Maharashtra Birth Certificate Download: नमस्कार मित्रांनो! आजच्या युगामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये नोकरी मिळवण्याकरिता आवश्यक कागदपत्रांची गरज असते. आवश्यक कागदपत्रे नसल्यास तुमचा झालेला निवड, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये नोकरी करू इच्छिता त्या क्षेत्रातून किंवा त्या नोकरीतून तुम्हाला बरखास्त देखील करण्यात येऊ शकते. अशाच एका आवश्यक कागदपत्रांच्या यादीमध्ये एक प्रमाणपत्र खूप गरजेचे आहे. ते म्हणजे जन्माचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र (Birth Certificate download). यालाच बर्थ सर्टिफिकेट असेही म्हणतात. आपण जेव्हा जन्माला येतो त्यावेळेस आपला जन्म या ठिकाणी झाला, आपल्या जन्माची वेळ काय होती, जन्माची तारीख काय होती, दिवस काय होता आणि आपल्या आई-वडिलांचे नाव काय आहे असे या प्रमाणपत्रामध्ये नमूद केले असते.
एक आवश्यक टप्पा असतो ते म्हणजे कागदपत्रे पडताळणीचा. बरेचसे सरकारी कार्यालयात, खाजगी क्षेत्रात देखील नोकरीच्या वेळेस तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट, जन्माचा दाखला सादर करावा लागतो. जर एखादी उमेदवार हा प्रमाणपत्र सादर करण्यात अपयशी ठरला असेल तर त्याची त्या नोकरीमध्ये निवड होणे कठीण असते. म्हणूनच जन्माचा दाखला हा तुमचा आवश्यक पुराव्यांमध्ये सामील होतो.
आजच्या या ब्लॉगमध्ये आपण जन्माचा दाखला (Birth Certificate Download) ऑनलाइन पद्धतीने घर बसल्या कसा प्राप्त करावा याबद्दल माहिती घेणार आहोत. नियमांच्या अनुसार जन्माचा दाखला जन्म झाल्याच्या 21 दिवसांच्या आत मध्ये बनवणे गरजेचे आहे. परंतु काही कारणवश कोणी जन्माचा दाखला बनवण्यामध्ये अपयशी ठरत असेल तर त्यांनी ऑनलाइन पद्धतीने जन्माचा दाखला बनवू शकतात. भारत सरकारने राज्य शासनाच्या आधारे ऑनलाइन पद्धतीने जन्म प्रमाणपत्र काढण्याची सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे या ब्लॉगमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत की ऑनलाइन पद्धतीने जन्माचा दाखला कसा काढता येईल. त्यामुळे आर्टिकल शेवटपर्यंत वाचा. हा आर्टिकल आवडल्यास शेअर देखील करा.
Table of Contents
जन्माचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र काय असते? (What is Birth Certificate?)
जन्माचा दाखला एक अत्यंत आवश्यक कागदपत्रांमध्ये सामील होतो. जन्माचा दाखला किंवा जन्माचा प्रमाणपत्र याच्या आधारावर जन्माशी निगडित सगळया गोष्टी प्रमाणपत्रामध्ये जसे की आम्ही सांगितल्याप्रमाणे मुलाचे जन्म प्रमाणपत्र हे त्याच्या जन्म घेतल्याच्या 21 दिवसांच्या आत मध्ये काढणे बंधनकारक आहे. याकरिता तुम्ही तुमच्या नजदीकच्या रुग्णालयात किंवा कार्यालयात जाऊन जन्म पत्राचे आवेदन ऑफलाइन पद्धतीने करू शकता. हीच पद्धत जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायची असल्यास प्रत्येक राज्याच्या अधिकृत वेबसाईटच्या पोर्टलच्या माध्यमातून करता येते. महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्र शासनाने आपले सरकार हे पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर तुम्ही बर्थ सर्टिफिकेट अप्लाय करू शकता.
