भारतामध्ये हॉटेल्सची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. इंडियन हॉटेल्स दिवसेंदिवस प्रगतीपथावर आहे. एका रिपोर्टनुसार हल्ली भारतामध्ये 53 हजार पेक्षा अधिक हॉटेल्स आहेत. या रिपोर्टनुसार असे समजते की भारतामध्ये हॉटेल इंडस्ट्री दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आज कालच्या युवा पिढीमध्ये हॉटेलमध्ये राहण्याची इच्छा वाढत चाललेली आहे. हॉटेल मॅनेजमेंट ही अशी इंडस्ट्री आहे ज्याच्यामध्ये रिसेशन खूप कमी पाहायला मिळते.
भारतामध्ये हॉटेल इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात विकास सुरू आहे. नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून हॉटेल इंडस्ट्रीला अजून सुदृढ आणि फ्लेक्झिबल येत आहे. त्याचप्रमाणे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये ऑनलाइन बिजनेस हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग बनलेला आहे. ऑनलाइन फूड डिलिव्हरी जसे की Zomato, Swiggy सारख्या बड्या कंपन्या हॉटेल इंडस्ट्रीला नवीन रूप देत आहेत. येणाऱ्या काळामध्ये हॉटेल इंडस्ट्रीची खूप गरज राहणार आहे. त्यामुळे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये करियर बनवणे हा एक चांगला करियर मार्ग ठरू शकतो.भारताचे युवक हॉटेल इंडस्ट्रीचे कोर्स करून परदेशाच्या मोठ्या हॉटेलमध्ये चांगल्या पगाराची नोकरी करतात.
Hotel Management Courses after 12th
भारतामध्ये हॉटेल मॅनेजर बनण्याकरिता बारावीनंतर बरेच कोर्सेस उपलब्ध आहेत. त्यामधील एक कोर्स म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट कोर्स. ज्याप्रमाणे भारतामध्ये हॉटेलची संख्या वाढत चाललेली आहे त्याचप्रमाणे हॉटेल मॅनेजरची आवश्यकता देखील वाढत चाललेली आहे. दरवर्षी भारतामध्ये पर्यटन वाढत आहे त्यामुळे हॉटेल इंडस्ट्री देखील वाढत आहे. त्यामुळे हॉटेल मॅनेजर पोस्ट साठी खूप ग्रोथ आहे. या Hotel management courses after 12th ब्लॉगमध्ये आपण याविषयी माहिती घेणार आहोत.त्याचप्रमाणे Hotel management course in Kolkata fees याबद्दल देखील माहिती घेणार आहोत. तर हा ब्लॉग पूर्ण वाचा.
Table of Contents
हॉटेल मॅनेजर कोणाला म्हटले जाते? What is Hotel Manager?
जो व्यक्ती हॉटेल किंवा रिसॉर्ट च्या विविध गतिविधियांना मॅनेज करतो अशा व्यक्तीला हॉटेल मॅनेजर (Hotel Manager) म्हटले जाते. हॉटेल मॅनेजरचे काम असते की हॉटेल आणि रिसॉर्ट मध्ये विविध कामांची देखरेख करणे. त्याच सोबत आपल्या सहयोगी कर्मचारी सोबत काम करणे, हॉटेलमध्ये प्रोफेशनलीजम बनवून ठेवणे आणि हॉटेल किंवा रिसॉर्टमध्ये आलेल्या गेस्ट पाहुण्यांची खातिरदारी करणे. हॉटेल मॅनेजरचे काम गेस्ट लोकांची खातिरदारी करणे इतकेच नव्हे तर हॉटेल व्यवसायामधील ऑपरेशनचे कार्यभार सांभाळणे देखील असते. त्याचप्रमाणे हॉटेल मॅनेजर सुनिश्चित करतात की त्यांच्या हॉटेल्समध्ये दिलेली सेवा ही उत्कृष्ट आहे. सोबतच हॉटेल मॅनेजर अकाउंटिंग, रेवेन्यू मॅनेजमेंट, लॉजिस्टिक आणि हॉटेलला मिळालेला बजेट आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंट ह्या देखील गोष्टींवर काम करतो.
