सीए फाउंडेशन कोर्स साठी रजिस्टर केल्यानंतर हे रजिस्ट्रेशन तीन वर्षासाठी मान्य राहते. जर तुम्ही तीन वर्षांमध्ये सीए फाउंडेशनची परीक्षा उत्तीर्ण करू शकले नाही. तर तुम्हाला सीए फाउंडेशनसाठी नवीकरण करणे गरजेचे पडते. या सीए फाउंडेशनची कोर्स फी 9800 ठेवलेली आहे. ही फक्त रजिस्ट्रेशन फी आहे. बरेचशे विद्यार्थी कोचिंग घेतात. सीए फाउंडेशन कोर्स साठी त्या कोचिंगची फीस ही वेगळी असते.

सीए फाउंडेशन परीक्षेसाठी अभ्यास कसे करायचे?

सीए फाउंडेशन मध्ये रजिस्ट्रेशन झाल्यानंतर चार महिन्यानंतर याची परीक्षा होत असते. या परीक्षेसाठी ऍडमिट कार्ड (Admit Card) मिळते. हे ऍडमिट कार्ड घेणे गरजेचे आहे. याशिवाय तुम्हाला परीक्षा देता येणार नाही. सीए फाउंडेशन कोर्सची परीक्षा दर वर्षी मे आणि नोव्हेंबर महिन्यात होत असते. सीए फाउंडेशन या परीक्षेमध्ये चार पेपर असतात. तीन तासाचा हा पेपर असतो. सगळ्या पेपर मध्ये शंभर (100) अंक दिले जातात. उत्तीर्ण होण्यासाठी चारही विषयांमध्ये कमीत कमी 40% गुण असणे आवश्यक आहे आणि चारही पेपर मिळून 50 टक्के गुण घेणे गरजेचे आहे. खालील दिलेले पेपर आणि त्यांचे गुण आहेत-

  1. Accounts (100 Marks)
  2. Business Laws (100 Marks)
  3. Quantitative Aptitude (100 Marks)
    • Business Mathematics (40 Marks)
    • Logical Reasoning (20 Marks)
    • Statistics (40 Marks)
  4. Business Economics (100 Marks)

सीए इंटरमीडिएट परीक्षेसाठी रजिस्टर कसे करावे?

एकदा की तुम्ही सीए फाउंडेशनची परीक्षा उत्तीर्ण झालात की त्याच्यानंतर तुम्ही सीए इंटरमीडिएट कोर्स साठी पात्र होतात. यामध्ये तुम्हाला फाउंडेशन रूटच्या (Foundation Route) माध्यमातून सिए फाउंडेशन परीक्षा पास केल्यानंतर इंटरमीडिएट परीक्षेसाठी रजिस्टर करायचे असते. दुसऱ्या पर्याय असं की डायरेक्ट एन्ट्री रूट (Direct Entry Route). सर तुम्ही कुठल्याही क्षेत्रातून पदवी अभ्यासक्रम किंवा उच्च पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झाले असाल तर सीए फाउंडेशनची परीक्षा देण्याची गरज नसते. ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये Commerce Stream मध्ये किमान 55% आणि अन्य Stream साठी 60% गुण आवश्यक आहे. सीए इंटरमीडिएटचे रजिस्ट्रेशन चार वर्षांपर्यंत मान्य राहते. सीए इंटरमीडिएट या कोर्सची फीज 18 हजार रुपये निर्धारित केली गेलेली आहे. खालील दिलेले पेपर आणि त्यांचे गुण आहेत-

  • Subjects Of Group 1
    • Advanced Accounting (100 Marks)
    • Corporate and Other Laws (100 Marks)
    • Taxation (100 Marks)
  • Subjects Of Group 2
    • Cost and Management Accounting (100 Marks)
    • Auditing and Ethics (100 Marks)
    • Financial Management and Strategic Management (100 Marks)

सीए आर्टिकलशिप Articleship साठी अप्लाय कसे करायचे?

सीए इंटरमीडिएटच्या परीक्षेमध्ये तुम्हाला एका ग्रुपचे पूर्ण पेपर चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण व्हायची गरज पडते. एक ग्रुप पास केल्यानंतर विद्यार्थी आर्टिकलशिप साठी पात्र ठरतात. ही आर्टिकलशिप ट्रेनिंग तीन वर्षांची असते. या आर्टिकलशिप ट्रेनिंगच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना AICITSS ही ट्रेनिंग देखील पूर्ण करणे गरजेचे असते. आर्टिकलशिप ट्रेनिंग ही सीएच्या विद्यार्थ्यांकरीता खूप महत्त्वाची ठरते. या ट्रेनिंग मधूनच विद्यार्थ्याला व्यवहारिक अनुभव आणि ते काय काम करणार आहेत याबद्दल माहिती मिळते.

सीए फायनल CA Final परीक्षासाठी रजिस्ट्रेशन कसे करायचे?

