IES Exam : भारतामध्ये सध्या युवा पिढीमध्ये इंजिनिअरिंगची हाऊस वाढत चाललेली आहे. आणि भारतातील युवा मध्ये इंजिनिअरिंग या प्रोफेशनल कोर्सला सगळ्यात जास्त पसंती मिळत आहे. प्रत्येक युवकांमध्ये इंजीनियरिंग व्हायचा कल वाढत चाललेला आहे. इंजीनियरिंग मध्ये मिळत असलेली चांगल्या पगाराची नोकरी, बदलत्या काळात वाढणारा तंत्रज्ञानचे ज्ञान असणे या गरजेमुळे सध्या युवा पिढी इंजीनियरिंग क्षेत्राकडे जास्त लक्ष केंद्रित करत आहे. या इंजीनियरिंग क्षेत्राच्या ऑफिसर लेव्हलच्या परीक्षेबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत.
या ब्लॉगमध्ये इंजिनिअरिंग क्षेत्राची सर्वोच्च पदाची नोकरी म्हणजे इंडियन इंजीनियरिंग सर्विसेस Indian Engineering Services खात्यात येणारी IES ऑफिसरची नोकरी. याला कुठले इंजीनियरिंग क्षेत्राचे विद्यार्थी पात्र ठरतात, या परीक्षेची तयारी कशी करायची आणि त्याचबरोबर या परीक्षेची तयारी करत असतानी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायला याबद्दल माहिती घेणार आहोत. हा आर्टिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला महत्त्वाचा ठरणार आहे कारण की हा आर्टिकल वाचून त्याला त्याच्या इंजीनियरिंग क्षेत्रातील महत्व लक्षात येणार आहे. तर हा आर्टिकल तुम्ही नक्की वाचा आणि आपल्या इंजीनियरिंग कॉलेजेस, ट्युशन मधील विद्यार्थ्यांना शेअर करा.
Table of Contents
Overview of IES Exam
इंजीनियरिंगची पदवी त्यानंतर इंजिनीयरला एक एक्झाम देणे गरजेचे असते. ती म्हणजे गेट GATE एक्झाम. या नावाचे संक्षिप्त रूप GRADUATE APTITUDE TEST IN ENGINEERING असे आहे. ही एक्झाम इंजीनियरिंग क्षेत्रातील प्रत्येक शाखेच्या विद्यार्थ्यांकरिता असते. परंतु त्याचबरोबर ऑफिसर पदी निवड करण्याकरिता दरवर्षी यूपीएससी UPSC IES ची एक्झाम येत असते. ही एक्झाम इंजिनिअरिंग क्षेत्रातील प्रत्येक ब्रांच करिता घेतलेली नसते. फक्त Engineering क्षेत्रातील काही BRANCHES या परीक्षेकरिता पात्र ठरतात. त्यामुळे इंजिनिअरिंग क्षेत्रात ऑफिसर बनणे हा लाखो इंजिनीयर मुलांचा स्वप्न असते. IES ऑफिसर करिता खूप परिश्रम घ्यावे लागते. त्यामुळे IES ऑफिसर बनल्यानंतर समाजामध्ये त्या इंजिनियर मुलाचा कौतुक होतो. तर आपण जाणून घेऊ IES परीक्षेबद्दल.
IES Exam म्हणजे काय?
IES म्हणजे इंडियन इंजीनियरिंग सर्विसेस (Indian Engineering Services) मध्ये सरळ ग्रुप ए इंजिनीयर अधिकारी पदावर नियुक्त होण्यासाठी यूपीएससी द्वारा इंजीनियरिंग सर्विसेस एक्झामची परीक्षा दरवर्षी घेतली जाते. यूपीएससी द्वारा आयोजित इंजीनियरिंग सर्विस एक्झाम सेवा परीक्षे भारत सरकारच्या विभागांमध्ये तांत्रिक क्षेत्रामध्ये इंजिनीयर अधिकारी पदाची नियुक्ती केली जाते. ही परीक्षा दरवर्षी यूपीएससी द्वारा आयोजित केली जाते. परीक्षा 3 STAGES मध्ये घेण्यात येते. प्रथम परीक्षा मुख्य परीक्षा आणि इंटरव्यू /मुलाखत. अशा तीन टप्प्यांमध्ये ही परीक्षा दरवर्षी घेण्यात येते.
