Pradhan Mantri Internship Yojana 2024 in Marathi : पात्रता,आवेदन,लास्ट डेट| Step-by-step Easy Guide

Pradhan Mantri Internship Yojana
Pradhan Mantri Internship Yojana

Pradhan Mantri Internship Yojana 2024 (प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना) : जर एखादी व्यक्ती, विद्यार्थी 10 वी किंवा 12 वी पास असेल आणि या शिक्षणाच्या आधारावर त्याला नोकरी मिळत नसेल तर याचे मुख्य कारण म्हणजे त्याच्याकडे आजच्या युगात लागणारे कौशल्यांची कमी किंवा त्यांना या स्पर्धेच्या युगात कौशल्य घ्यायचे पुरेशी माहिती नाही. जर तुम्ही शिक्षित बेरोजगार असाल तर तुमच्यासाठी आली आहे पीएम इंटर्नशिप योजना 2024.

ही योजना तुमच्यासाठी खूप कामाची आणि फायदेशीर असणार आहे. या योजनेचे लाभ न केवल तुम्हाला करियर मध्ये एक सुरुवात मिळेल पण त्यासोबतच तुम्ही टाटा, बिरला, महिंद्र, रिलायन्स, विप्रो, एचसीएल,ओएनजीसी यासारख्या बड्या कंपन्यांमध्ये नोकरीची संधी देखील मिळेल. इंटर्नशिपच्या काळात जर तुमच्या कौशल्यांना वाव मिळाला तर या बड्या कंपन्यांमध्ये तुमची नोकरी देखील लागू शकते. आजच्या ब्लॉगमध्ये आपण पीएम इंटर्नशिप योजनेबद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर याला आवेदन करण्याची अंतिम तारीख आहे हे देखील माहिती करून घेणार आहोत. तर हा ब्लॉग पूर्ण वाचा.

Table of Contents

पीएम इंटर्नशिप योजना (Pradhan Mantri Internship Yojana)

या योजनेचे लाभ फक्त 10 वी आणि 12 वी पास झालेले विद्यार्थीच नव्हे तर बीए, बीकॉम, बीबीए, बी-फार्म अशा पदवी आणि प्रमाणपत्र असलेले पात्र उमेदवार देखील फायदा घेऊ शकतात. ही इंटर्नशिप योजना 24 सेक्टर मध्ये राहणार आहे. विद्यार्थ्याला या 24 सेक्टर मध्ये इंटर्नशिप गरजेचे राहील. यामध्ये तेल, गॅस, ऊर्जा, ऑटोमोबाईल, बँकिंग आणि इतर क्षेत्र या सेक्टर मध्ये सामील आहेत. इंटर्नशिप करणारा विद्यार्थ्याला मार्केटिंग, मॅन्युफॅक्चरिंग, सर्विस आणि त्याच्याशी निगडित 20 पेक्षा जास्त फील्डमध्ये कार्य करायची संधी मिळेल. अशा कार्यामध्ये इंटर्नशिप केल्यानंतर त्या व्यक्तीला चांगल्या प्रकार पगाराची नोकरी मिळण्यास मदत होईल.

पीएम इंटर्नशिप योजनेचे आवेदन घेण्याची प्रक्रिया ही 12 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झालेली आहे. उमेदवारांना आवेदन करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर ठेवलेली आहे. निवडले गेलेले पात्र उमेदवार यांची इंटर्नशिप ही 2 डिसेंबर पासून सुरू होईल. देशातल्या बेरोजगार युवानकरिता कॉर्पोरेट कार्य मंत्रालय यांच्या पायलट प्रोजेक्ट प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सुरू केली आहे.

