Petroleum Engineering: आजच्या धावत्या युगात इंधनाचा मोठा वापर केला जात आहे. फॅक्टरी असो वा वाहन किंवा घरी वापरण्यात येणारी गॅस या सगळ्या इंधनाचा खूप वापर होत आहे. त्यामुळे जगभरात Crude Oil and Gas Exploration आणि त्याचे प्रोडक्शन ही एक मोठी इंडस्ट्री बनलेली आहे. हे सगळे इंधन एके दिवशी समाप्त होणार आहेत. यांचा साठा पृथ्वीवर खूप कमी आहे.
त्यामुळे यांची मागणी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्यामुळे नवीन पेट्रोलियम रिसोर्सेस शोधणे ही एक आधुनिक काळाची गरज बनलेली आहे. याच पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये पेट्रोलियम इंजिनियर Petroleum Engineering याची मागणी वाढलेली आहे. 2026 पर्यंत पेट्रोलियम इंजिनियर साठी 20% मागणी वाढणार आहे. त्यामुळे युवा विद्यार्थ्यांचा लक्ष या इंडस्ट्री कडे वळत चाललेला आहे. पेट्रोलियम इंजीनियरिंग काय असते आणि या क्षेत्रामध्ये आपले करिअर घडवण्यासाठी काय करावे लागते हे या What is Petroleum Engineering ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊया.
Table of Contents
पेट्रोलियम इंजिनियर कोण असते?
पृथ्वीच्या गर्भातून कच्च्या तेल, प्राकृतिक गॅस ह्या गोष्टी खनन करण्यासाठी लागणाऱ्या विविध टेक्निक आणि कार्यप्रणाली यांचे डिझाईन आणि डेव्हलपमेंट करणाऱ्या एक्सपर्ट लोकांना पेट्रोलियम इंजिनियर म्हटले जाते. यांची काम करण्याची भूमिका मुख्यतः जिऑलॉजिस्ट सोबत असते. कंप्युटर सिमुलेशन करून वेगवेगळ्या साइट्सवर कच्च्या तेल आणि नॅचरल गॅसची भविष्यवाणी करणे अशी यांची कामे असतात. त्याचप्रमाणे खनन किंवा एक्स्ट्रक्शन करणे हे देखील यांची कामं असतात.
पेट्रोलियम इंजिनियरची कामे? (Petroleum Engineering Jobs)
पेट्रोलियम इंजिनियर कसे बनायचे What is Petroleum Engineering हे जाणून घेण्याअगोदर पेट्रोलियम इंजिनियर ही कुठले कामे करतात हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे. वरील माहितीनुसार आपल्याला कल्पना आली असेल की पेट्रोलियम इंजिनियरचे काम हे पृथ्वीतला प्राकृतिक गॅस, तेल आणि त्यांच्याशी संबंधित वस्तू खनन करून काढणे अशी असतात. याच सोबत खणन केलेल्या वस्तूंचे संगोपन करणे, त्याला रिफायनिंग करणे आणि सुरक्षित उपकरणांपर्यंत पोहोचवणे हे देखील असतात. खालील दिलेली काही पेट्रोलियम इंजिनियरची कामे आहेत-
गॅस आणि तेल प्राप्त करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक उपकरणांची डिझाईन करणे, खनन करण्याकरिता ड्रिलिंग करणे, खनन केलेल्या गॅस आणि कच्च्या तेलाची रिफायनिंग करणे जास्तीत जास्त कच्च्या तेल मिळेल यासाठी योजना आखणे, ऑइल फिल्ड उपकरण स्थापित करणे, जिओलॉजिकल साईटची कॉलिटी समजणे, साइटवर सुरू असलेल्या खननची मॉनिटरिंग करणे, केलेल्या उत्पादनांची रिसर्च करणे, प्रोडक्शन कॉस्टिंगला कमीत कमी करणे.
मर्चंट नेव्ही(How to join Merchant Navy)-करिअर, कोर्स, जॉब आणि लाखोंची सॅलरी!
पेट्रोलियम इंजीनियरिंग मध्ये काय शिकायला मिळते? (Petroleum Engineering Subject Knowledge)
पेट्रोलियम इंजीनियरिंग Petroleum Engineering ही इंजिनिअरिंगची एक ब्रांच आहे ज्यामध्ये कच्च्या तेल, प्राकृतिक गॅसच्या प्रॉडक्शन, त्याचे खनन, त्याचे संगोपन यांचे अध्ययन केले जाते. पेट्रोलियम इंजीनियरिंग केलेल्या ग्रॅज्युएट Graduate पदवीधर लोकांना पेट्रोलियम इंजिनिअर अशी उपाधी मिळालेली आहे. ही लोकं प्राकृतिक रसायनांच्या शोधात असतात. या कामांमध्ये पेट्रोलियम जिओलॉजी, ड्रिलिंग, जिओ फिजिक्स आणि या सिस्टमशी निगडित इकॉनॉमिक्स या संपूर्ण विषयाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ड्रिलिंग करून तेल आणि प्राकृतिक गॅस सुरक्षित आणि कमी दरामध्ये उत्पादन करणे, उत्पादन केलेल्या गॅसची प्रोसेसिंग करणे ही पेट्रोलियम इंजिनिअरची जिम्मेदारी असते. या फिल्डमध्ये काम करण्याकरिता काही आवश्यक कौशल्यांची गरज असते.