जन्माचा दाखला अप्लाय करण्याकरिता लागणारे आवश्यक पुरावे(Documents required for Birth Certificate Download)
जन्म प्रमाणपत्र बनवण्याकरिता खालील काही पुराव्यांची गरज पडते. ते पुरावे अशा प्रकारे आहेत-
- आई-वडिलांचा आधार कार्ड
- राशन कार्ड
- ऍड्रेस प्रूफ
- वोटर आयडी
- ड्रायव्हिंग लायसन्स
- ज्या रुग्णालयामध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये मुलाचे जन्म झाले अशा हॉस्पिटल कडून जारी केले गेलेले प्रमाणपत्र
- जन्म घेतलेल्या बाळाचे नया शी संबंधित सगळे कागदपत्र रुग्णालयाशी
- जन्म घेतलेल्या मुलाचे जन्म घेता वेळेस चे हॉस्पिटलमधले रसीद
जन्म प्रमाणपत्रबनवण्याकरिता ऑनलाईन अर्ज कसा करावा (How to apply for Birth certificate download)
जर तुम्ही जन्म प्रमाणपत्र बनवू इच्छिता तर त्याकरिता तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करणे गरजेचे आहे. खाली दिलेल्या माहितीनुसार तुम्ही जन्म प्रमाणपत्र ऑनलाईन शकता-
Step#1
सगळ्यात अगोदर तुमच्या राज्याच्या म्हणजेच महाराष्ट्र राज्याच्या आपले सरकार पोर्टलवर भेट द्यायची आहे. याकरिता तुम्ही खालील दिलेल्या लिंकचा वापर करू शकता- https://aaplesarkar.mahaonline.gov.in/
Step#2
या पोर्टलवर तुम्हाला सगळ्यात अगोदर रजिस्ट्रेशन करायचे आहे.
रजिस्ट्रेशन करते वेळेस तुम्हाला तुमच्याजवळ असलेल्या मोबाईल नंबरचा वापर करावा लागेल. मोबाईल नंबरवर ओटीपी (OTP) येणार. ही ओटीपी टाकून आणि अचूक नेम वापरून तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे. एकदा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला आपले सरकारच्या पोर्टलवर लॉगिन करून घ्यायचे आहे.
Step#3
एकदा लोगिन केल्यानंतर तुम्हाला ग्रामीण विकास आणि पंचायत राज सेवा विभाग निवडायचे आहे. सेवा विभागामध्ये जन्म दाखला हा पर्याय निवडावा लागेल.
Also Read:– Freelance Work from Home jobs काय असते? 2025 मध्ये Latest Skills शिकून पैसे कमवा
Step#4
जन्म दाखला हा ऑप्शन निवडल्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म येईल. हा अर्ज फॉर्म तुम्हाला आवश्यक माहिती देऊन पूर्ण भरायचा आहे. हा फॉर्म भरते वेळेस माहिती अचूक देणे गरजेचे आहे.
Step#5
फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला मागितलेल्या कागदपत्र अपलोड करायचे आहे. कागदपत्रे जसे की आधार कार्ड, हॉस्पिटलचे दाखले आणि इतर कागदपत्रे हे तुम्हाला स्कॅन करून अपलोड करावे लागतील.
Step#6
अर्ज प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने प्राप्त करण्याकरिता तुम्हाला अर्जाची फी भरणे गरजेचे आहे. हे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. हे फी भरण्याकरिता तुम्ही डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगचा वापर करू शकता.
Step#7
फी भरून झाल्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. अर्ज फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर नोंदणी क्रमांक येणार. नोंदणी क्रमांक तुम्हाला जपून ठेवायचे आहे. या नोंदणी कर्माचा वापर करून तुमचा फॉर्मचे स्टेटस चेक करता येते. फॉर्म भरून झाल्यानंतर हा फॉर्म पडताळणी करिता जाणार. तुम्ही दिलेला अर्ज हा योग्य असेल तर तो 15 दिवसांच्या आत संबंधित नगरपालिकेच्या ग्रामपंचायतीकडे जमा केला जाईल. त्याच्या काही दिवसानंतर तुमचे जन्म प्रमाणपत्र तयार होईल. त्यानंतर तुम्ही ते मिळवू शकता.
