वकील (Vakil) कसं बनायचं? How to become a Vakil in 2025? Full information

भारतामध्ये जवळपास 15 लाखांपेक्षा जास्त वकील कार्यरत आहेत. या ब्लॉगमध्ये आज आपण वकील कसं बनायचं याची माहिती घेणार आहोत. वकील बनायला कुठला कोर्स करणे गरजेचे असते, या कोर्स करण्याकरिता बेस्ट कॉलेजेस कोणते आहेत, वकील बनण्यासाठी कोर्सची फीस किती असते आणि कोर्स केल्यानंतर वकील बनवण्यासाठी काय प्रोसेस असते या सगळ्या गोष्टीबद्दल या ब्लॉगमध्ये आपण बोलणार आहोत. या ब्लॉगच्या मदतीने तुम्ही विद्यार्थी पासून हाय कोर्ट वकील बनण्यापर्यंतची माहिती मिळेल. म्हणूनच वकील कसं बनायचं हे पूर्णपणे समजण्यासाठी हा ब्लॉग पूर्ण वाचा.

how to become Vakil
How to become Vakil

Table of Contents

वकील कोण होत असते? Who is Vakil?

वकिलांचं काम लोकांना लीगल ॲडव्हाइस (Legal Advice) प्रदान करणे आहे. साधारण व्यक्तीला कोर्ट मध्ये जज समोर आपली गोष्ट ठेवणे हे कठीण जात असते. त्याकरिता ते लोक वकिलांची निवड करतात. वकील लोक हे प्रभावशाली भाषा, कौशल्य आणि त्यांच्या क्षमतेनुसार सर्वसाधारण लोकांची गोष्ट जजसमोर प्रस्तुत करत असतात. कुठल्याही लीगल कामात वकील हा महत्त्वपूर्ण भूमिका निभवतो.

वकील कोण बनू शकते? Who can be a Vakil?

कुठलाही विद्यार्थी ज्याने बारावी पूर्ण केलेली आहे तो वकील बनण्याचा अभ्यास सुरू करू शकतो. वकील बनण्याच्या अभ्यासाला एलएलबी (LLB) कोर्स देखील म्हटले जाते. या कोर्समध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही वकील बनू शकता आणि अनुभवी वकिलांसोबत ट्रेनिंग घेऊ शकता. कोर्स पूर्ण झाल्यानंतर अनुभवी व्यक्तींसोबत ट्रेनिंग करणे हे गरजेचे असते. वकील या क्षेत्रामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी तुमची विचारधारा हे दुसऱ्या लोकांपेक्षा वेगळी असायला हवी. याच सोबत तुमच्यात संवाद कौशल्य असणे गरजेचे आहे. तर्क वितर्क करणे, मनामध्ये टीम (Team) ची भावना असणे, कुठल्याही मुद्द्यांवर बेधडक गोष्ट करणे आणि तसेच निर्णय घेण्याची क्षमता या काही गोष्टी तुम्हाला वकील या क्षेत्रात उत्तीर्ण बनवण्यात मदत करते.

वकीलचा काम काय असते?

वकीलचा काम हे आपल्या क्लायंटला (Client) कायदे कानूनच्या अनुसार मार्ग दाखवणे असते. तसेच कायदेशीर दस्तावेज बनवणे, कानूनी पेपर तयार करणे आणि कोर्ट मध्ये आपल्या क्लाइंटच्या बाजूने वाद विवाद करणे. भारतामध्ये वकिलांना भारतीय संविधानानुसार काम करावे लागतात आणि भारतीय संविधानात सांगण्यात येणाऱ्या नियमांचे पालन करणे असते. त्याचबरोबर या सगळ्या नियमांचा पालन करून आपल्या क्लाइंटला न्याय मिळवून देणे असते. वकील या क्षेत्रात तुम्ही सिविल लॉ, क्रिमिनल लॉ, इन्कम टॅक्स लॉ, फॅमिली लॉ, कॉन्स्टिट्यूशनल लॉ, कॉमन लॉ, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ इत्यादी स्पेशलायझेशन (Specialization) करू शकता.

📖मर्चंट नेव्ही(Merchant Navy)-करिअर, कोर्स, जॉब आणि लाखोंची सॅलरी!