कंप्यूटर डिझाईनिंग सॉफ्टवेअर (Computer Aided Design Software)- पेट्रोलियम इंजिनियर खनन करणाऱ्या उपकरणांची डिझाईन करण्याकरिता या सॉफ्टवेअरचा उपयोग करतात. या सॉफ्टवेअरच्या उपयोगातून डिझाईनिंग आणि ब्लू प्रिंट तयार केले जातात. त्याचप्रमाणे डेटा एनालिसिस आणि सिमुलेशन या सॉफ्टवेअरने पूर्ण होतात. त्याचप्रमाणे त्यांना ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा देखील ज्ञान असणे आवश्यक आहे.
Team Work– पेट्रोलियम इंजिनियर हे प्रोजेक्ट मॅनेजर सोबत काम करतात. विविध साइट्सवर त्यांना टीम मध्ये काम करणे गरजेचे असते. त्यामुळे टीम मध्ये सोबत काम करण्याची कौशल्य त्यांच्या अंगी असायला हवी.
Communication Skills– एखाद्या प्रोजेक्ट बद्दल माहिती देणे, प्रेझेंटेशन देणे आणि मीटिंगमध्ये आपले विचार Board of Directors समोर मांडणे याकरिता कम्युनिकेशन स्किलची आवश्यकता असते. त्यामुळे एक प्रभावी कम्युनिकेशन स्किल्स असलेला व्यक्ती पेट्रोलियम इंजीनियरिंग या क्षेत्रामध्ये उंच भरारी घेऊ शकतो.
कॉस्ट ऍनॅलिटीक्स आणि इकॉनॉमिक्स स्किल– एक चांगला पेट्रोलियम इंजिनियर प्रोजेक्टला लागणारी किंमत किंवा बजेट, कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन याकडे जास्त लक्ष देतो. त्यांचा मुख्य कर्तव्य ऑपरेशन कॉस्ट कमी करून कंपनीला फायदा पोहोचवणे असते.
पेट्रोलियम इंजीनियरिंग साठी स्टेप बाय स्टेप गाईड (Petroleum Engineering Step by Step guide)
खालील दिलेल्या माहितीनुसार पेट्रोलियम इंजीनियरिंग (Petroleum Engineering) कसे करायचे याबद्दल जाणून घेऊ.
- बारावी उत्तीर्ण करणे – इंजिनिअरिंग करण्याकरिता बारावी मध्ये पीसीएम (PCM) विषयांमध्ये चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण करायची असते. Physics, Chemistry, Maths या विषयांमध्ये चांगले मार्क्स घेतल्यानंतर पेट्रोलियम इंजीनियरिंगसाठी आवेदन करता येते. मेरीट आलेल्या मुलांना अधिक मान्यता दिली जाते.
- इंजीनियरिंगची पदवी पूर्ण करणे- बारावीची परीक्षा पास केल्यानंतर पेट्रोलियम इंजिनियर या संबंधित क्षेत्रामध्ये पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणे. डिग्री चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होणे.
- इंटर्नशिप पूर्ण करणे – पदवी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर इंटर्नशिपसाठी अप्लाय करणे गरजेचे असते. या इंटर्नशिपमध्ये पेट्रोलियम इंजीनियरिंग या क्षेत्राशी निगडित कामे विद्यार्थ्यांकडून करून घेतली जातात. त्यामध्ये विद्यार्थ्यांना पेट्रोलियम इंजीनियरिंगमध्ये काय कामे असतात याची माहिती मिळते. त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी इंटर्नशिप करण्याची गरज पडते. इंटर्नशिप केल्यानंतर विद्यार्थ्यांचे त्या क्षेत्राशी निगडित स्किल्स आणि कौशल्य वाढतात. त्याचप्रमाणे प्रॅक्टिकल अनुभव देखील मिळतो. पेट्रोलियम इंजीनियरिंग फिल्डशी संबंधित वर्क कल्चरची माहिती होते.
- उच्च पदवीसाठी अप्लाय करणे – पदवी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर पेट्रोलियम इंजिनियरमध्ये उच्च पदवीसाठी अभ्यास करू शकतात. त्यामध्ये पेट्रोलियम रिफायनिंग आणि पेट्रोल केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम एक्सप्लेन या इंजीनियरिंग मध्ये मास्टर्स डिग्री मिळू शकते. मास्टर्स करण्याकरिता पदवीमध्ये शिकवलेले विषय जसे की फ्लूट मेकॅनिक, अप्लाइड जिओलॉजी, सर्विंग, न्यूमरिकल मेथड या विषयांचा देखील सखोल अभ्यास होतो. बड्या कंपन्यांमध्ये पेट्रोलियम इंजीनियरिंगमध्ये मास्टर्स डिग्री असलेले विद्यार्थ्यांची खूप मागणी आहे.
