आज आपण पायलट कसे बनायचे (How to become a Pilot) याची पूर्ण माहिती घेणार आहोत. आपल्या देशात विविध प्रकारचे जॉब (Job) आहेत. त्याच जॉब मधली एक जॉब म्हणजे पायलट. लहानपणी आकाशात उडणाऱ्या विमानला पाहून सगळ्यांना विचार येतो की पायलट कसे बनायचे, पायलट बनण्यासाठी काय योग्यता पाहिजे आणि पायलट बनण्याकरिता सुरुवात कशी करायची याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. या ब्लॉगमध्ये आपण पायलट काय आहे, पायलट बनण्याची एलिजिबिलिटी क्रायटेरिया (Eligibility Criteria) काय आहे, त्याची ऍडमिशन प्रोसेस (Admission Process) काय असते, पायलट बनण्याकरिता कुठले एक्झाम (Exam) द्यावे लागतात आणि पायलट बनण्याकरिता त्याच्या कोर्सची फीस (Fees) किती असते आणि पायलट बनल्यानंतर करिअर (Career) कसा असतो, त्याचबरोबर पायलटची सॅलरी (Salary) किती असते हे आपण या ब्लॉगमध्ये माहिती घेणार आहोत.
Table of Contents
पायलट काय असते (What is Pilot)?
पायलट हा आकाशात विमान चालवणाऱ्याला म्हटले जाते. परंतु तांत्रिक भाषेत याला Air Crew Officer असे देखील म्हटले जाते. पायलट चे काम हे विमानाच्या उडानावर नियंत्रण ठेवणे आणि संचालन करणे असते.
पायलट कसे बनायचे (How to Become a Pilot)?
पायलट बनण्यासाठी विद्यार्थ्याला दहावीनंतरच पायलट बनण्याची तयारी सुरू करायची असते. दहावीनंतर विद्यार्थ्याला बारावीमध्ये Physics आणि Mathematics या विषयात किमान 50 टक्के मार्क्स आणायचे असते. सध्या तरी भारतामध्ये खूप सारे Aviation Schools आणि Flying Clubs सुरू झालेले आहेत. पायलट बनण्याकरिता विद्यार्थ्याला Entrance Exam क्लियर करणे असते. Entrance Exam क्लियर करून नंतर Admission करून पायलट बनवण्याची ट्रेनिंग सुरू होत असते. ट्रेनिंग चे काही लेव्हल्स असतात. ते लेवल्स उमेदवाराला पार करत जावे लागते.
पायलट कोर्स (Pilot Courses)
पायलट कोर्स करण्याआधी उमेदवाराला ट्रेनिंग लायसन्स प्राप्त करणे आवश्यक असते. प्रायव्हेट पायलट लायसन्स (Private Pilot License) मिळवण्यासाठी एका वर्षाची ट्रेनिंग असते. ज्याच्यामध्ये सरासरी 40 ते 60 तासांची फ्लाईंग ट्रेनिंग होते. याचबरोबर कमर्शियल पायलट लायसन्स (Commercial Pilot License) मिळवण्यासाठी तीन वर्षाची ट्रेनिंग असते. याच्यामध्ये फ्लाईंग ट्रेनिंग ही 200 तासांची होत असते.
📖 मर्चंट नेव्ही (Merchant Navy)-करिअर, कोर्स, जॉब आणि लाखोंची सॅलरी!
पायलट बनण्याची पात्रता (Eligibility Criteria)
पायलट बनण्यासाठी उमेदवारामध्ये खालील पात्रता असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराची आय साईट (Eye sight) चांगली असणे गरजेचे आहे.
- आय साईट (Eye sight) 6/6 असायला पाहिजे.
- उमेदवार पूर्णपणे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सुदृढ असणे आवश्यक आहे.
- बारावीची परीक्षा उत्तीर्ण असला पाहिजे.
- उमेदवार बारावी मध्ये Physics आणि Mathematics या विषयात किमान 50 टक्के गुण घेणे अनिवार्य आहे.
पायलट बनण्यासाठी प्रवेश परीक्षा (Entrance Exam)
भारतामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकॅडमी(Indira Gandhi Rashtriya Udan Academy) दरवर्षी पायलट बनण्यासाठी प्रवेश परीक्षा आयोजित करत असते.
