ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग (Automobile Engineering) काय असते?

पूर्ण जग चालते इंजिनवर. मग बस, स्कूटर, बाईक किंवा तुमच्या आवडीची स्पोर्ट्स कार असो. सगळ्या गाड्यांमध्ये इंजिन हे महत्त्वाची भूमिका निभावते आणि याच गाड्यांचे डिझाईन करणं, यांच्यावर रिसर्च करणे, गाड्यांचे पार्टस बनवणं आणि गाड्यांचा मेंटेनन्स करणं हा एक उत्कृष्ट करिअर विकल्प बनलेला आहे. याच क्षेत्रात ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग ( Automobile engineering) या इंजीनियरिंगच्या शाखेला खूप मान्यता प्रदान झालेली आहे.

What is automobile engineering
What is automobile engineering

ऑटोमोबाईल इंजीनियरिंग मध्ये गाड्यांची निर्मिती करणे आणि त्यांचा मेंटेनन्स करणे, त्याचप्रकारे गाड्यांची डिझाईन, त्यांच्यावर रिसर्च आणि नवीन टेक्नॉलॉजीमुळे येणाऱ्या संशोधनांना उपस्थित करणे हे असते. सुरक्षेच्या बाबतीत देखील ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग ही महत्त्वाची भूमिका निभवते.

या What is Automobile engineering ब्लॉगमध्ये आपण ऑटोमोबाईल इंजीनियरिंग संबंधित पूर्ण माहिती घेणार आहोत. ऑटोमोबाईल इंजिनियर बनायला कुठले कोर्स करावे लागतात, त्याची पात्रता काय असते, प्रवेश प्रक्रिया काय असते आणि ऑटोमोबाईल इंजिनियर झाल्यानंतर तुमचा करिअर ग्रोथ कसा राहणार हे जाणून घेऊ.

Table of Contents

ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग काय असते? What is Automobile engineering?

ऑटोमोबाईल इंजीनियरिंग ही मेकॅनिकल इंजिनिअरिंगची सब ब्रांच आहे. ऑटोमोबाईल इंजीनियरिंग मध्ये ऑटोमोबाईल संबंधित अभ्यासक्रम असतो. या अभ्यासक्रमात ऑटोमोबाईलचे डिझाईन, निर्माण, असेम्ब्ली आणि सुरक्षा या गोष्टींबाबत लक्ष दिले जाते. या इंजीनियरिंग क्षेत्रात मुख्यता वाहनाचे डिझाईन, वाहनांचे उत्पादन, मोटर इंजिनचे उत्पादन आणि निर्माण, त्याचबरोबर इंधनशी निगडित गोष्टींवर विचार केला जातो.

ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग (Automobile engineering) मधला “ऑटोमोबाईल” हा शब्दाचा अर्थ काय असतो?

ऑटोमोबाईल हा शब्द दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे. ऑटो आणि मोबाईल.ऑटो म्हणजे गाडी आणि मोबाईल म्हणजे स्वयंचलित. याचाच अर्थ असा की स्वयंचलित गाडी.

📖मर्चंट नेव्ही(How to join Merchant Navy)-करिअर, कोर्स, जॉब आणि लाखोंची सॅलरी!

ऑटोमोबाईल इंजिनियर चे काम काय असतात ? What Automobile engineer do?

आता सर्वसाधारण व्यक्तीच्या मनात प्रश्न येतो की ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर आपले काम काय असणार. खालील दिलेल्या यादीत ऑटोमोबाईल इंजिनियर्सची महत्त्वाची कामे नमूद केलेली आहेत.