IES EXAM साठी कुठले ब्रांचेस पात्र ठरतात
जसे की आम्ही तुम्हाला सांगितले की IES ऑफिसर बनण्याकरिता तुम्हाला इंजीनियरिंग करायची असते. प्रत्येक इंजीनियरिंगची शाखा ही या परीक्षेसाठी पात्र नसते. माहितीनुसार आपण जाणून घेऊ की इंजीनियरिंग क्षेत्रातील कुठले ब्रांचेस या परीक्षेकरिता पात्र ठरतात-
- सिविल इंजीनियरिंग
- मेकॅनिकल इंजीनियरिंग
- इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग
- इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजीनियरिंग
Also Read- ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग (Automobile Engineering) काय असते?
EXAM करिता आवेदन करण्याची योग्यता?
खालील दिलेल्या माहितीनुसार आपण या परीक्षेसाठी करिता योग्यता काय असते याबद्दल जाणून घेऊ.
राष्ट्रीयता
- आवेदन करणारा विद्यार्थी हा भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे.
- यासोबत नेपाल किंवा भूटान या देशाच्या नागरिक असणे गरजेचे आहे.
- तिब्बत या देशातील रेफ्युजी 1 जानेवारी 1962 पर्यंत भारतामध्ये स्थायी रूपने राहत असेल.
- त्याचप्रमाणे भारतीय वंशाचा कुठलाही असा विद्यार्थी जो पाकिस्तान, बर्मा, श्रीलंका, युगांडा, केनिया, जांबिया, तांझानिया, मलावी, जायरे, इथोपिया किंवा वियतनाम या देशातून स्थलांतर करून भारतामध्ये राहत असेल.
Indian Engineering Services EXAM करिता आयु सीमा
खालील दिलेल्या माहितीनुसार आपण या परीक्षे करिता असणारी आयु सीमा याबद्दल माहिती घेणार आहोत.
या परीक्षेच्या वेळेस आवेदन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कमीत कमी वय हे 21 वर्षे असणे गरजेचे आहे. आवेदन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय हे जास्तीत जास्त 30 वर्षे असणे गरजेचे आहे.
यासोबत आरक्षण असलेल्या विद्यार्थ्यांना नियमानुसार पोटामध्ये आरक्षण प्रदान करण्यात येईल.
General Overview of Indian Engineering Services Exam
Name Of Exam | Indian Engineering Services IES or Engineering Service Exam ESE |
Exam Conducted by | Union Public Service Commission UPSC |
Date of Notification | 18 September 2024 |
Date of Commencement of Preliminary Exam | 08 June 2025 |
Last Date for Receipt of Applications | 22 November 2024 up to 1800 Hrs. |
Duration Of Exam | 1 Day |
IES EXAM देण्याकरिता शैक्षणिक योग्यता
खालील दिलेल्या माहितीनुसार आपण जाणून घेऊ की परीक्षा देण्याकरिता शैक्षणिक योग्यता काय असते.
- भारताच्या मान्यताप्राप्त विश्वविद्यालय मधून विद्यार्थ्याने इंजीनियरिंग डिग्री केलेली असावी (B.E./ B.Tech).
- याचप्रमाणे इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (Institution of Engineers ) च्या इन्स्टिट्यूशन एक्झामच्या सेक्शन ए आणि बी मध्ये उत्तीर्ण असलेला असावा.
- त्याचप्रमाणे जर कुठला विद्यार्थी परदेशामध्ये इंजिनिअरिंगची डिग्री/डिप्लोमा जे की सरकार संबंधित मान्यताप्राप्त असे विद्यार्थी.
- इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मध्ये ग्रॅज्युएट मेंबरशिप एक्झाम मध्ये उत्तीर्ण केलेले विद्यार्थी.
IES EXAM परीक्षेचे प्रारूप
परीक्षा तीन स्टेजेस मध्ये आयोजित करण्यात येते. Preliminary Exam, Mains Examआणि इंटरव्यू किंवा पर्सनॅलिटी टेस्ट. वरील दिलेल्या तीन स्टेप्सचे विवरण लिखित माने आहे-
Preliminary Exam मध्ये निगेटिव्ह मार्किंग असते. त्यामुळे बहुतेक चुकीच्या उत्तराला मार्क्स कापण्यात येतील. Preliminary Exam मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा Mains Exam करिता बोलावले जाते.