अधिक माहितीसाठी या संकेतस्थळावर भेट द्या- https://www.igrua.gov.in
पायलेट बनण्यासाठी लायसन्स (License of Pilot)
पायलट बनण्यासाठी उमेदवाराला लायसन्स ची गरज असते. ही लायसन्स ट्रेनिंग करून प्राप्त केली जाते. पायलट लायसन्स मिळण्यासाठी उमेदवाराला ट्रेनिंग करणे गरजेचे असते. कुठल्याही उमेदवाराला ट्रेनिंगच्या वेळेस सगळ्यात अगोदर स्टुडन्ट पायलट लायसन्स (Student Pilot License) मिळते आणि त्याच्यानंतर प्रायव्हेट पायलट लायसन्स (Private Pilot License) मिळते आणि सगळ्यात शेवट जेव्हा ट्रेनिंग पूर्ण होते तेव्हा कमर्शियल पायलट लायसन्स (Commercial Pilot License) मिळते.
पायलट ट्रेनिंग कोर्स आणि फीस (Course & Fees)
पायलट ट्रेनिंग ही भारतातील इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकॅडमी (Indira Gandhi Rashtriya Udan Academy) मध्ये केली जाते. हा एक फ्लाईंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (Flying Training Institute) आहे जो कमर्शियल पायलट बनण्याची ट्रेनिंग देते. पायलट ट्रेनिंग कोर्स ही प्रत्येक कॉलेजेस मध्ये वेगवेगळी असू शकते. सरासरी पायलट ट्रेनिंगची फीज (Fees) हे 5 लाख ते 17 लाख पर्यंत असू शकते. काही खाजगी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये याची फीज 60 ते 70 लाख असते.
पायलट बनवण्याची वय मर्यादा (Pilot Age limit)
पायलट बनवण्यासाठी उमेदवाराची वय ही 17-18 वर्षे पूर्ण झालेली असावी. पायलट बनण्याची सर्वाधिक वय 60 ते 65 वर्षे पर्यंत असू शकते.
पायलट चा करियर (Pilot Career)
पायलट ची लायसन्स मिळाल्यानंतर ते प्रायव्हेट प्लेन लायसन्स (Private Plane License) सोबत छोटे विमान उडवण्याकरिता पात्र ठरतात. त्याच्यानंतर को पायलट (Co Pilot) अशी त्यांची बढती होते. ट्रेनिंग आणि इन्स्ट्रक्शन साठी देखील त्यांना तीन ते पाच वर्ष फ्लाईंग एक्सपिरीयन्स (Flying Experience) असणे गरजेचे असते. उमेदवार कमर्शियल पायलट लायसन्स (Commercial Pilot License) किंवा एअरलाइन ट्रान्सपोर्ट पायलट लायसन्स (Airline Transport Pilot License) सोबत मिलिटरी किंवा पॅरामिलिटरी खात्यात देखील आपला करिअर सुरू करू शकते. या वरील सर्व गोष्टी निपुण असलेले जेट प्लेन (Jet Plane) उडवण्याकरिता पात्र ठरतात.
पायलट बनण्याचे फायदे व तोटे (Pros & Cons of being Pilot)
फायदे–
- चांगला पगार
- उत्तम नोकरी
- आंतरराष्ट्रीय दौरे
तोटे–
- ट्रेनिंग साठी लागणारा खर्च हा जास्त आहे
- लायसन्स मिळवण्यासाठी देण्यात येणाऱ्या परीक्षेची लेव्हल ही कठीण असते.
- खराब वातावरणात विमान उडवण्याचा धोका.
पायलट बनल्यानंतर पगार किती? (Salary of Pilot)
भारतामध्ये एक सर्वसाधारण पायलटच्या करिअरची सुरुवात ही 21 व्या वर्षी होत असते. 21 व्या वर्षी करिअरला सुरुवात झाल्यावर त्यांचा पगार सरासरी 1 लाख रुपये प्रति महिन्याला असतो. विमान चालवणाऱ्या कॅप्टनची (Captain) सॅलरी ही दहा लाख रुपये प्रति महा पर्यंत असू शकते.
FAQs on Pilot
1.पायलट बनण्यासाठी कुठला अभ्यासक्रम करावा लागतो?
👉पायलट बनण्यासाठी उमेदवाराला दहावीनंतर बारावी मध्ये Science stream घ्यायची गरज पडते.
2. पायलट बनण्याची वयोमर्यादा किती?
👉पायलट बनण्याची वयोमर्यादा हे सतरा वर्षे ते साठ वर्षे पर्यंत असू शकते.
3. पायलट चा पगार किती असतो?