📖Petroleum Engineering करा आणि कमवा 1,00,000 रुपये सॅलरी! What is Petroleum Engineering?
हॉटेल मॅनेजरचे विस्तारित काम? Hotel Manager Work
हॉटेल मॅनेजर हा हॉटेल ऑपरेशन सांभाळतो. त्याचप्रमाणे हॉटेल संबंधित तक्रारी सोडवणे आणि त्या तक्रारी भविष्यात येऊ नये यासाठी स्ट्रॅटेजी बनवणे, रिपोर्ट तयार करणे असे अनेक जिम्मेदारीची कामे असतात. आऊटसाईड वेंडर व्यवहारिक संबंध टिकवून ठेवणे आणि आलेल्या गेस्टला उत्कृष्ट अशी सेवा प्रदान करणे. अशी कामे हॉटेल मॅनेजर करत असतात. खालील दिलेली विस्तारित कामे आहेत –
- रिसेप्शन, हाउसकीपिंग, किचन स्टाफ या लोकांच्या कामांवर सुपरव्हिजन करणे आणि त्यांच्या कामात आलेली अडचण/ अडथळे दूर करणे. त्यांना सल्ला देणे.
- हॉटेल्स इंडस्ट्रीमध्ये ऑपरेशन्स स्ट्रॅटेजीक रित्या पार पाडणे. भविष्यामध्ये आलेल्या तक्रारीसाठी योजना आखणे. येणाऱ्या हॉटेल संबंधित फायनान्स बजेट मॅनेज करणे आणि सेल्स आणि प्रॉफिट यावर भर देणे.
- हॉटेलमध्ये मिळालेल्या सेवा यांना उत्कृष्ट बनवणे. मार्केटिंगवर प्रभाव देणे जेणेकरून हॉटेलचे नाव हॉटेल इंडस्ट्री मध्ये होणार.
- हॉटेलमध्ये आलेल्या गेस्टचे फीडबॅक घेणे.
- हॉटेलला मेंटेन करणे. हॉटेल्स मध्ये सफाई आणि स्वच्छता याच्याकडे कटाक्षाने लक्ष देणे.
- ट्रॅव्हल एजन्सी, डिस्ट्रीब्यूटर, आऊटसाईड वेंडर यांच्या संयोगाने हॉटेलचे बिजनेस वाढवणे आणि हॉटेल्समध्ये देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट सेवांचे निरीक्षण करणे आणि त्यांना उत्कृष्ट बनवण्यासाठी प्रयत्न करणे.
Hotel management courses after 12th हॉटेल मॅनेजमेंट कोर्सेस
खालील दिलेल्या काही हॉटेल मॅनेजमेंट कोर्सेसची नावे आहेत. दहावीनंतर डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट करता येतो. त्याचप्रमाणे Hotel Management courses after 12th बारावीनंतर देखील हॉटेल मॅनेजमेंटचे कोर्सेस उपलब्ध आहेत. नामांकित विद्यालयातून किंवा युनिव्हर्सिटी मध्ये खाली दिलेले कोर्सेस उपलब्ध आहेत.
- Diploma Course in Hotel Management
- Bachelor in Hotel Management
- PG Diploma in Hotel Management
- Master of Hotel Management
- MSc in Strategic Hotel Management
- Master of International Hotel Management
- Master of International Hospitality Management
- Master of Tourism
- Hotel and Event Management
- MSc in Hospitality and Tourism Management
हॉटेल मॅनेजमेंट या विषयावर आमच्या वेबसाईटवर पोस्ट केलेली वेब स्टोरी Web Story वाचा- https://vidyarthiyash.com/web-stories/hotel-management-courses-after-12th/
उत्कृष्ट हॉटेल मॅनेजर बनायला कुठले स्किल्स असणे गरजेचे आहे? Hotel Manager Skills Required
- Leadership Skills
- Communication Skills
- Strategy building Skills
- Marketing Skills
- Team Work
- Pressure Handling Skills
- Observational and inspection Skills
- Technical Skills
- Accounting and analytics Skills
- Open Mindset
📖12वी सायन्स नंतर Top Career Options.जाणून घ्या तुमच्यासाठी कुठले बेस्ट!