या योजनेचे उद्देश देशातील युवांना बेरोजगारी पासून दूर करणे. त्याकरिता त्यांना उत्तम इंटर्नशिप करण्याचे अवसर प्रदान करणे. या योजनेचे एक मोठे लक्ष असे की येणाऱ्या पुढच्या पाच वर्षांमध्ये यातील करोड पेक्षा जास्त युवाला इंटर्नशिप प्रदान करणे आहे आणि देशाची युवाशक्ती अजून सशक्त करणे आहे. येणाऱ्या वर्ष 2025 मध्ये 125000 देशातील युवांना इंटर्नशिप करण्याचे अवसर मिळेल. जो उमेदवार कंपनीने ठरवलेल्या पात्रता पूर्ण करेल अशा विद्यार्थ्याला प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचे लाभ घेता येईल.

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना बद्दलची थोडीशी माहिती (Highlights of Pradhan Mantri Internship Yojana)

IndexDetails
Name of YojanaPradhan Mantri Internship Yojana
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना
Department of YojanaMinistry of Corporate Affairs, Government of India
Objectives of Yojanaइंटर्नशिप प्रदान करणे
Beneficiaries of Yojanaभारतातील शिक्षित बेरोजगार युवा
Official website of Yojanahttps://pminternship.mca.gov.in/
Starting date of Yojana12 October 2024
Last date of PM Internship Yojana25 October 2024
10 November 2024
15 November 2024
Date of commencement of internship2 December 2024
This is a general information for reference.

पीएम इंटर्नशिप योजनेसाठी लागणारी पात्रता (Eligibility for Pradhan Mantri Internship Yojana)

खालील दिलेल्या नमूद काही गोष्टी आहेत जो विद्यार्थी किंवा उमेदवार दिलेल्या पात्रतेला पूर्ण करेल अशा विद्यार्थ्यांना पीएम इंटर्नशिप योजने करिता निवडण्यात येईल.

  • उमेदवार हा भारत देशाच्या स्थायी निवासी असणे गरजेचे आहे.
  • उमेदवाराचे वय हे 21 ते 24 वर्ष असणे आवश्यक आहे.
  • उमेदवार हा कुठल्याही कंपनीची पूर्णकालीन रोजगार असलेला नसावा.
  • उमेदवाराकडे 10 वी आणि त्याचबरोबर कुठलेही प्रशिक्षण घेतलेले प्रमाणपत्र, डिप्लोमा किंवा बीए, बीएससी, बीकॉम, बीसीए, बीबीए, किंवा बी-फार्म हे कोर्सेस केलेली पदवी असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.
  • उमेदवार जर डिस्टन्स लर्निंग कोर्सेसमध्ये नामांकित असेल तर असे विद्यार्थी देखील आवेदन करू शकतात.

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेमध्ये कुठले उमेदवार पात्र नाहीत (Not eligible for Pradhan Mantri Internship Yojana)

खालील दिलेल्या माहितीनुसार या योजने करिता उमेदवार अपात्र ठरतील.

  • जर उमेदवार पूर्णकालीन रोजगार किंवा पूर्णकालीन शिक्षा कोर्सेसमध्ये असल्यास तो या योजने करिता अपात्र ठरेल.
  • ही योजना आयआयटी IIT, आयआयएम IIM, राष्ट्रीय विधी विश्वविद्यालय, एन आय डी NID, ट्रिपल आयटी IIIT, विद्यार्थ्यांकरिता नाही.
  • जर उमेदवार कुठल्याही सरकारी कौशल कार्यक्रम किंवा इंटर्नशिप कार्यक्रम मध्ये संलग्न आहे तर तो अपात्र ठरेल.
  • जर उमेदवार NAPS किंवा NATS यातून इंटर्नशिप पूर्ण केलेले असतील तर ते विद्यार्थी किंवा उमेदवार आवेदन करू शकणार नाहीत.
  • वित्त वर्ष 2023-24 मध्ये परिवार ज्यांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा जास्त आहेत, ते अपात्र ठरतील.
  • परिवारातील कुठलेही सदस्य माता/पिता, पती/पत्नी जे स्थायी कर्मचारी आहेत असे उमेदवार आवेदन करण्यास अपात्र ठरतील.

