ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, योजनेचे लाभ, आवेदन कसे करायचे, अधिकृत वेबसाईट, ओबीसी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, (Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana, How to apply, Official Website, Savitribai Phule Scholarship for OBC students, Savitribai Phule Scholarship form PDF)
Savitribai Phule Scholarship –Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana– नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! आजच्या ब्लॉगमध्ये आपण ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार द्वारा नवीन योजना विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचे नाव “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” असे आहे. ही योजना महाराष्ट्र सरकार द्वारा 2024 पासून सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना आपण जीवन निर्वाहासाठी प्रतिवर्ष 60000/- रुपये पर्यंत भत्ता प्रदान करण्यात येणार आहे. या योजनेबद्दलची पूर्ण विवरण खालील ब्लॉगमध्ये दिलेले आहेत.
सरकारकडून गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना 60000 रुपयांची आर्थिक मदत मिळते. या पैशांचा वापर करून ती आपल्या शैक्षणिक गरजा जसे की राहण्याची सोय, भोजन आणि उदरनिर्वाह यासाठी करू शकतात. या योजनेचा फायदा मुख्यतः ओबीसी वर्गातील आर्थिक दृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना सरकारद्वारे साठ हजार रुपयाची मदत मिळणार आहे. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी गावापासून दूर शहरांमध्ये शिक्षण घेत आहेत आणि असे काही विद्यार्थी जे शहरात जाऊन आपले शिक्षण पूर्ण घेऊ शकत नाही, अशा ओबीसी वर्गातील गरीब विद्यार्थ्यांना सरकारद्वारे प्रति वर्ष 60000/- रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे.
“ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” या योजनेच्या अंतर्गत पात्र उमेदवारांना 60000 ची देणगी मिळत असून त्या देणगीचा उपयोग ते भोजन, निवास आणि शैक्षणिक गरजा पूर्ण करणे यासाठी वापरू शकतात. प्राप्त धनराशी ही वेगवेगळ्या शहरात वेगवेगळी असू शकते. जर तुम्ही देखील ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले आधार योजना मध्ये Apply करून या योजनेचे लाभ घेऊ इच्छिता, तर खाली दिलेली जानकारी जसे की आवेदन कसे करायचे, या योजनेला पात्र ठरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, या योजनेची अधिकृत वेबसाईट, या योजनेचे लाभ, या योजनेसाठी पात्रता इत्यादी माहिती वाचावी.
त्याचप्रमाणे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या विविध योजनांच्या माहितीसाठी vidyarthiyash.com ला नेहमी भेट देत चला.
Table of Contents
ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले आधार योजना काय आहे? What is Savitribai Phule Scholarship?
महाराष्ट्र राज्यातील ओबीसी वर्गातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने नवीन योजना सुरू केलेली आहे. त्या योजनेचे नाव “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” असे आहे. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाकरिता राहण्यासाठी दरवर्षी साठ हजार रुपयांची आर्थिक मदत प्रदान करण्यात येणार आहे. ही आर्थिक मदत महाराष्ट्र सरकारच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (mahadbt) या पोर्टल द्वारे सरळ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
Savitribai Phule Scholarship – Dyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana Main Points to Focus
Name of Yojana | Dyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana |
Purpose of Yojana | महाराष्ट्र राज्यातील ओबीसी वर्गातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी |
Start of Yojana | 2024 |
Sector of Yojana | महाराष्ट्र राज्य सरकार (Maharashtra State Government) |
Ministry of Yojana | सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग (Social Justice & Special Assistance Department) |
Current Status of Yojana | Active |
Beneficiary of Yojana | For OBC Students |
Apply Process of Yojana | ऑनलाईन/ऑफलाईन (Online/Offline) |
Official Website of Yojana | mahadbt.maharashtra.gov.in |
Helpline no. of Yojana | 022-491-50800 |
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना प्रमुख उद्दिष्टे (Main Points Of Dyanjyoti Savitribai Phule Scholarship)
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत या योजनेअंतर्गत प्रदान करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना विविध कारणांमुळे शासकीय वस्तीगृहात प्रवेश मिळाला नसेल अशा विद्यार्थ्यांकरिता या योजनेचा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे शासकीय वस्तीगृहात प्रवेश मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो आणि चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यानंतर त्यांना शिक्षणाचा पूर्ण खर्च भागवणे हे कठीण जात असते. या सगळ्या बाबींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने व केंद्र सरकारने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू केलेली आहे. या योजनेनुसार पात्र विद्यार्थ्यांना प्रति वर्ष साठ हजार रुपयांचा भत्ता मिळणार आहे.