बारावीनंतर टॉप युनिव्हर्सिटी हॉटेल मॅनेजमेंट करिता Hotel Management Courses after 12th Top Universities
- Institute of Hotel management, Catering and Nutrition – ihmpusa.net
- Army Institute of Hotel Management and Catering Technology – aihmctbangalore.edu.in
- Dr. Ambedkar Institute of Hotel Management Catering and Nutrition – www.ihmchandigarh.org
- Hotel management Institute, Kolkata – www.iihm.ac.in
- Hotel management Institute, Mumbai – www.iihm.ac.in
- Hotel management Institute, Chennai – www.iihm.ac.in
- Hotel management Institute, Hyderabad – www.iihm.ac.in
- Hotel management Institute, Lucknow – www.iihm.ac.in
Image Gallery-
Image Credits- All the above images are taken from Google Images and for educational Purpose only.
📖मर्चंट नेव्ही(How to join Merchant Navy)-करिअर, कोर्स, जॉब आणि लाखोंची सॅलरी!
हॉटेल मॅनेजमेंट कोर्ससाठी पात्रता (Hotel management course eligibility)
- हॉटेल मॅनेजमेंट कोर्ससाठी 10+2 सोबत कुठल्याही stream मध्ये 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
- प्लेन ग्रॅज्युएशन केल्यानंतरही हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करता येतो.
- जर तुम्हाला एखादी सरकारी इन्स्टिट्यूट मधून हा कोर्स करायचा असेल तर तुम्हाला खालील एंट्रन्स एक्झाम देणे गरजेचे आहे –
- NCHMCT JEE, AIHMCT, AIMA UGAT BHM
- खाजगी संस्था एंट्रन्स एक्झाम स्वतः घेत असतात.
- विद्यार्थी एंट्रन्स एक्झाम पास केल्यानंतर कोर्ससाठी लागणाऱ्या ग्रुप डिस्कशन, ॲप्टीट्यूड टेस्ट आणि पर्सनल इंटरव्यू या गोष्टींना सामोरे जावे लागते.
- परदेशात हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करायचे असल्यास तुम्हाला IELTS, TOEFL या परीक्षेचे गुण सादर करणे गरजेचे असते करणे.
हॉटेल मॅनेजमेंट कोर्स मध्ये प्रवेश करण्याकरिता लागणारी आवश्यक कागदपत्रे Hotel Management Course Documents Required
खालील दिलेली कागदपत्रेची यादी आहे –
- शाळा सोडल्याचा दाखला
- जात प्रमाणपत्र
- नॉन क्रिमीलेअर
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- दहावी-बारावीचे मार्कशीट
- प्रवेश अर्ज
- पासपोर्ट फोटो
- बँक पासबुक
- IELTS/TOEFL TEST SCORE
- LETTER OF RECOMMENDATION – LOR
- STATEMENT OF PURPOSE – SOP
- PORTFOLIO
- CV/RESUME
- PASSPORT
हॉटेल मॅनेजर जॉब रोल्स Hotel Manager Job roles
हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्स केल्यानंतर तुम्हाला विचार आला असेल की आपल्या करिअरमध्ये आपल्याला काय काम करावे लागणार. हॉटेल इंडस्ट्री मध्ये हॉटेल मॅनेजमेंट कोर्स केल्यानंतर हॉटेल मॅनेजरला विविध प्रकारचे जॉब रोल्स दिले जातात. खालील दिलेले काही जॉब रोल्स आहेत –
- Property or Hotel Manager
- Sales Manager
- Banquet Manager
- General Manager
- Vendor or Distributor Relation Manager
- Housekeeping Manager
हॉटेल मॅनेजर कुठल्या क्षेत्रामध्ये कामाला असतात
- Hotels
- Resorts
- Banquets
- Airlines
- Crew Management
- Merchant Navy – 📖 मर्चंट नेव्ही (Merchant Navy)-करिअर, कोर्स, जॉब आणि लाखोंची सॅलरी!