मुख्य परीक्षा झालेल्या विद्यार्थ्यांना इंटरव्यू किंवा पर्सनॅलिटी टेस्ट करिता बोलावण्यात येते.
तिन्ही स्टेजेसच्या एक्झाम मधील मिळालेल्या गुणांच्या आधारावर एक मेरिट लिस्ट तयार होते. ही मेरिट लिस्ट 1300 गुणांची असते. या मेरिट लिस्ट मध्ये विद्यार्थ्याला तिन्ही स्टेजेस मध्ये मिळालेल्या मार्क्सची माहिती असते.
IES EXAM परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन प्रोसेस
यूपीएससी कडून दरवर्षी या परीक्षेचे आयोजन केले जाते. या परीक्षेला आवेदन करताना विद्यार्थ्यांना यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणीकरण करणे गरजेचे आहे. नोंदणीकरण करण्यासाठी खालील दिलेली लिंक वापरू शकता
IES EXAM Registration Process
नोंदणीकरण करताना अचूक माहिती भरणे गरजेचे आहे. नोंदणीकरण झाल्यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड प्रदान करण्यात येते. हा युजर आयडी आणि पासवर्ड सांभाळून ठेवणे गरजेचे आहे. भविष्यात तुम्ही परीक्षा पास झाल्यानंतर दुसऱ्या परीक्षेसाठी अप्लाय करण्याकरिता या युजर आयडी आणि पासवर्डचा वापर होईल. तुम्हाला तुमच्या परीक्षेची मिळालेली हॉल तिकीट हे या रजिस्ट्रेशनच्या माहितीच्या आधारावर असेल. त्यामुळे काळजीपूर्वक रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे.
Click Here to download notification of IES Exam👇👇👇
नोटिफिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये यूपीएससी द्वारा आयोजित IES बद्दल पूर्ण माहिती मिळणार. ज्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करते वेळेस तुमचे वय किती आहे, किती जागे करिता ही परीक्षा आयोजित केली गेली आहे, PRELIMINARY आणि MAINS एक्झाम यांचे परीक्षा केंद्र कुठे असणार आहेत, हॉल तिकीट त्याचबरोबर इंजीनियरिंग क्षेत्रातील प्रत्येक ब्रांचेसचे सिल्याबस आणि परीक्षा पॅटर्न याबद्दल संपूर्ण माहिती या नोटिफिकेशन मध्ये मिळणार आहे.
IES ऑफिसरची जॉब प्रोफाइल कशी असते?
इंजिनिअरिंगच्या ब्रांचेस नुसार तुमचे JOB दिली जाते. त्या खालील प्रमाणे आहेत.
CATEGORY I—CIVIL ENGINEERING
Group-A Services/Posts
(i) Central Engineering Service (Civil)
(ii) Central Engineering Service (Roads), Group-A (Civil Engineering Posts).
(iii) Survey of India Group ‘A’ Service.
(iv) *AEE (Civil) in Border Roads Engineering Service.
(v) Indian Defence Service of Engineers.
(vi) AEE (QS&C) in MES Surveyor Cadre.
(vii) Indian Skill Development Service.
(viii) Central Water Engineering (Group ‘A’) Service.
CATEGORY II—MECHANICAL ENGINEERING
Group-A/B Services/Posts
(i) Indian Defence Service of Engineers.
(ii) Indian Naval Armament Service (Mechanical Engineering Posts).
(iii) Central Power Engineering Service Gr ‘A'(Mechanical Engineering Posts)
(iv) Defence Aeronautical Quality Assurance Service/SSO-II (Mechanical).
(v) AEE ( Elect & Mech) in Border Roads Engineering Service.
(vi) Indian Naval Material Management Service (Mechanical Engineering Posts)
(vii) Indian Skill Development Service
CATEGORY III—ELECTRICAL ENGINEERING
Group-A/B Services/Posts
(i) Indian Defence Service of Engineers.
(ii) Indian Naval Material Management Service (Electrical Engineering Posts)
(iii) Indian Naval Armament Service (Electrical Engineering Posts)
(iv) Defence Aeronautical Quality Assurance Service/SSO-II (Electrical).
(v) Central Power Engineering Service Gr ‘A’ (Electrical Engineering Posts).
(vi) Indian Skill Development Service.