  • ऑटोमोबाईल इंजिनियर्स हे वाहना संबंधित कामे करतात. जसे की कार, बाईक, ट्रक, ट्रॅक्टर किंवा अन्य वाहन.
  • नवीन गाडी बनण्याकरिता लागणारे डिझाईन तयार करून देणे, त्याचप्रमाणे तयार केलेल्या डिझाईन नुसार गाडीची मॅन्युफॅक्चरिंग करणे आणि मॅन्युफॅक्चरिंग झाल्यानंतर गाडीचे सगळे पार्ट्स असेंबल करणे आणि शेवटी असेंबल केलेली गाडी टेस्टिंग करणे या सगळ्या कामात ऑटोमोबाईल इंजिनियर महत्त्वाची भूमिका निभवतात.
  • त्याचप्रमाणे ऑटोमोबाईल इंजिनियर्स सरकारी विभागांमध्ये देखील कार्यरत आहेत. जसे की रेल्वे, बस, एअर फोर्स, नेव्ही, आर्मी, पोलीस ट्रान्सपोर्ट वर्कशॉप इत्यादी.
  • ऑटोमोबाईल इंजीनियरिंग केल्यानंतर तुम्ही इंजीनियरिंग कॉलेजेस मध्ये शिक्षक म्हणून देखील कार्य करू शकता.
  • त्याचप्रमाणे ऑटोमोबाईल इंजीनियरिंग केल्यानंतर तुम्ही स्वतंत्र ऑटोमोबाईल रिपेरिंग वर्कशॉप उघडून आपल्या बिजनेस क्षेत्रात पाऊल ठेवू शकता.

📖Petroleum Engineering करा आणि कमवा 1,00,000 रुपये सॅलरी! What is Petroleum Engineering?

ऑटोमोबाईल इंजिनियर किती प्रकारचे असतात ? Types of Automobile Engineer?

ऑटोमोबाईल इंजीनियरिंग या इंजीनियरिंगच्या क्षेत्रात मेकॅनिकल इंजीनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग, मॅन्युफॅक्चरिंग इंजीनियरिंग, डेव्हलपमेंट इंजीनियरिंग, प्रॉडक्ट अँड डिझाईन इंजीनियरिंग या इतर इंजीनियरिंगचे क्षेत्र समाविष्ट आहेत.

ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग करण्याकरिता लागणारी आवश्यक स्किल्स-

खालील दिलेल्या यादीनुसार ऑटोमोबाईल इंजीनियरिंग करण्यासाठी काही स्किल्स,काही कौशल्य नमूद केलेले आहेत.

  • ऑटोमोबाईल इंजिनियर हा कलात्मक विचाराचा असायला हवा.
  • ऑटोमोबाईल या क्षेत्रात त्याची आवड आणि रुची असायला हवी.
  • ऑटोमोबाईल इंजीनियरिंग मुख्यतः टीम मध्ये काम करतात.
  • ऑटोमोबाईल इंजिनियरला तांत्रिक ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • त्याचप्रमाणे समस्या सोडवणं हे गुण देखील ऑटोमोबाईल इंजिनियर मध्ये असायला हवे.
  • ऑटोमोबाईल इंजिनियरला गणित आणि भौतिकी ज्ञान असायला हवा.
  • त्याचप्रमाणे ऑटोमोबाईल इंजिनियर हा एक चांगला योजनाकार असायला हवा.
  • त्यात दबावांमध्ये काम करण्याची क्षमता असावी.
  • ऑटोमोबाईल इंजिनियर वेळेचे पालन करणारा असावा.
  • ऑटोमोबाईल इंजिनियर मध्ये संवाद कौशल्य असावे.

टॉप ऑटोमोबाईल इंजीनियरिंग कोर्स Top Automobile engineering Courses

दहावीनंतर तुम्हाला ऑटोमोबाईल इंजीनियरिंगचा कोर्स करायचा असेल तर डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग करावा लागतो. बारावीनंतर ऑटोमोबाईल इंजीनियरिंग करायचं असल्यास तुम्हाला ऑटोमोबाईल इंजीनियरिंगची पदवी घेणे आवश्यक असते. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगची पदवी गेल्यानंतर तुम्ही उच्च पदवी देखील घेऊ शकता.