या आर्थिक मदतीचा उपयोग विद्यार्थी आपल्या शैक्षणिक गरजा राहणे, अन्न आणि इतर शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यास वापरू शकतो. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या विचार न करता विद्यार्थी जास्त प्रमाणात आपल्या शिक्षणावर आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. ही योजना धनगर समाज वगळता ओबीसी समाजातील इतर मागासवर्गातील उच्चशिक्षित विद्यार्थ्यांना समाविष्ट करते. राज्यभरातील एकूण 21,600 विद्यार्थ्यांना ज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील 600 विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना साठी पात्रता (Eligibility For Dyanjyoti Savitribai Phule Scholarship )
2024 साली सुरू झालेल्या “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” या योजनेचे लाभ घेण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी राज्य सरकारने विशिष्ट अशा पात्रता निश्चित केले आहेत. जो विद्यार्थी खालील दिलेली पात्रता पूर्णपणे पार पाडेल तशा विद्यार्थ्यांना या योजनेचे लाभ मिळणार आहे. खालील दिलेली पात्रता
- अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा असून त्याच्याकडे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.
- जर अर्जदार विद्यार्थी अपंग असेल तर 40 टक्के पेक्षा जास्त अपंगत्वाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र जिल्हा शल्यचिकित्सकाकडून मिळेल.
- अर्जदार ओबीसी वर्गातील असणे आवश्यक आहे आणि त्याच्याकडे जात प्रमाणपत्र असा पुरावा असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख पेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
- अर्जदार विद्यार्थ्यांचे बँक खाते हे त्याच्या आधार कार्ड ची लिंक असणे आवश्यक आहे. त्याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे.
- उच्च शिक्षण घेतलेल्या महाविद्यालयांमध्ये 75 टक्के अटेंडन्स Attendance असणे गरजेचे आहे.
- जर कोणी अर्जदार विद्यार्थी अनाथ असेल तर अशा विद्यार्थ्यांना महिला आणि बालकल्याण विभागाकडून अनाथ असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- अर्जदार विद्यार्थी हा दुसऱ्या शहरात शिक्षण घेत आहे आणि वस्तीगृहात किंवा भाड्याने घेतलेल्या खोलीत राहत आहे या गोष्टीचे प्रमाणपत्र किंवा पुरावा असणे आवश्यक आहे.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (Documents for Dyanjyoti Savitribai Phule Scholarship)
2024 साली सुरू करण्यात आलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना योजनेचे लाभ घेण्यासाठी खालील दिलेल्या काही आवश्यक कागदपत्रांची यादी आहे. अर्ज करत असताना या कागदपत्रांची प्रत जोडणे अनिवार्य आहे.
- जात प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- ऍड्रेस प्रूफ Address Proof (राशन कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल, इत्यादी)
- दुसऱ्या शहरात, वस्तीगृहात किंवा भाड्याने खोली करून राहण्याचा नोटरी युक्त पुरावा.
- मोबाईल नंबर
- बँक खाते पासबुक
- बँक खात्याला आधार कार्ड लिंक असल्याचे पुरावा
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- डोमिसाईल किंवा महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला
- सोबतच अर्जदार विद्यार्थ्याने उच्च शिक्षण घेतलेल्या महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट (Bonafide Certificate) इत्यादी असणे आवश्यक आहे.
- त्याचसोबत दहावी आणि बारावी मध्ये मिळालेल्या गुणांची मार्कशीट असणे आवश्यक आहे.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना अंतर्गत भत्ते वितरण
शहराचे नाव | अन्न भत्ता | गृहनिर्माण भत्ता | निर्वाह भत्ता | एकूण दिलेली प्रतिवर्ष आर्थिक मदत |
---|---|---|---|---|
मुंबई, पुणे आणि इत्यादी | 32,000/- रुपये | 20,000/- रुपये | 8,000/- रुपये | 60,000/- रुपये |
महापालिका क्षेत्रातील विद्यार्थी | 28,000/- रुपये | 8,000/- रुपये | 15,000/- रुपये | 51,000/- रुपये |
जिल्हा किंवा तालुका मुख्यालयातील विद्यार्थी | 25,000/- रुपये | 12,000/- रुपये | 6,000/- रुपये | 43,000/- रुपये |
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना चे लाभ (Benefits of Savitribai Phule Scholarship)
- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना हे ओबीसी प्रवर्गातील गोरगरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याकरिता आर्थिक मदत पुरवते.