👉पायलट चा पगार सरासरी चार ते पाच लाख रुपये महिना असतो. पायलट चा पगार हा त्याच्या अनुभवावर देखील अवलंबून असतो. सगळ्यात जास्त पगार कॅप्टनला मिळत असतो. कॅप्टनचा पगार सरासरी दहा लाख रुपये महिना असू शकतो
4. पायलट आणि एअर होस्टेस (Air Hostess) याच्यात काय फरक आहे?
👉पायलट हा विमानाला उडवण्याचे, त्याला नियंत्रित ठेवण्याचे काम करतो तर एअर होस्टेसचे (Air Hostess) काम विमानातील प्रवाशांची देखभाल करणे असते.
5. पायलट ची ट्रेनिंग कठीण असते काय?
👉पायलट ची ट्रेनिंग तशी थेरॉटिकल (Theoretical) कमी आणि प्रॅक्टिकल हॅन्ड एक्सपिरीयन्स (Practical Hand Experience) जास्त असते.
6. पायलट होणे ही सरकारी नोकरी आहे काय?
👉नाही. पायलट ही खाजगी नोकरी आहे.
7. वर्षभरात पायलटला किती तास काम करावे लागतात?
👉पायलटला कमीत कमी 900 तासांची एका वर्षात उडान घेणे गरजेचे असते. परंतु काही देशात एका वर्षात हजार तासांची उडान केले गरजेचे आहे.
8. मेकॅनिकल इंजिनियरिंग केल्यानंतर पायलट बनू शकतो का?
👉हो मेकॅनिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर आपण पायलट बनू शकतो. याच्यामध्ये दोन क्रायटेरिया असते. एक म्हणजे फक्त आवडीसाठी आणि एक म्हणजे जर आपल्याला पायलट या क्षेत्रात करिअर बनवायचे असेल. फक्त आवडीसाठी आपल्याला प्रायव्हेट पायलट लायसन्स (Private Pilot License) हे गरजेचे असते आणि करिअरच्या दृष्टिकोनातून आपल्याला कमर्शियल पायलट लायसन्स (Commercial Pilot License) गरजेचे असते. मेकॅनिकल इंजीनियरिंग नंतर पायलट बनण्याकरिता आपल्याला Class II मेडिकल टेस्ट Approved by DGCA (Directorate General of Civil Aviation) doctor देणे गरजेचे असते.
9. पायलटला महिन्यात किती सुट्ट्या मिळतात?
👉पायलटला सुट्ट्या मिळणे हे त्या कंपनी वर अवलंबून असते. परंतु साधारणतः आंतरराष्ट्रीय फेरी करणाऱ्या पायलटला कमीत कमी दहा ते पंधरा दिवस एका महिन्यात सुट्ट्या असतात.
10. भारतामध्ये पायलट ट्रेनिंग सेंटर कुठे आहेत?
- ब्लू डायमंड एव्हिएशन, पुणे (Blue Diamond Aviation, Pune)
- इंटरनॅशनल स्कूल ऑफ एव्हिएशन नवी दिल्ली (International School of Aviation, New Delhi)
- एक्यूमेन स्कूल ऑफ पायलट ट्रेनिंग, दिल्ली (Acumen School of Pilot Training, Delhi)
- इंडियन एविएशन अकॅडमी, मुंबई (Indian Aviation Academy, Mumbai)
- एशियाटिक इंटरनॅशनल एव्हिएशन अकॅडमी, इंदोर (Asiatic International Aviation Academy Indore)
11. पायलट बनण्याची ट्रेनिंग आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपली नोकरी कुठल्या कंपन्यांमध्ये लागते?
- IndiGo
- SpiceJet
- Air India
- Air Costa
- India Jet Airways
- Alliance Air
- Air Asia
12. पायलट बनायला किती वेळ लागतो?
👉 ट्रेनिंग (Training) आणि परीक्षा (Exams) उत्तीर्ण होणे यामध्ये साधारणतः तीन वर्षे लागतात.
13. किती प्रकारचे पायलट आहेत?
- एअरलाईन पायलट
- कॉर्पोरेट पायलट
- लडाखू विमान पायलट
- चार्टर पायलट
जर तुम्हाला पायलट बनण्याची माहिती या ब्लॉग वरून आवडली असेल तर कृपया करून या माहितीला आपल्या मित्र परिवारात शेअर करा आणि स्वप्नांच्या आकाशात विमानासारखी उंच भरारी घ्या.