भारतातील टॉप ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग कोर्स प्रधान करणारे कॉलेज

  • गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक, नागपूर
  • गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक, नाशिक
  • गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक, औरंगाबाद
  • गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक, अहमदनगर
  • विजेटीआय मुंबई,
  • सरदार वल्लभभाई पटेल पॉलिटेक्निक, मुंबई
  • एम ए टी युनिव्हर्सिटी, मुंबई
  • नोएडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, ग्रेटर नोएडा
  • अजिंक्य डिवाई पाटील विश्वविद्यालय, पुणे
  • आयआयटी मद्रास
  • वेल्लोर प्रद्योगिकी संस्था
  • आयआयटी रूडकी
  • एल पी यु जालंधर
  • आयआयटी हैदराबाद
  • चंदीगड विश्वविद्यालय
  • राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्था, वारंगल
  • क्राईस्ट युनिव्हर्सिटी, बेंगलोर
  • एमआयटी मनीपाल
  • दयानंद सागर कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, बंगलोर
  • गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक, अहमदाबाद
  • एलजी पॉलीटेक्निक, अहमदाबाद
  • शारदा विश्वविद्यालय, ग्रेटर नोएडा
  • ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, पुणे
  • जय हिंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, पुणे

ऑटोमोबाईल इंजिनियर बनण्याकरिता शैक्षणिक मार्ग कसा असावा?

ऑटोमोबाईल इंजिनियर बनण्याकरिता बरेचशे पर्याय उपलब्ध आहेत.

  • दहावीनंतर तीन वर्षाचा डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजीनियरिंगचा कोर्स करणे. या कोर्सच्या आधारावर तुम्हाला ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्यांमध्ये नोकरी मिळण्याची संधी असते.
  • तीन वर्षाचा डिप्लोमा झाल्यानंतर तुम्हाला इंजीनियरिंगच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळत असतो.
  • बारावीनंतर ऑटोमोबाईल इंजीनियरिंग करायची असल्यास तुम्हाला JEE किंवा MH-CET ची परीक्षा देणे गरजेचे असते. JEE मध्ये उत्कृष्ट गुण मिळाल्यावर तुम्ही आयआयटी (IIT), एनआयटी (NIT) किंवा उच्च इंजिनिअरिंग कॉलेजमधून ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग करू शकता. एमएच-सीईटी (MH-CET)ची परीक्षा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाल्यावर तुम्ही महाराष्ट्रातील उच्च कॉलेजेस मध्ये प्रवेश घेऊ शकता.
  • ऑटोमोबाईल इंजीनियरिंगची पदवी घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या कौशल्य आणि शैक्षणिक क्षमतेनुसार बड्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळण्याची संधी असते.
  • पदवी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ऑटोमोबाईल इंजीनियरिंग या क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊ शकता. त्याचबरोबर एम टेक (M.Tech) किंवा एम एस (M.S) देखील करू शकता.
  • इंजीनियरिंग नंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला गेट (GATE) ची परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते. गेटच्या परीक्षेच्या आधारावर तुम्ही पदवीनंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी पात्र ठरता.
  • जर विदेशात तुम्हाला उच्च शिक्षण घ्यायचे असल्यास तुम्हाला GRE,GMAT ची परीक्षा देणे गरजेचे असते. याच सोबत इंग्लिश प्रोफेशनशी टेस्ट म्हणजेच IELTS,TOEFL या परीक्षेचे मार्क्स सादर करावे लागतात. त्याच सोबत विदेशी युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेशासाठी तुम्हाला SOP, LOR, सीव्ही/रिझ्युमे, पोर्टफोलिओ जमा करावे लागतात.

📖12वी सायन्स नंतर Top Career Options.जाणून घ्या तुमच्यासाठी कुठले बेस्ट!

ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेताना लागण्यात येणारी कागदपत्रे

  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जात प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमीलेअर
  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • जन्माचा दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • दहावी-बारावीचे मार्कशीट
  • प्रवेश अर्ज
  • प्रवेश अर्ज भरण्याची फी पावती
  • पासपोर्ट फोटो
  • बँक पासबुक 
  • राशन कार्ड

ऑटोमोबाईल इंजीनियरिंगचे शिक्षण घेत असताना कुठले कोर्सेस करणे आवश्यक ठरते?

ऑटोमोबाईल इंजीनियरिंग मध्ये प्रवेश मिळाल्यानंतर तुम्ही ऑटोमोबाईल इंजीनियरिंग रिलेटेड संबंधित कोर्सेस करू शकता. हे कोर्सेस केल्यानंतर बड्या कंपनीमध्ये तुमची नोकरी मिळण्याची शक्यता वाढू शकते.

खालील दिलेले काही कोर्सेस आहेत

  • ऑटोकॅड (AutoCad)
  • क्रियो (Creo)
  • सॉलिड वर्क्स (SolidWorks)
  • हायपर मेष (Hypermesh)
  • प्रॉडक्ट लाइफ सायकल (Product Lifecycle)
  • प्रॉडक्ट डिझाईन (Product Design)
  • व्हॅल्यू ॲनालिसिस (Value analysis) आणि इतर

ऑटोमोबाईल इंजीनियरिंग साठी विदेशातील टॉप युनिव्हर्सिटी

  • युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन
  • युनिव्हर्सिटी ऑफ टेनएसी
  • युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ वेल्स
  • युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास
  • युनिव्हर्सिटी कॉलेज बर्मिंगम
  • युनिव्हर्सिटी ऑफ विंडसोर
  • शंकाई जिओ टोंग युनिव्हर्सिटी

ऑटोमोबाईल इंजिनियर नोकरीसाठी टॉप रिक्रुटर्स

  • Tata Motors Limited
  • Force Motors Limited
  • Ashok Leyland
  • Mahindra & Mahindra
  • General Motors
  • Hyundai Motors
  • Maruti Suzuki India Limited
  • Volkswagen
  • Bajaj Auto
  • Hero Moto Corp Limited.
  • Honda
  • TVS

ऑटोमोबाईल इंजिनियरचा पगार (Salary of Automobile Engineer)

ऑटोमोबाईल इंजीनियरिंगचा कोर्स केल्यानंतर तुम्हाला बड्या कंपनीमध्ये नोकरी मिळण्याची शक्यता असते. त्यात एका ऑटोमोबाईल इंजिनियरचा वार्षिक उत्पन्न हा सरासरी पाच लाख रुपये ते दहा लाख रुपये इतका असू शकतो. त्याचसोबत अनुभव, शिक्षण योग्यता आणि कौशल्यच्या आधारावर पगार वाढ होत असते.

FAQs of Automobile Engineering

1. ऑटोमोबाईल इंजीनियरिंग कोर्स करण्याकरिता कोणता देश सर्वोत्तम आहे?

युके, जर्मनी, नेदरलँड, कॅनडा, युएस, फ्रान्स

2. ऑटोमोबाईल इंजीनियरिंगसाठी सर्वोत्तम कोर्स कोणता?

  • Diploma in Automobile Engineering
  • B.E. Automobile Engineering
  • M.E. Automobile Engineering

3. ऑटोमोबाईल इंजीनियरिंग मध्ये कोणते विषय शिकवले जातात?

  • I.C. Engine
  • Thermodynamics
  • Heat and Mass Transfer
  • Strength Of Mechnanics
  • Design Of Machines
  • Applied Mechanics
  • Fluid Mechanics
  • Automotive Design
  • Automotive Petrol Engine.

4. भारतात ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग ची असोसिएशन कोणती आहे?

अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट द्या – www.araiindia.com

वरील दिलेल्या ब्लॉग मधील माहिती तुम्हाला आवडली असल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा आणि करिअर बद्दल अधिक माहिती मिळवण्याकरिता आमचा ब्लॉग Vidyarthiyash नेहमी वाचा.

Leave a Comment