करिअर बनवण्यासाठी आमचे खालील आर्टिकल्स वाचा

  1. डॉक्टर कसे व्हायचे? How to become a Doctor- Step-by-Step गाईड जाणून घ्या!
  2. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग (Automobile Engineering) काय असते?
  3. 12वी सायन्स नंतर Top Career Options.जाणून घ्या तुमच्यासाठी कुठले बेस्ट!
  4. मर्चंट नेव्ही(How to join Merchant Navy)-करिअर, कोर्स, जॉब आणि लाखोंची सॅलरी!

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना उमेदवारांना कुठले लाभ मिळणार (Stipend of Pradhan Mantri Internship Yojana)

आर्थिक मदत म्हणून उमेदवारांना 12 महिन्याची इंटर्नशिप करण्याकरिता दर महिन्याला 5000 रुपये देण्यात येईल. हे 5000 कंपनीच्या सीएसआर फंडिंग CSR FUNDING ₹500 तर केंद्र सरकारकडून ₹4500 रुपयेचे योगदान देण्यात येईल. इंटर्नशिप करत असलेल्या उमेदवाराला मासिक वेतनच्या व्यतिरिक्त इमर्जन्सी कव्हर करण्याकरिता 6000 रुपयाची वित्तीय सहायता देखील मिळेल. याच्या व्यतिरिक्त पीएम जीवन ज्योती विमा योजना आणि पीएम सुरक्षा विमा योजनाच्या माध्यमातून उमेदवाराचा विमा केल्या जाईल आणि कुठल्याही प्रीमियमचे भुगतान ही केंद्र सरकार करेल.

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजने करिता आवेदन प्रक्रिया (Application process of Pradhan Mantri Internship Yojana)

  • जे उमेदवार या इंटर्नशिप योजने करिता पात्र ठरतील अशा उमेदवारांना पोर्टलवर आपले रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे.
  • पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताना मागितलेली माहिती अचूक भरणे गरजेचे आहे.
  • उमेदवाराला त्याच्या आवडीनुसार नोकरीची भूमिका, नोकरीचे स्थान आणि इतर अन्य विकल्प निवडण्याचे स्वातंत्र्य आहे.
  • उमेदवार त्याच्या आवडीनुसार पाच इंटर्नशिपसाठी आवेदन करू शकते.

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना आवेदन प्रक्रिया (How to apply for Pradhan Mantri Internship Yojana)

खालील दिलेल्या माहितीनुसार पात्र उमेदवार प्रधानमंत्री इंटर्नशिप योजने करिता अप्लाय करू शकतो.

  • सगळ्यात अगोदर प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यायची आहे.
  • Pradhan Mantri Internship Yojana
  • त्यानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करायची आहे.
  • प्रोसेस मध्ये मागितलेल्या व्यक्तिगत आणि शैक्षणिक माहिती देणे गरजेचे आहे.
PM Internship Scheme
PM Internship Scheme
  • पोर्टल मध्ये रजिस्ट्रेशन करण्याच्या वेळेस उमेदवारांनी दिलेल्या माहितीनुसार एक रेझ्युमे RESUME तयार होईल.
  • उमेदवाराची प्राथमिकता जसे की नोकरीचे क्षेत्र, स्थान, भूमिका इत्यादीच्या आधारावर पोर्टलवर उपलब्ध असलेल्या इंटर्नशिप ब्राउझिंग सुविधाचे उपयोग करावे.
  • उमेदवाराने आपली योग्यता आणि प्राथमिकता लक्षात घेता आपल्या आवडीनुसार त्याही पाच इंटर्नशिपला आवेदन करावे.
  • केलेले आवेदन आणि कंपन्यांद्वारा पोस्ट केले गेलेली आवश्यकता नुसार पोर्टल शॉर्टलिस्ट प्रक्रिया करणार.
  • शॉर्टलिस्ट केले गेलेले उमेदवार यांचा डेटा कंपनीकडे जाणार आणि कंपन्यांची आवश्यकता जर उमेदवार पूर्ण करत असेल तर ऑफर पाठवण्यात येईल.
  • उमेदवाराला इंटर्नशिप ऑफर मिळाल्यानंतर तो या पोर्टलवरून स्वीकार करणे गरजेचे आहे.

