Ladka Bhau Yojana | लाडका भाऊ योजना : महिन्याला मिळतात 10,000 रुपये! Apply Now

Ladka Bhau Yojana
Ladka Bhau Yojana 2024

Ladka Bhau Yojana : नमस्कार मित्रांनो. 2024 मध्ये महाराष्ट्र सरकारने अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आर्थिक बजेट सादर केला. त्या आर्थिक बजेट मध्ये त्यांनी लाडक्या बहिण योजनेची गोष्ट केली होती. या योजनेसोबतच त्यांनी महाराष्ट्रातील तरुण मुलांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका भाऊ योजना (Ladka Bhau Yojana 2024) काढण्याचा निर्णय घेतला. आता महिलांसाठी योजना निघाल्यानंतर पुरुषांसाठी देखील योजना निघणे हे गरजेचे ठरते. या अनुषंगाने महाराष्ट्रातील तरुण मुलांना लाडका भाऊ या योजनेचे लाभ मिळणार आहे. या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेऊया लाडका भाऊ योजना काय आहे, याचे लाभ कसे घ्यायचे, या योजने करिता पात्रता काय, या योजने करिता लागणारे आवश्यक कागदपत्रे आणि या योजनेला अप्लाय कसे करायचे. तर हा ब्लॉग पूर्ण वाचा.

लाडका भाऊ योजना काय आहे? (What is Ladka Bhau Yojana 2024)

लाडका भाऊ योजना 2024 ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारने लाडक्या बहिणी योजनेनंतर महाराष्ट्रातील तरुण मुलांकरिता सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे की ही योजना एक अप्रेंटशिप योजना राहणार आहे. महाराष्ट्रातील तरुण मुलांना या योजनेचे लाभ घेण्याची संधी मिळणार आहे. या योजनेचा फायदा महाराष्ट्र राज्यातील दहा लाख मुलांना मिळणार आहे. या अप्रेंटशिप योजनेमध्ये दहा लाख तरुण मुलांना दर महिन्याला दहा हजार रुपये अशी आर्थिक लाभ मिळणार आहे. पुढील ब्लॉगमध्ये जाणून घेऊया या योजनेचे लाभ कसे घ्यायचे.

Also read: Dyanjyoti Savitribai Phule Scholarship For OBC Students | ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना: सरकार देणार प्रतिवर्ष 60000/- रुपये

अप्रेंटशिप म्हणजे काय ? (What is Apprenticeship?)

ही योजना अप्रेंटशिप योजना असणार आहे. तरी अप्रेंटशिप म्हणजे काय हे जाणून घेऊया. खालील दिलेली माहिती वाचून आपण अप्रेंटशिप म्हणजे काय याबद्दल जाणून घेऊ.

अप्रेंटिस एक प्रशिक्षण प्रणाली असते. त्यामध्ये व्यावसायिक किंवा व्यवसाय संबंधित कामांचे प्रशिक्षणाचे अभ्यासवर्ग घेतले जाते. सोप्या भाषेत म्हणता येईल की व्यवसायिक नोकरीची कामे करावी लागतात. त्या कामाचे ज्ञान हे अप्रेंटशिप करून विद्यार्थ्याला मिळू शकते. हे ज्ञान ज्या प्रशिक्षण प्रणालीतून मिळवले जाते त्याला अप्रेंटशिप असे म्हणतात.

Ladka Bhau Yojana 2024 Key Points

Name of Yojanaलाडका भाऊ योजना
Starting of YojanaMaharashtra Government in 2024
Yojana started byChief Minister Eknath Shinde
Benefits of Yojanaदर महिन्याला दहा हजार रुपये पर्यंत पगार
Beneficiaries of Yojanaमहाराष्ट्र राज्यातील दहा लाख तरुण मुलांकरिता अप्रेंटशिप योजना
Purpose of Yojanaबेरोजगार तरुणांना एक उच्चतम कौशल्य शिकवणे आणि नोकरीची संधी मिळवून देणे
Amount received of Yojanaदर महिन्याला दहा हजार रुपये
Application process of YojanaOnline/Offline
General information about Ladka Bhau Yojana 2024

लाडका भाऊ योजनेचे फायदे (Benefits of Ladka Bhau Yojana 2024)