वकील किती प्रकारचे असते?

खालील दिलेल्या माहितीनुसार वकील किती प्रकारचे असतात हे जाणून घेऊया.

  • सरकारी वकील
  • प्रायव्हेट वकील
  • ज्युनिअर वकील
  • सीनियर वकील
  • फॅमिली वकील
  • लोवर, जिल्हा व हायकोर्ट वकील
  • सुप्रीम कोर्ट वकील

वकील कसे बनायचे? How to be a Vakil?

वकील बनण्यासाठी बारावी मध्ये उत्तीर्ण असणे गरजेचे असते. बारावीची परीक्षा ही सरकार मान्य किंवा मान्यता प्राप्त शाळेतून उत्तीर्ण करायची असते. बारावीच्या परीक्षेनंतर CLAT एक्झाम पास करणे गरजेचे असते. CLAT एक्झाम पास केल्यानंतर एलएलबी (LLB) कोर्समध्ये ऍडमिशन घ्यावी लागते. बारावीनंतर वकील बनण्याचा कोर्स हा पाच वर्षांचा असतो. ग्रॅज्युएशन नंतर तीन वर्षाचा एलएलबी कोर्स मध्ये ऍडमिशन घेऊ शकता. लॉचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला इंटर्नशिप करणे गरजेचे असते. सीनियर वकीलच्या असिस्टंटच्या रूपात तुम्हाला कार्य करायचे असते. इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर तुम्ही वकील बनू शकता. इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर तुम्ही स्वतंत्रपणे वकिली करू शकता.

वकील चे कोर्स? Vakil Courses

खालील दिलेले कोर्सेस करून आपण वकिलीचा अभ्यास पूर्ण करू शकतो.

  • Bachelor of Laws (LLB)
  • Master of Laws (LLM)
  • Master of Business Law
  • Integrated undergraduate degrees – B.A. LLB, B.Sc. LLB, BBA LLB, B.Com LLB
  • Integrated MBL-LLM/ MBA-LLM

हाय कोर्टाचा वकील कसं बनायचं? High Court Vakil?

एल एल बी (LLB) चा कोर्स केल्यानंतर तुम्हाला लायसन्स घेणे गरजेचे असते. ही लायसन्स तुम्हाला स्टेट बार कौन्सिलच्या मार्फत मिळते. लायसन्स शिवाय तुम्ही कुठल्याही क्लायंटचा खटला कोर्टात त्याच्या बाजूने लढू शकत नाही. लायसन्स प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला कमीत कमी पाच वर्षांचा वकिली अनुभव असणे गरजेचे आहे. हा अनुभव लोवर कोर्टात वकिलीचा असायला हवं. या पाच वर्षाचा अनुभवानंतर तुम्ही हाय कोर्टात वकिली करू शकता. जर तुम्हाला सरळ हाय कोर्टात वकिली करायची असेल तर त्या अगोदर तुम्हाला हायकोर्टाच्या एका वरिष्ठ वकिलांच्या हाताखाली इंटर्नशिप पूर्ण करायची गरज पडेल.

वकील बनवण्याचे फायदे (Pros of being Vakil)

वकील बनल्यानंतर तुम्ही कोर्टामध्ये आपल्या क्लायंट कडून कायदेशीर वादविवाद करू शकता. तुम्हाला अधिकारांची आणि नियमांची चांगलीच माहिती असते आणि दुसऱ्या सोबत होत असलेल्या अन्यायाला तुम्ही रोखू शकता. तुम्ही सर्वसामान्य माणसांच्या अधिकारांची रक्षा करता ज्याच्याने समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढतो.

📖पायलट(Pilot) कसं बनायचं? Eligibility Criteria, Admission Process, Course, Fees, Salary

भारतातील सर्वोच्च लॉ (LAW) युनिव्हर्सिटी आणि त्यांची वार्षिक फीज

युनिव्हर्सिटीसरासरी वार्षिक फीज (INR)
नालसर युनिव्हर्सिटी ऑफ लॉ2.5 लाख
नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया यूनिवर्सिटी 2.2 लाख
नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी1.8 लाख
चंदिगड युनिव्हर्सिटी1.3 लाख
कलिंगा युनिव्हर्सिटी1.5 लाख
This is a general data. It may change.