सीए इंटरमीडिएटचे दोन्ही ग्रुप पास केल्यानंतर दोन वर्षाची आर्टिकल शिफ्ट ट्रेनिंग पूर्ण करण्याची गरज असते. हे दोन्ही टप्पे पार केल्यानंतर विद्यार्थी सीए फायनल CA Final परीक्षेसाठी पात्र ठरतो. सीए बनण्यासाठी ही खूप कठीण परीक्षा आहे. या परीक्षेसाठी वर्षातून कधीही अप्लाय Apply करता येतो. CA फायनल कोर्सच्या रजिस्ट्रेशनला 32 हजार 300 रुपये फीज आहे. एकदा सीए फायनल कोर्ससाठी रजिस्टर केल्यानंतर याची मुदत पाच वर्षापर्यंत असते. जर तुम्ही पाच वर्षांमध्ये सीए फायनलची परीक्षा उत्तीर्ण करत नाही तर पाच वर्षानंतर तुम्हाला पुन्हा रजिस्ट्रेशन करणे गरजेचे असते. खालील दिलेले सहा पेपर आहेत-

  • Subjects Of Group 1
    • Financial Reporting
    • Advanced Financial Management
    • Advanced Auditing, Assurance and Professional Ethics
  • Subjects Of Group 2
    • Direct Tax Laws and International Taxation
    • Indirect Tax Laws
    • Integrated Business Solutions

सीए फायनलची परीक्षा पास केल्यानंतर तुम्हाला ICAIमध्ये रजिस्ट्रेशन करणे गरजेचे पडते. इथे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला चार्टर्ड अकाउंटंटची लायसन्स मिळते. लायसन्स मिळाल्यानंतर तुम्ही स्वतंत्रपणे चार्टर्ड अकाउंटंटचे काम करू शकता. चार्टर्ड अकाउंटंट ही खूप रिस्पेक्टेबल जॉब आहे. या जॉब मध्ये सॅलरी आणि पगार देखील चांगला मिळतो.

📖पायलट(Pilot) कसं बनायचं? Eligibility Criteria, Admission Process, Course, Fees, Salary

FAQs on How to become CA

1.दहावीनंतर How to become CA साठी कुठला क्षेत्र निवडावा?

दहावीनंतर अकरावी बारावीसाठी तुम्ही commerce वाणिज्य हा क्षेत्र निवडावा.

2. सीए बनने कठीण असते का?

सीए बनण्याची परीक्षा ही थोडी कठीण असते. परंतु सातत्यपूर्ण नियोजन आणि कठोर परिश्रमाने तुम्ही ही परीक्षा पास करून सीए बनू शकता.

3. सीए बनल्यानंतर नोकरी मिळते का?

होय सीए बनल्यानंतर तुम्ही बड्या कंपनीमध्ये नोकरीला लागू शकता. त्यात तुम्हाला पगार देखील चांगला मिळू शकतो.

4. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सीए कसे बनायचे? (How to become CA after graduation?)

ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सीए बनण्याकरता विद्यार्थ्याला डायरेक्ट इंटरेस्ट स्कीम direct entry scheme असते. या स्कीम मध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर सीए फाउंडेशनची परीक्षा वगळीता इंटरमीडिएटची परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करणे गरजेचे असते. इंटरमीडिएटचे परीक्षा नंतर सीए फायनल पर्यंतची प्रक्रिया ही सारखीच असते.

5. सीए बनण्याकरिता कोचिंगची गरज असते का?

जी विद्यार्थी स्वतःहून अभ्यास करून परीक्षा देतात त्यांना सीए बनण्याकरिता थोडीशी अडचण येऊ शकते. कारण की सीए बनण्याकरिता त्याच्या टेक्निकल terms समजणे हे खूप गरजेचे असते. कोचिंग जॉईन केल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी सहजरीत्या समजू शकतात. तिथल्या अनुभवी शिक्षकांच्या माध्यमातून तुम्हाला नवनवीन गोष्टींची माहिती होते. त्याचप्रमाणे कोचिंगचे शिक्षक तुम्हाला ही परीक्षा पास करण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करतील.

6. सीए बनायला किती वर्षे लागतात? (How to become CA in 5 years?)

बारावीनंतर सीएचा कोर्स पाच वर्षांचा असतो. परंतु सीएची परीक्षा कठीण असल्याकारणाने याला उत्तीर्ण करण्यासाठी attempt देखील जास्त लागतात. विद्यार्थीला परीक्षा पास करण्यासाठी जितके attempts लागतील, सीए बनायला तितकाच वेळ लागेल.

जर तुम्हाला या ब्लॉगमधून How to become CA या विषयावर माहिती मिळाली असेल आणि ती माहिती आवडली असेल तर आपल्या विद्यार्थ्यांमध्ये, आपल्या मित्रांमध्ये या How to become CA ब्लॉगला नक्की शेअर करा.

Leave a Comment