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजने करिता आवश्यक कागदपत्रे (Documents required for Pradhan Mantri Internship Yojana)

खालील दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक उमेदवाराने खालील नमूद केलेले कागदपत्र जोडणे आवश्यक ठरेल.

  • आधार कार्ड
  • ईमेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • रहिवासी दाखला
  • पॅन कार्ड
  • राशन कार्ड
  • 10वीची मार्कशीट
  • 12वीची मार्कशीट
  • प्रमाणपत्र किंवा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्याची सर्टिफिकेट

पीएम इंटर्नशिप योजनेमध्ये कुठल्या कंपन्यांची हिस्सेदारी आहे (Companies in Pradhan Mantri Internship Yojana)

या इंटर्नशिप योजने करिता अशा कंपन्यांची निवड करण्यात आली आहे ज्यांनी मागील तीन वर्षांमध्ये खर्च केलेल्या सीएसआर फंडिंग ही जास्त राहील. अशा कंपन्यांना कॉर्पोरेट मंत्रालय जर मंजुरी देत असेल तर अशा कंपन्या, बँक किंवा वित्तीय संस्था इंटर्नशिप कार्यक्रमात भाग घेण्यास पात्र ठरतात. अधिकृत पोर्टलवर काही कंपन्या सामील आहेत जसे की टाटा स्टील, अदानी, एचपी, वेदांता, मायक्रोसॉफ्ट, कोटक इत्यादी.

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचे लाभ (Benefits of Pradhan Mantri Internship Yojana)

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचे लाभ खालील प्रकारे आहेत.

  • या योजनेच्या अंतर्गत उमेदवाराला बड्या कंपन्यांमध्ये व्यावहारिक कार्य अनुभव घेता येईल. ज्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारची नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
  • ही योजना व्यवहारिक प्रशिक्षण प्रदान करते.
  • इंटर्नशिप करणाऱ्या इंटर्नला सरकारकडून ₹4500 स्टायपेंड आणि त्यासोबत कंपन्यांकडून ₹500 चे अतिरिक्त योगदान देण्यात येईल. त्यामुळे त्याला वित्तीय मदत होईल.
  • या योजनेचे लाभ असे की उमेदवाराला व्यवहारिक ज्ञान मिळेल आणि कंपन्यांमध्ये काम कसे होतात हे जाणून घेण्याची संधी मिळेल.
  • भारत देशाच्या टॉप 500 कंपन्या या योजनेमध्ये भाग घेत आहेत.
  • उमेदवाराला आपल्या अंगी कौशल्य बागडण्याची संधी मिळेल.

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत खालील काही क्षेत्रातील (Industries in Pradhan Mantri Internship Yojana)

  • मॅन्युफॅक्चरिंग
  • खनिज आणि खनन
  • फार्मा
  • टेलिकॉम
  • पर्यटन
  • कृषी
  • ऑटोमोटिव्ह
  • डिफेन्स
  • बँकिंग
  • कन्स्ट्रक्शन
  • कन्सल्टिंग
  • स्वास्थ्य
  • केमिकल

Frequently Asked Questions

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना काय आहे?

ही योजना केंद्र सरकार द्वारा बेरोजगार वन युवा वर्गाला इंटर्नशिप च्या माध्यमातून रोजगार क्षमता आणि कौशल्य वाढवण्यास मदत करते

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजने करिता वयोगट काय आहे?

या योजने करिता वयोमर्यादा ही 21 वर्षे ते 24 वर्षांपर्यंत असणार आहे.

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या अंतर्गत किती स्टायपेंड मिळेल?

या योजनेअंतर्गत इंटर्नला महिन्याला 5000 रुपये मिळतील.

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेची आवेदन प्रक्रिया कशी असणार आहे?

या योजने करिता आवेदन करण्यास इच्छुक उमेदवाराला ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे.

Also Read :