- ही आर्थिक मदत प्रतिवर्ष साठ हजार रुपये इतकी ठेवलेली आहे.
- या योजनेचा लाभ मागासवर्गीय विद्यार्थी, अनुसूचित जाती, घुमंतू जनजाती आणि विशेष मागासवर्गीय विद्यार्थी यांना मिळणार आहे.
- ही धनराशी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी (DBT) डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा केली जाणार आहे.
- प्रत्येक विभागानुसार लाभार्थ्याला आर्थिक मदत खालील दिलेल्या तक्त्यामध्ये आहे.
- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनाचे लाभ प्रत्येक जिल्ह्यातील सहाशे विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
- या योजनेचे लाभ ओबीसी प्रवर्गातील गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त आणि प्रेरित करणार आहे.
- घुमंतू जनजाती- सी श्रेणीमध्ये येणारे धनगर समाजाचे विद्यार्थी या योजनेचे लाभ घेऊ शकणार नाही.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना साठी आवेदन कसे करायचे? (How to apply for Dyanjyoti Savitribai Phule Scholarship)
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना या योजनेचे लाभ घेण्यासाठी आवेदन करणे गरजेचे आहे.
- सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या जवळच्या जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालय मध्ये भेट द्यावी लागेल.
- कार्यालयामधील संबंधित अधिकारीशी ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले आधार योजना अंतर्गत आवेदन फॉर्म प्राप्त करून घ्यायचे आहे.
- या आवेदन फॉर्मला अचूक भरणे गरजेचे आहे.
- या फॉर्म सोबत आवश्यक लागणारी कागदपत्रे आणि त्यांची प्रत जोडणे आवश्यक आहे.
- भरलेल्या फॉर्मला पुन्हा एकदा चेक करून घेणे गरजेचे आहे.
- पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी करून हा अर्ज समाज कल्याण कार्यालय मध्येच जमा करायचा आहे.
- फॉर्म जमा केल्यानंतर मिळालेल्या रिसिप्टची प्रत तुमच्याजवळ सांभाळून ठेवणे गरजेचे आहे.
- यानंतर आवेदन केलेल्या फॉर्मची पडताळणी होईल आणि फॉर्म भरताना पुरवण्यात आलेल्या सगळ्या गोष्टी बरोबर असतील तर तुम्ही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत पात्र ठरत.
- पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचे लाभ मिळतील.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनाचे लाभ कोण घेऊ शकणार नाहीत?
- असे विद्यार्थी ज्यांनी उच्च शिक्षणासाठी या अगोदर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचे लाभ घेतले असतील अशा विद्यार्थ्यांना पुन्हा पदवीधर किंवा पदवी अभ्यासक्रमाकरिता या योजनेचे लाभ घेता येणार नाही.
- घुमंतू जनजाती- सी श्रेणीमध्ये येणारे धनगर जमातातील विद्यार्थ्यांना या योजनेचे लाभ घेता येणार नाही.
ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले आधार योजनाचा फॉर्म भरण्यासाठी अंतिम तारीख
महाराष्ट्र सरकार द्वारा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना चे फॉर्म स्वीकारण्याची अंतिम तारीख अद्यापी जाहीर केलेली नाही. या योजनेच्या अंतिम तारखेसाठी अर्जदार विद्यार्थी आपल्या शाळेत किंवा महाविद्यालयांमध्ये प्रबंधक अधिकारी सोबत संपर्क करू शकतात.
1. मी ओबीसी प्रवर्गाची आहे? मला ही योजना लाभदायक आहे का?
होय. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना savitribai phule scholarship for obc ओबीसी प्रवर्गासाठी लाभदायक आहे.
2. ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले आधार योजनेचे फॉर्म कुठे मिळतील?
ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले आधार योजने अर्ज अर्जा करिता तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील समाजकल्याण विभागाला संपर्क साधावा लागेल. हा savitribai phule scholarship form pdf फॉर्म तुम्हाला समाज कल्याण मधून मिळणार.