12वी सायन्स नंतर Top Career Options.जाणून घ्या तुमच्यासाठी कुठले बेस्ट!

Top career options after 12th – 12वीच्या परीक्षा आटोपल्यानंतर आपला करिअर कुठल्या क्षेत्रामध्ये घडवायचं आहे हे प्रत्येक विद्यार्थ्याला जाणून घ्यायचे असते. कारण की बारावीनंतर ज्या क्षेत्रात पाऊल ठेवायचे आहे, त्या क्षेत्राबद्दल त्याला पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. सुरुवातीपासून बरोबर मार्गदर्शन मिळाले की विद्यार्थी आपल्या करिअरमध्ये प्रगतीपथावर जाऊ शकतात. परंतु खूप वेळा अचूक मार्गदर्शन मिळणे हे कठीण होत असते. या ब्लॉगच्या माध्यमातून आपण बारावी मध्ये सायन्स स्ट्रीम घेतल्यानंतर कुठले करिअर ऑप्शन्स Top Career Options अवेलेबल आहेत ते जाणून घेऊया.

Top career options after 12th
Top career options after 12th

Top 10 Career options After 12th in Science stream

खालील दिलेल्या माहितीनुसार बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी टॉप करिअर ऑप्शन्स (Top Career Options) दिलेले आहेत. कृपया कुठल्याही क्षेत्रात जाण्या अगोदर स्वतःची रिसर्च करणे आवश्यक आहे. त्या क्षेत्रातील संबंधित व्यक्तींसोबत संवाद करणे आणि तुम्हाला ज्या क्षेत्रात जायचं आहे त्या क्षेत्राबद्दल अधिक माहिती जाणून घेणे हे गरजेचे आहे.

1. B.E./B. Tech

टॉप करिअर ऑप्शन Top Career Options मध्ये इंजीनियरिंग करणे याच्याकडे विद्यार्थ्यांचा कल खूप वाढलेला आहे. इंजीनियरिंग क्षेत्रात जास्त प्रवेश घेण्याचा मुख्य कारण म्हणजे कम्प्युटर सायन्स मध्ये असणाऱ्या नोकरीचा पगार. यामुळे बारावी मध्ये सायन्स घेतल्यानंतर इंजीनियरिंग हा उत्तम पर्याय असू शकतो. इंजीनियरिंग मध्ये वेगवेगळे क्षेत्र आहेत जसे की

  • मेकॅनिकल इंजिनिअरिंग (Mechanical Engineering),
  • कंप्यूटर इंजीनियरिंग (Computer Engineering),
  • इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजीनियरिंग (IT Engineering),
  • सिव्हिल इंजीनियरिंग (Civil Engineering),
  • इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग (Electrical Engineering),
  • इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजीनियरिंग (Electronics Engineering),
  • ऑटोमोबाईल इंजीनियरिंग (Automobile Engineering),
  • कम्प्युटर सायन्स इंजीनियरिंग (Computer Science Engineering),
  • कम्प्युटर टेक्नॉलॉजी इंजीनियरिंग (Computer Technology Engineering) आणि इत्यादी.

सध्या गेल्या काही वर्षापासून रोबोटिक्स (Robotics), आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence), इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (Information Technology), सायबर सेक्युरिटी (Cyber Security), सायबर सेक्युरिटी अँड हॅकिंग (Cyber Security and Hacking) या इंजीनियरिंगच्या ब्रांचेसला खूप महत्त्व मिळालेला आहे. विद्यार्थी या ब्रांचेस बद्दल माहिती घेऊन याच्यामध्ये आपला करिअर निवडू शकतात आणि आपल्या करिअरची सुरुवात करू शकतात.

2. मर्चंट नेव्ही (Merchant Navy)

बारावीनंतर लाखोंची सॅलरी असणारा हा एकमेव प्रोफेशन आहे. बारावी सायन्स केल्यानंतर तुम्ही मर्चंट नेव्ही मध्ये प्रवेश घेऊ शकता आणि आपल्या सागरी करियरला सुरुवात करू शकता. बारावीनंतर तुम्ही बीएससी नॉटीकल सायन्स (B.Sc. Nautical Science) ह्या पदवी कोर्स मध्ये प्रवेश घेऊ शकता. याचबरोबर बारावीनंतर तुम्ही डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स (Diploma In Nautical Science) या कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकता आणि मर्चंट नेव्ही मध्ये नोकरी करू शकता.

अधिक माहितीसाठी हा आर्टिकल वाचा – 📖 मर्चंट नेव्ही (Merchant Navy)-करिअर, कोर्स, जॉब आणि लाखोंची सॅलरी!

3. NDA

बारावी नंतर तुम्हाला देशाची संरक्षण करण्याची आवड असेल आणि ऑफिसर्स रँक वर सिलेक्शन करून घ्यायचं असेल तर एनडीए NDA हा एक उत्तम पर्याय आहे. एनडीए चा पूर्ण रूपांतर नॅशनल डिफेन्स अकॅडमी (National Defence Academy) असं असतो. ही एक एंट्रन्स एक्झाम आहे जे इंडियन आर्मी (Indian Army), इंडियन नेव्ही (Indian Navy),इंडियन एअर फोर्स (indian AirForce) मध्ये ऑफिसर्स चे सिलेक्शन करण्याकरिता आयोजित केली जाते. ही परीक्षा वर्षातून दोनदा होत असते. परीक्षा पास केल्यानंतर, इंटरव्यू पास केल्यानंतर सिलेक्ट झालेल्या कॅडेट्स ला ट्रेनिंग प्रदान करण्यात येते. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्ही आर्मी, नेव्ही, आणि एअर फोर्स मध्ये ऑफिसर्स लेव्हलवर कार्य करता.