या प्रशिक्षण प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांना व्यवसायिक ज्ञान दिले जाते ज्यांचा उपयोग करून विद्यार्थी आपल्या भविष्यात येणाऱ्या नोकरीमध्ये वापर करून उच्चतम करिअर घडवू शकतात. सोबतच अप्रेंटशिपचे प्रशिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एक सर्टिफिकेट देखील पदार्थ करण्यात येते. या सर्टिफिकेटच्या आधारावर विद्यार्थी मुलगा त्याच्या सोयीनुसार नोकरीला आवेदन करू शकतो. साधारणतः अप्रेंटशिप करत असताना कमीत कमी आठ हजार ते जास्तीत जास्त बारा हजार दर महिन्याला रुपये मिळत असतात.

Also read: 12वी सायन्स नंतर Top Career Options.जाणून घ्या तुमच्यासाठी कुठले बेस्ट!

लाडका भाऊ अप्रेंटशिप योजना महाराष्ट्र सरकारने महिला योजना यांचा विचार करून आता महाराष्ट्र राज्यातील दहा लाख तरुण मुलांकरिता अप्रेंटशिप योजना देण्याचा निर्णय घेतला आहे. या अप्रेंटशिप योजनेतून दर महिन्याला दहा हजार रुपये पर्यंत पगार मिळणार आहे. या योजनेची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यासाठी महाराष्ट्र सरकार तातडीने परिश्रम करत आहेत. अप्रेंटीशीप योजना मध्ये असे तरुण जे नोकरीच्या शोधात आहेत किंवा बेरोजगार आहेत त्यांना एक उच्चतम कौशल्य शिकवणे आणि नोकरीची संधी मिळवून देते. या योजनेमध्ये विद्यार्थ्याचे कौशल्य विकसित होते. त्यांना प्रदान करण्यात आलेल्या मोफत प्रॅक्टिकल आणि कौशल्य प्रशिक्षण मुळे तरुण मुलं एक शिक्षित आणि व्यावसायिक ज्ञान प्राप्त असलेले तरुण होतात. अप्रेंटशिप त्यांना नोकरीची संधी देत असते.

Also read: पायलट(Pilot) कसं बनायचं? Eligibility Criteria, Admission Process, Course, Fees, 1लाखची Salary!

खालील दिलेल्या तक्त्यामध्ये प्रत्येक शैक्षणिक अर्हतानुसार महिन्याला किती पगार मिळेल याची माहिती दिलेली आहे. ही माहिती नक्की वाचा

Education qualificationMonthly stipend in INR
12th pass6000
ITI / Diploma8000
Graduate / Post Graduate10000
General information of Stipend of Ladka Bhau Yojana 2024

5500 करोड रुपयेचा निधी महाराष्ट्र सरकारने या योजने करिता मंजूर केलेला आहे. अप्रेंटशिपचे प्रशिक्षक घेत असताना त्यांना दर महिन्याला दहा हजार रुपये पर्यंत पगार मिळू शकतो.

लाडका भाऊ योजनेची पात्रता (Eligibility for Ladka Bhau Yojana 2024)

खालील दिलेल्या काही नमूद गोष्टी लक्षात घेता लाडका भाऊ योजनेचे लाभ घेण्यास मदत मिळेल.

  • या योजनेमध्ये / अप्रेंटशिपमध्ये पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना किंवा तरुणांना त्यांच्या जवळपासच्या एखाद्या बड्या कंपन्यांमध्ये नोकरीची किंवा अप्रेंटशिपची संधी मिळू शकते.
  • ही कंपनी महाराष्ट्र राज्य सरकार मध्ये कार्यरत असावी.
  • अर्ज करतानी अर्जदार विद्यार्थ्यांची वय हे 18 वर्षे ते 35 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचा कमीत कमी शिक्षण ही बारावी पास असणे गरजेचे आहे.
  • ITI/DIPLOMA/GRADUATE/POST GRADUATE असलेले विद्यार्थी पात्र आहेत.
  • अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार विद्यार्थी कडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
  • त्याचबरोबर बँकेच्या खात्याशी आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.

Also read: मर्चंट नेव्ही(How to join Merchant Navy)-करिअर, कोर्स, जॉब आणि लाखोंची सॅलरी!