(vii) IEDS/Assistant Director Grade-I (IEDS) Electrical Trade
(viii) IEDS/Assistant Director Grade-II (IEDS) Electrical Trade
CATEGORY IV—ELECTRONICS AND TELECOMMUNICATION ENGINEERING
Group-A/B Services/Posts
(i) Indian Telecommunication Service Gr ‘A’.
(ii) Central Power Engineering Service Gr ‘A’ (Electronics & Telecommunication Engineering Posts).
(iii) Indian Naval Armament Service (Electronics and Telecom Engineering Posts).
(iv) Indian Naval Material Management Service (Electronics and Telecom Engineering Posts)
(v) Defence Aeronautical Quality Assurance Service/SSO-II (Electronics & Tele).
(vi ) Indian Skill Development Service.
(vii ) Indian Radio Regulatory Service Gr ‘A’
(viii ) IEDS/Assistant Director Grade-I(IEDS) Electronics Trade.
(ix ) IEDS/Assistant Director Grade-II(IEDS) Electronics Trade
- Centres of Engineering Services (Preliminary) Examination:
- AGARTALA, CHENNAI, ITANAGAR, MUMBAI, SHIMLA, AHMEDABAD, CUTTACK, JAIPUR, NAGPUR, SRINAGAR, AIZAWL, DEHRADUN, JAMMU, PANAJI (GOA), THIRUVANANTHAPURAM, ALIGARH, DELHI, JORHAT, PATNA, TIRUPATI, PRAYAGRAJ(ALLAHABAD), DHARWAD, KOCHI (COCHIN), PORT BLAIR, UDAIPUR, BANGALORE, DISPUR(GUWAHATI), KOHIMA, RAIPUR, VISHAKHAPATNAM, BAREILLY, GANGTOK, KOLKATA, RANCHI, BHOPAL, HYDERABAD, LUCKNOW, SAMBALPUR, CHANDIGARH, IMPHAL, MADURAI, SHILLONG.
- Centres for Engineering Services (Main) Examination:-
- AHMEDABAD, CHANDIGARH, DISPUR(GUWAHATI), LUCKNOW, SHILLONG, AIZAWL, CHENNAI, HYDERABAD, MUMBAI, SHIMLA, PRAYAGRAJ (ALLAHABAD, CUTTACK, JAIPUR, PATNA, THIRUVANANTHAPURAM, BANGALORE, DEHRADUN, JAMMU, RAIPUR, VISHAKHAPATNAM, BHOPAL, DELHI, KOLKATA, RANCHI.
Above Information is Taken from the notification Published by the UPSC for Engineering Service Exam.
FAQs ON IES EXAM
1.IES EXAM मध्ये स्कोर वर्ष मान्य असते?
परीक्षा पास झाल्यानंतर त्यात मिळालेला स्कोर हा एक वर्षापर्यंत मान्य असतो.
2.IES EXAM फायदे?
यूपीएससी द्वारा घेण्यात येणारी परीक्षा पास केल्यानंतर विद्यार्थी केंद्रीय सरकारच्या वेगवेगळ्या मंत्रालयात आणि विभागात नोकरी करू शकतात. ही एक अधिकारी पदाची नोकरी आहे.
3.रजिस्ट्रेशन करते वेळेस काही अडचणी आल्यास कोणाशी संपर्क करावा?
रजिस्ट्रेशन करते वेळेस येणाऱ्या अडचणींना सोडवण्याकरता तुम्ही यूपीएससीच्या अधिकृत दूरध्वनी क्रमांकावर Telephone Nos. 011-23385271/011-23381125/011- 23098543 फोन लावू शकता. त्याचप्रमाणे यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर https://upsc.gov.in/ भेट देऊन समस्या सोडवू शकता.
4.किती जागे करिता ही परीक्षा आयोजित केली जात आहे?
2025 मध्ये 232 जागेसाठी ही परीक्षा आयोजित केली गेली आहे.
मित्रांनो या ब्लॉगमध्ये यूपीएससी द्वारा आयोजित केलेली IES परीक्षे बद्दल माहिती आहे. ही माहिती आणि नोटिफिकेशन हे जवळपास सारखेच असतात. प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षा आधी नोटिफिकेशन वाचणे हे गरजेचे आहे. या ब्लॉगची माहिती तुम्हाला आवडली असल्यास आपल्या विद्यार्थ्यांमध्ये नक्की शेअर करा आणि अशाच आर्टिकल साठी Vidyarthiyash या website भेट देत चला. Happy Learning!