जन्म-मृत्यू नोंदणी कायदा काय असते
1 ऑक्टोबर पासून जन्म-मृत्यू नोंदणी सुधारणा कायदा 2023 हा लागू झालेला आहे. या कायद्यामुळे जन्म प्रमाणपत्र पुरावा म्हणून वापरले जाणार आहे. तुमच्याजवळ असलेल्या जन्म दाखला किंवा जन्म प्रमाणपत्रचे उपयोग खालील दिलेल्या काही गोष्टींकरिता होईल-
- ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदार यादी
- आधार क्रमांक नोंदणी
- विवाहाच्या नोंदणीच्या वेळेस
- शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्याकरिता
- सरकारी नोकरी असल्याचा पुरावा
Also Read:- Ladka Bhau Yojana | लाडका भाऊ योजना : महिन्याला मिळतात 10,000 रुपये! Apply Now
महाराष्ट्राच्या आपल्या सरकार पोर्टलवर अर्ज केल्यानंतर पुढच्या पाच कामकाजाच्या दिवसात तुम्हाला जन्म प्रमाणपत्र मिळायला हवे. एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्ही तुमच्या गावच्या ग्रामसेवकाला अर्ज क्रमांक पाठवू शकता. ज्यामुळे एकदा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला ठराविक कालमर्यादेत प्रमाणपत्र मिळू शकतो.
जन्म प्रमाणपत्र मिळणे आता अधिक सोपे झाले आहे. पद्धत कुठलीही असो ऑनलाईन किंवा ऑफलाईन तुम्ही सहज रित्या जन्म प्रमाणपत्र मिळवू शकता. फक्त गोष्ट लक्षात ठेवा की जन्म प्रमाणपत्र मिळण्याकरिता लागणारे आवश्यक कागदपत्रे हे तुमच्याकडे तयार असलेले गरजेचे आहे. योग्य कागदपत्रे आणि योग्य प्रक्रियेचा वापर करून तुम्ही सहजरित्या जन्म प्रमाणपत्र मिळवू शकता.
जन्म प्रमाणपत्रात नाव बदलायचे असल्यास काय करावे लागणार
मुलाचे नाव, पालकाचे नाव किंवा पत्ता, किंवा रुग्णालयाचे नाव जर तुम्हाला जन्म प्रमाणपत्रात बदलायचे असल्यास तर ती सुधारणा देखील तुम्ही करू शकता. खालील दिलेली प्रक्रिया जरूर वाचा-
मुलाच्या नावामध्ये सुधारणा करण्याकरिता
ज्या मुलाचे नाव जन्म प्रमाणपत्रात बरोबर करायचे असल्यास पालकांनी पत्राची विनंती करणे गरजेचे आहे.
पालकांचा फोटो आयडी
पालकांचे संयुक्त प्रतिज्ञापत्र
ज्या मुलाचे नाव असेल त्या मुलाचे शैक्षणिक दस्तावेज दुरुस्त करावे.
पालकांच्या नावातील सुधारण्याकरिता
या सुधारणेमध्ये शुद्धलेखन चुका, आडनाव समाविष्ट करणे, आद्याक्षरे समावेश
ज्या व्यक्तीचे नाव दुरुस्त करायचे आहे अशा व्यक्तीने पत्राची विनंती करणे.
पालकांचा फोटो आयडी
ज्या पालकाचे नाव बरोबर करायचे आहे त्याचे शैक्षणिक दस्तावेज.
पत्त्यामध्ये दुरुस्ती करण्याकरिता
ज्याच्या पत्त्याचा पत्ता हा दुरुस्त करायचे आहे अशा व्यक्तीने विनंती करणे गरजेचे आहे.
पत्ता पुरावा
पालकांचा फोटो आयडी आणि संयुक्त फोटो प्रतिज्ञापत्र
पालकाची एकूण नावे सुधारणेचे मुख्य नाव आहे ते पूर्णपणे बदलण्याकरिता
याकरिता फक्त कोर्टाकडून आदेश मिळणे गरजेचे ठरेल.
रुग्णालयाचे नाव बदलण्याकरिता
ज्याचे जन्म प्रमाणपत्र दुरुस्त करायचे आहे अशा व्यक्तींनी पत्राची विनंती करणे.