लाडका भाऊ योजनेसाठी लागणारी कागदपत्रे (Documents required for Ladka Bhau Yojana 2024)

खालील दिलेल्या यादीनुसार लाडका भाऊ योजनेमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. फॉर्म भरताना एक लक्षात ठेवा की खालील दिलेल्या कागदपत्रांची प्रत जोडणे हे अनिवार्य आहे.

  • आधार कार्ड
  • महाराष्ट्र रहिवासी असल्याचा दाखला
  • ऍड्रेस प्रूफ करिता इलेक्ट्रिसिटी बिल, राशन कार्ड इत्यादी
  • दहावीची मार्कशीट
  • बारावीची मार्कशीट
  • पदवी किंवा उच्च पदवीची मार्कशीट
  • बँक खाते
  • बँक खात्याला आधार कार्ड लिंक असलेल्याची पावती
  • पासपोर्ट फोटो इत्यादी

लाडका भाऊ योजनेचे रजिस्ट्रेशन कसे करायचे? (How to apply for Ladka Bhau Yojana 2024)

ज्याही विद्यार्थ्याला लाडका भाऊ योजनेचे लाभ घ्यायचे आहेत त्यांनी खालील दिलेल्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे.

Ladka Bhau Yojana Website – https://rojgar.mahaswayam.gov.in

या अप्रेंटशिप योजनेचे प्रशिक्षण हे सहा आठवड्यापर्यंत राहणार. विद्यार्थ्याला सहा आठवड्याचे अप्रेंटशिप प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल त्यांना सर्टिफिकेट प्रदान करण्यात येईल. हे सर्टिफिकेट त्यांच्या भविष्यात परवाना बघून सादर करता येईल.

Also read: डॉक्टर कसे व्हायचे? How to become a Doctor- स्टेप बाय स्टेप गाईड जाणून घ्या!

FAQs of Ladka Bhau Yojana 2024

1.लाडका भाऊ योजनेमध्ये वयोमर्यादा किती आहे?

लाडका भाऊ योजने मध्ये पात्र असलेले उमेदवारांची वयोमर्यादा हे किमान 18 ते 35 वर्षे ठरवलेली आहे.

2. लाडका भाऊ योजनेमध्ये कोण विद्यार्थी पात्र ठरतील?

अशी विद्यार्थी ज्यांचे बारावीचे शिक्षण पूर्ण झालेले आहेत किंवा बारावी समांतर ITI/DIPLOMA/GRADUATE/POST GRADUATE असे शिक्षण झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना या योजनेचे लाभ घेता येणार.

3. लाडका भाऊ योजना अप्रेंटशिपचे प्रशिक्षण किती आठवड्या पर्यंत राहणार आहे?

लाडका भाऊ अप्रेंटशिप योजनेचे प्रशिक्षण हे सहा आठवड्या पर्यंत राहणार आहे.

4. लाडका भाऊ योजनेमध्ये किती रुपये पगार मिळणार?

लाडका भाऊ योजनेमध्ये दर महिन्याला दहा हजार रुपये पर्यंत पगार मिळेल.

5. लाडका भाऊ योजना केव्हा सुरू करण्यात आली?

महाराष्ट्र सरकारने लाडका भाऊ योजनेची सुरुवात 2024 मध्ये सुरू केली.

Conclusion on Ladka Bhau Yojana 2024

लाडका भाऊ योजना हे महाराष्ट्र राज्य सरकारने राबवलेली एक उत्तम आणि विश्वासू अशी योजना तरुण मुलांमध्ये रुजू केलेली आहे. या योजनेमध्ये दहा लाख तरुण मुलांना दर महिन्याला दहा हजार रुपये अशी आर्थिक लाभ मिळणार आहे. ही योजना अप्रेंटशिप योजना असणार आहे. या योजनेचे जास्तीत जास्त तरुणांनी फायदा घ्यावे यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार परिश्रम करत आहे. जेणेकरून महाराष्ट्र मध्ये नोकरीची संधी मिळावी याकरिता या योजनेची सुरुवात केलेली आहे.

जर तुम्हाला वरील दिलेली माहिती आवडली असेल तर लाडका भाऊ योजना 2024 या ब्लॉगला आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आणि त्याच प्रमाणे अशाच योजनेबद्दल किंवा शैक्षणिक मार्गदर्शनाबद्दल अजून माहिती करून घ्यायचे असल्यास आमची वेबसाईट vidyarthiyash ला नेहमी भेट देत चला. धन्यवाद!