वकील बनण्यासाठी लागणारी पात्रता (Eligibility Criteria for being a Vakil)

  • बारावी पास होणे गरजेचे आहे.
  • बारावी नंतर सी CLAT परीक्षा देणे गरजेचे आहे.
  • CLAT परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.
  • बारावी मध्ये किमान 45 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
  • पाच वर्षाच्या लॉ कोर्स साठी विद्यार्थ्याला मान्यताप्राप्त बोर्डातून बारावीची परीक्षा पास होणे गरजेचे आहे आणि त्या परीक्षेत किमान 45 टक्के गुण असणे अनिवार्य आहे.
  • जर ग्रॅज्युएशन नंतर लॉ करायची इच्छा झाल्यास तीन वर्षाचा लॉ कोर्स असतो.
  • परदेशात लॉ शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्याला इंग्लिश लैंग्वेज टेस्ट (IELTS/TOEFL) देणे गरजेचे असते.

वकील बनण्यासाठी वयोमर्यादा किती (Age Limit for Vakil)?

बार कौन्सिल ऑफ इंडिया (The Bar Council Of India) च्या नियमानुसार पाच वर्षीय पाठ्यक्रम मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची वय वीस वर्ष आणि तीन वर्षीय एलएलबी पाठ्यक्रम अभ्यासामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची वय तीस वर्ष निर्धारित करण्यात आली आहे.

📖Petroleum Engineering करा आणि कमवा 1,00,000 रुपये सॅलरी! What is Petroleum Engineering?

CLAT परीक्षा काय असते?

वकील बनण्यासाठी लागणाऱ्या प्रवेश परीक्षेला CLAT परीक्षा असे म्हटले जाते. देशातील लॉ कोर्सच्या टॉप कॉलेजेस मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी CLATची परीक्षा देणे हे गरजेचे असते. या शब्दाचा पूर्ण रूपांतर कॉमन लॉ ऍडमिशन टेस्ट (Common Law Admission Test) असे असते. ही परीक्षा पास करून तुम्ही देशातील उच्च लॉ युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन घेऊ शकता.

CLAT 2024
CLAT 2024

भारतात लॉ युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन घेण्याची प्रक्रिया

  • आपल्या आवडीच्या युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करणे.
  • युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल. तो सांभाळून ठेवणे.
  • यूजर आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉगिन करणे.
  • जो कोर्स तुम्हाला करायचा आहे त्याची निवड करणे.
  • आवेदन फॉर्म भरणे आणि त्याला जमा करणे.
  • आवेदन फॉर्म भरताना येणारा शुल्क भरणे.
  • रजिस्ट्रेशन केल्यानंतर कौन्सिलिंग राऊंडची प्रतीक्षा करणे.
  • प्रवेश परीक्षेत आणि बारावी परीक्षेत मिळणाऱ्या गुणांच्या आधारावर एक मेरिट लिस्ट लागेल.

वकील बनल्यानंतर काय जॉब प्रोफाइल असते (Job Profile after Vakil)?

एकदा का तुम्ही वकिलासाठी लागणारा कोर्स केला की तुम्ही स्वतंत्रपणे वकिली सुरू करू शकता.

खालील दिलेले काही लोकप्रिय जॉब प्रोफाइल्स आहेत

  • ट्रस्टी
  • नोटरी
  • वकील
  • सॉलिसिटर
  • कानून विषयतज्ञ
  • लॉ रिपोर्टर
  • कानूनी सल्लाकार
  • शिक्षक
  • जिल्हा आणि सत्र न्यायाधीश 

खालील दिलेल्या परदेशी युनिव्हर्सिटी मध्ये देखील लॉ करण्याची संधी.

  • स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, यु.एस
  • केंब्रिज विश्वविद्यालय, ब्रिटेन
  • शिकागो विश्वविद्यालय, यु.एस
  • येल विश्वविद्यालय, यु.एस
  • न्यूयॉर्क विश्वविद्यालय, यु.एस
  • हार्वर्ड विश्वविद्यालय, यु.एस

वकील (Vakil) बनण्यासाठी देण्यात येणारी प्रवेश परीक्षा

वेगवेगळे युनिव्हर्सिटीज लॉ कोर्स साठी प्रवेश परीक्षा आयोजित करीत असतात.