- CV/रिझ्युम बनवा – CV आणि रिझ्युम कुठल्याही बड्या कंपनीमध्ये मागितले जातात. या CV/रेझुम मध्ये तुमचे शैक्षणिक आणि त्या क्षेत्राशी निगडित कार्य अनुभव या विषयाची माहिती मिळते. याच सोबत रिलीव्हेंट स्किल्स आणि एक्सपिरीयन्स प्रदर्शित करणाऱ्या CV मध्ये पोटेन्शिअल एम्प्लॉयर्सला निवडण्याची संधी दिसते. त्यामुळे एक अट्रॅक्टिव्ह CV बनवणे गरजेचे असते.
पायलट(Pilot) कसं बनायचं? Eligibility Criteria, Admission Process, Course, Fees, 1लाखची Salary!
पेट्रोलियम इंजीनियरिंग कोर्सेस (Petroleum Engineering Courses)
पेट्रोलियम इंजीनियरिंग करण्याकरिता प्रोफेशनल कोर्सेसची यादी खालील प्रमाणे आहे.
Level | Courses |
---|---|
Diploma in Engineering | Diploma in Heavy Oil Power Engineering |
Bachelor of Engineering | B.E. in Petroleum Engineering B.E. in Applied Petroleum Engineering B.E. in Petrochemical Engineering B.E. in Petroleum Reservoir and Production Engineering |
Master of Engineering | M. Tech in Petroleum Exploration M. Tech in Petroleum Refining and Petrochemical Engineering |
Ph. D | Doctor of Philosophy in Petroleum Engineering |
पेट्रोलियम इंजीनियरिंगसाठी भारतातील टॉप युनिव्हर्सिटी (Best Universities for Petroleum Engineering)
- IIT BOMBAY – www.iitb.ac.in
- IIT MADRAS – study.iitm.ac.in
- IIT GUWAHATI – www.iitg.ac.in
- IIT DHANBAD – www.iitism.ac.in
- प्रेसिडेन्सी विश्वविद्यालय – presidencyuniversity.in
- ग्राफिक एरा युनिव्हर्सिटी – geu.ac.in
- एमिटी स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, नोएडा – amity.edu
पेट्रोलियम इंजिनियरचा पगार (Petroleum Engineering Salary in India)
एका पेट्रोलियम इंजिनियरचा पगार हा त्याच्या अनुभव, कौशल्य, नॉलेज आणि कंपनी या गोष्टींवर अवलंबून असतो. भारतामध्ये एक पेट्रोलियम इंजिनियरचा पगार हा आठ लाख ते दहा लाख रुपये वर्षाचा असतो. खालील दिलेल्या जॉब प्रोफाइल्सच्या अनुसार वार्षिक सॅलरी किती हे माहित होईल.
Job Profile | Average CTC in INR |
---|---|
Chief Petroleum Engineer | 20,00,000 |
Petroleum Geologist | 11,00,000 |
Drilling Engineer | 18,00,000 |
Offshore Drilling Engineer | 10,00,000 |
FAQs about Petroleum Engineering
1.पेट्रोलियम इंजीनियरिंग मध्ये कुठले कोर्सेस येतात?
- B.E. in Petroleum Engineering
- B.E. in Applied Petroleum Engineering
- B.E. in Petrochemical Engineering
- B.E. in Petroleum Reservoir and Production Engineering
2.पेट्रोलियम इंजिनियर कोण असते?
पृथ्वीच्या गर्भातून कच्च्या तेल, प्राकृतिक गॅस ह्या गोष्टी खनन करण्यासाठी लागणाऱ्या विविध टेक्निक आणि कार्यप्रणाली यांचे डिझाईन आणि डेव्हलपमेंट करणाऱ्या एक्सपर्ट लोकांना पेट्रोलियम इंजिनियर म्हटले जाते.
3.पेट्रोलियम इंजिनियर बनण्याकरता कुठल्या कौशल्याची गरज पडते?
- Team Work
- Knowledge of Advanced Technology
- Communication Skills
- Analytical Skills etc
4.पेट्रोलियम इंजीनियरिंगचे शिक्षण परदेशात घेता येते का?
हो पेट्रोलियम इंजीनियरिंगचे शिक्षण परदेशात जाऊन देखील घेता येते. खालील दिलेले काही टॉप युनिव्हर्सिटी आहेत-
- National University of Singapore
- Texas University
- Stanford University
- Imperial College London
- Adelaide University
- Alberta University
- Technological University of Denmark
वरील दिलेल्या ब्लॉग मधील माहिती तुम्हाला आवडली असल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा आणि करिअर बद्दल अधिक माहिती मिळवण्याकरिता आमचा ब्लॉग Vidyarthiyash नेहमी वाचा.