रुग्णालयातून डिस्चार्ज केलेले प्रमाणपत्राची प्रत
अर्जदाराचा फोटो आयडी
जन्म प्रमाणपत्र मिळण्याकरिता केलेल्या अर्जाची ट्रॅकिंग कशी करायची (How to track application for Birth Certificate Download)
महाराष्ट्र राज्यातील जन्म प्रमाणपत्रेचा मागोवा म्हणजेच जन्म प्रमाणपत्र ट्रॅक कसा करावा ते खालील चरणांमध्ये अनुसरण दिले आहे.
सगळ्यात अगोदर तुम्हाला महाराष्ट्र राज्याच्या आपले सरकार वेबसाईटला भेट द्यायची आहे.
वेबसाईटवर तुम्हाला ट्रॅक युवर एप्लीकेशन (Track Your Application) किंवा आपला अनुप्रयोग मागोवा घ्या वर क्लिक करायचे आहे.
त्यानंतर तुम्हाला ग्रामीण विकास व पंचायत राज विभाग प्रविष्ट करायचे आहे.
त्यानंतर जन्म प्रमाणपत्र असे ऑप्शन प्रविष्ट करायचे आहे.
नोंदणीच्या वेळेस तुम्हाला मिळालेल्या अर्ज आयडी किंवा नोंदणी क्रमांक तुम्हाला प्रविष्ट करायचे आहे.
त्यानंतर सबमिट करून तुम्हाला तुमच्या जन्म प्रमाणपत्राचा मागोवा मिळेल.
जर जन्म प्रमाणपत्र तयार झाला असेल तर तो तुम्हाला डाऊनलोड (Birth Certificate Download) करून घ्यायचा आहे.
Disclaimer– The above information is for information and educational purpose only. Any loss of personnel or confidential information of the user is not a responsibility of the Vidyarthiyash website. Please confirm the authenticity of the website is official or not while submitting your personnel or any relevant information on any online application portal in order to avoid any false happening.
Maharashtra Birth Certificate Download अप्लाय करण्याकरिता लागणारे आवश्यक कागदपत्रे
ड्रायव्हिंग लायसन्स
मतदार यादी
आधार क्रमांक नोंदणी
विवाहाच्या नोंदणीच्या वेळेस
शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्याकरिता
सरकारी नोकरी असल्याचा पुरावा
How to track birth certificate download?
महाराष्ट्र राज्याच्या आपले सरकार पोर्टलवर भेट द्या.
जन्म-मृत्यू नोंदणी कायदा केव्हा पासून लागु झाला?
1 ऑक्टोबर पासून जन्म-मृत्यू नोंदणी सुधारणा कायदा 2023 हा लागू झालेला आहे. अधिकृत वेबसाईटवर भेट दिल्यानंतर तुम्हाला जन्म दाखला डाउनलोड करण्याचे ऑप्शन मिळेल.
जन्म प्रमाणपत्र मिळण्याकरीता फीस किती द्यायची गरज पडते?
महाराष्ट्र राज्यामध्ये जन्म प्रमाणपत्र मिळण्याकरिता 23 रुपये देण्याची गरज पडते. भविष्यकाळात ही रक्कम बदलण्याची शक्यता आहे.
जन्माचा दाखला मिळण्याकरिता महाराष्ट्र राज्य सरकारच्या कोणत्या वेबसाईटवर भेट देणे गरजेचे आहे?
खालील दिलेल्या वेबसाईटवर भेट देऊन तुम्ही तुमच्या जन्माच्या दाखल्या बद्दल माहिती गोळा करू शकता. त्याचप्रमाणे जन्माचा दाखला तुम्हाला करायचा असल्यास तेही देखील तुम्ही करू शकता. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज केलेल्या जन्माच्या दाखल्याला ट्रॅक देखील करू शकता.
https://aaplesarkar.mahaonline.gov.in/
वरील दिलेली माहिती तुम्हाला आवडली असल्यास आपल्या नातेवाईकांमध्ये आणि मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा आणि अशाच आर्टिकल वाचण्याकरिता आमच्या ब्लॉगला विजीट देत चला.