- Hospitality
- Catering
- Self Employment
टॉप रिक्रुटींग कंपन्या (Top Recruiters in Hotel Management Industry)
- The Taj Group of Hotels
- Oberoi Group of Hotels
- Radisson Hotel Group
- Ginger Hotels
- Hyatt Hotels
- Thomas Cook
- Marriott International, Inc
हॉटेल मॅनेजमेंट कोर्स फी Hotel Management Course Fees
Course Level | Avg. Fees in INR |
---|---|
Certificate | Up to 50,000/- |
Diploma | Up to 3,00,000/- |
Degree | Up to 5,00,000/- |
Masters | Up to 10,00,000/- |
हॉटेल मॅनेजमेंट कोर्स सॅलरी Hotel Management Course Salary in India
Hotels | Hotel Management Course Salary in India |
---|---|
The Taj Group of Hotels | 8-10 Lakhs |
Ginger Hotels | 6-8 Lakhs |
Hyatt Hotels | 10-12 Lakhs |
FAQs on Hotel Management Course after 12th
1.हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करणे हा उत्तम जॉब आहे का?
खालील दिलेल्या काही कारणांवरून आपण हॉटेल मॅनेजमेंटला चांगली नोकरी म्हणू शकतो.
- उत्तम पगार
- गुणवत्ता पूर्ण जीवन
- करिअर ग्रोथ
- भरपूर रोजगार
2.हॉटेल मॅनेजमेंट कोर्स किती वर्षाचा असतो?
साधारणतः हॉटेल मॅनेज कोर्स हा त्याच्या कोर्स लेव्हलवर अवलंबून असतो. सरासरी हा कोर्स तीन ते चार वर्षांचा असतो. बारावी केल्यानंतर (Hotel Management Courses after 12th) तुम्ही कुठला कोर्स निवडता यावर हे अवलंबून असते.
3.परदेशात हॉटेल मॅनेजरला किती सॅलरी मिळते?
परदेशामध्ये हॉटेल मॅनेजर म्हणून नोकरीला लागल्यावर वर्षाला 50000 डॉलर इतका पगार मिळतो.
4.कोलकत्ता मधल्या हॉटेल मॅनेजमेंट कोर्सची फीस किती? Hotel management course in Kolkata fees?
कोलकत्ता मध्ये हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करायचे असल्यास तिथे बरेचशे हॉटेल मॅनेजमेंट कोर्स प्रदान करणारे कॉलेजेस आहेत. खालील दिलेले काही कॉलेजेस आणि त्यांची फीज
Hotel Management Course in Kolkata Fees in Average is INR 50,000/- to INR 5,00,000/-
There are two best Government Colleges in Kolkata- IHM Kolkata and MAKAUT
हॉटेल मॅनेजमेंट कोर्स आफ्टर ट्वेल्थ Hotel Management Course after 12th हा आर्टिकल वाचून तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट कोर्स कसा करायचा याची माहिती मिळाली असेल. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नक्की शेअर करा. अशाच करिअर बद्दल आर्टिकल वाचण्यासाठी www.vidyarthiyash.com ला नेहमी भेट द्या.
5.हॉटेल मॅनेजमेंटचे कोर्सेस कठीण असतात का?
नाही. हॉटेल मॅनेजमेंट कठीण नसतात. परंतु विद्यार्थ्याला या कोर्सेस करतानी कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे जेणेकरून त्यांचे बड्या कंपन्यांमध्ये, बड्या हॉटेल्समध्ये प्लेसमेंट होऊ शकेल.
6.हॉटेल मॅनेजमेंट चे कोर्स करून मला दुबई मध्ये किंवा अमेरिकेमध्ये मोठ्या हॉटेलमध्ये नोकरी मिळू शकेल का?
हॉटेल मॅनेजमेंटचे कोर्स करताना तुम्हाला हॉटेल इंडस्ट्री मध्ये होणाऱ्या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती प्रदान केली जाते. बड्या कंपन्यांमध्ये किंवा बड्या हॉटेल्समध्ये नोकरी मिळण्याकरिता तुमच्या अंगी इतर कौशल्य देखील असणे गरजेचे आहे. तुम्हाला तुमच्या कौशल्यावर आणि तुमच्या प्रोफेशनवर खूप काम करावे लागणार.