खालील दिलेल्या काही युनिव्हर्सिटीची नावे –

  • GNLU – Gandhinagar
  • RMLNLU – Lucknow
  • RGnUl – Patiala
  • CNLU – Patna
  • NLU – Jodhpur
  • HNLU – Raipur
  • NLUO – Cuttack
  • NLUJAA – Guwahati
  • Nalasar – Hyderabad
  • WBNUJs – Kolkata
  • NLSIU – Bangalore

नुकतेच 1 डिसेंबर 2024 ला CLAT 2025 ची परीक्षा पार पडली. ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होती. ही परीक्षा सिंगल शिफ्ट मध्ये घेण्यात आली. परीक्षेचे वेळ हे दुपारी दोन वाजता पासून ते चार वाजेपर्यंत होते. भारताच्या 25 राज्याच्या आणि चार युनियन टेरिटरीच्या 141 सेंटर मध्ये ही परीक्षा घेण्यात आली .

नोटीसच्या नुसार CLAT 2025 च्या परीक्षेकरिता 96.33% ही विद्यार्थ्यांनी परीक्षा करिता हजेरी लावली. 57% हे महिला गटातील विद्यार्थी होते आणि 43% हे पुरुष गटातील विद्यार्थी होते. पूर्ण विद्यार्थ्यांमधून 9 ट्रान्सजेंडर होते. काउन्सलिंग बद्दलची पूर्ण माहिती 9 डिसेंबर 2024 ला चार वाजेपर्यंत हजर होईल. CLAT 2025 चे रिझल्ट ऑफिशियल वेबसाइट वर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी लॉगिन डिटेल्स टाकून आपले रिझल्ट आणि स्कोर कार्ड डाउनलोड करून घ्यायचे आहे.

FAQs on Vakil

1.CLAT प्रवेश परीक्षा कशी असते?

ही प्रवेश परीक्षा ही दोन तासांची असते. या परीक्षेत 200 प्रश्न येतात. प्रत्येक प्रश्नाला एक अंक दिले जाते आणि चुकीच्या उत्तराला एक चौथाई 1/4 निगेटिव्ह मार्किंग असते. म्हणजे चार चुकीचे उत्तर दिल्यावर तुमचा एक मार्क निगेटिव्ह मध्ये जातो. या परीक्षेत मुख्यता पाच विषयांमधून प्रश्न विचारले जातात. ज्यामध्ये इंग्लिश, सामान्य ज्ञान, करंट अफेयर्स, गणित, लीगल अ‍ॅप्टीट्यूड आणि लॉजिकल रीजनिंग समाविष्ट आहे.

तुम्हाला या परीक्षेसंबंधी कुठलीही माहिती हवी असल्यास खालील दिलेल्या त्यांच्या अधिकृत टेलीफोन नंबरवर संपर्क साधा. टेलीफोन नंबर- 08047162020

E-mail – clat@consortiumofnlus.ac.in

2. वकिलांची सॅलरी किती असते?

एक स्वतंत्र वकील जर वकिली करत असेल तर तो आपल्या अनुभव आणि व्यक्तिगत बुद्धिमत्तेच्या आधारावर चांगली कमाई करू शकतो. कॉर्पोरेट सेक्टर मध्ये लागणाऱ्या कानूनी सल्लागाराचा पगार हा सरासरी 50 हजार रुपये महिन्याला असतो. सरकारी वकीलचा पगार हा प्रथम श्रेणीतील अधिकाऱ्या इतकी असते.

3. The Bar Council Of India ची वेबसाईट कोणती?

www.barcouncilofindia.org

bar council of india
Bar council of india

वरील दिलेल्या ब्लॉग मधील माहिती तुम्हाला आवडली असल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा आणि करिअर बद्दल अधिक माहिती मिळवण्याकरिता आमचा ब्लॉग Vidyarthiyash नेहमी वाचा.

Leave a Comment