4. इंडियन आर्मी मध्ये टेक्निकल इंट्री (Defense)

इंडियन आर्म फॉर्सेस मध्ये टेक्निकल फिल्ड मध्ये ऑफिसर्स या पदावर भरतीसाठी टेक्निकल एंट्री स्कीम होत असते. यात प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराला बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे असते. बारावी मध्ये विज्ञान विषयात किमान 70 टक्के गुण घेणे बंधनकारक आहे. बारावी नंतर एस एस बी SSB उत्तीर्ण करण्याची गरज पडते. एसएसबी पास केल्यानंतर मेडिकल टेस्ट द्यायची असते. हे दोन्ही टेस्ट पास झाल्यानंतर तुम्ही पाच वर्षाची प्री कमेंसमेंट आणि पोस्ट कमेंसमेंट ट्रेनिंग साठी पात्र ठरता. ही ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर इंडियन आर्म फॉर्सेस मध्ये लेफ्टनंट या पदावर नियुक्ती होते.

5. हॉटेल मॅनेजमेंट डिग्री (Hotel management)

हॉटेल मॅनेजमेंट प्रोग्राम हा एक खास प्रोग्राम आहे. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही हॉटेल आणि टुरिझम इंडस्ट्रीमध्ये कार्य करू शकता. हा कोर्स करण्यामागचा मोठा उद्देश्य म्हणजे मोठमोठ्या हॉटेल्समध्ये लागणारे मॅनेजमेंट, त्यामध्ये प्रदान करण्यात येणाऱ्या सर्विसेस यांचे मॅनेजमेंट आणि इतर शिक्षण प्रदान केले जाते. हे कोर्स केल्यानंतर तुम्ही मोठ्या हॉटेल्स मध्ये किंवा रिसॉर्ट मध्ये हॉटेल मॅनेजर, रेस्टॉरंट मॅनेजरच्या रूपात काम करू शकता.

6. BCA/B.Sc

बीएससी, बीसीए हे पदवी लेवलचे कोर्सेस आहेत. विज्ञान क्षेत्रात पदवी आणि कम्प्युटर क्षेत्रात पदवी. हा तीन वर्षांचे कोर्स केल्यानंतर मिळू शकते. बीसीए BCA मध्ये पदवी केल्यानंतर तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्षेत्रामध्ये जाऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला करिअरची सुरुवात करता येते. याच सोबत बीसीए केल्यानंतर तुम्हांला वेब डिझायनर, वेब डेव्हलपर, नेटवर्क इंजिनिअर, डेटा ऍनालिस्ट, डेटा सायंटिस्ट असा करिअर निवडता येतो.

7. पायलट (Pilot)

बारावी नंतर एक उत्तम पर्याय आजकालच्या युवकांमध्ये आहे तो म्हणजे की पायलट होणे. प्रोफेशनल कोर्सेस मध्ये पायलट होणे हा एक Top Career Option आहे. आकाशात उडणाऱ्या विमानाला पाहून लहानपणी आपले स्वप्न असायचे की पायलट बनायचं. बारावी सायन्सचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पायलट बनू शकता. हा एक उत्तम करिअर असू शकतो. पायलट बनून तुम्ही लाखो रुपयांची कमाई करू शकता. त्याचप्रमाणे पायलट बनल्यानंतर तुम्हाला समाजामध्ये एक उच्च दर्जा मिळतो. पायलटसाठी लागणारी ट्रेनिंग, त्याचे कोर्सेस, उत्तम कॉलेजेस आणि पायलट बनण्याकरिता लायसन्स प्रोसेस ह्या सगळ्या गोष्टीबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आमचा हा ब्लॉग वाचा –

8. मेडिकल सायन्स (Doctor)

बारावी सायन्स नंतर मेडिकल हा कोर्स घेणे हा एक Top Career Option आहे. डॉक्टर बनण्याकरिता बारावी मध्ये सायन्स घेणे गरजेचे असते. बारावी मध्ये सायन्स या क्षेत्रात केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिक्स हे विषय घेणे गरजेचे असते. बारावीनंतर डॉक्टर बनण्याकरिता तुम्हाला नीट (NEET)ची परीक्षा उत्तीर्ण व्हायची गरज असते. नीट या परीक्षेत मिळालेल्या गुणांवर तुम्हाला एमबीबीएस (MBBS – Bachelor Of Medicine and Bachelor of Surgery) या कोर्स साठी प्रवेश मिळू शकतो. त्याचप्रमाणे नीट च्या मार्क्सच्या आधारावर तुम्ही BAMS करू शकता.

बारावीनंतर खालील कोर्सेस मेडिकल या क्षेत्राशी संबंधित आहेत.

  • Bachelor of Dental Surgery
  • Bachelor of Medical Lab Technology
  • Bachelor of Pharmacy
  • Bachelor of Homoeopathic Medicine & Surgery
  • Occupational Therapy or Physiotherapy
  • Veterinary Science & Animal Husbandry (BVSc. AH)
  • B.Sc in Forensic Science

डॉक्टर कसे व्हायचे? How to become a Doctor- स्टेप बाय स्टेप गाईड जाणून घ्या!

9. डिप्लोमा कोर्सेस (Diploma Courses)

एखाद्या पर्टिक्युलर क्षेत्रात स्पेशललिस्ट व्हायचं असेल तर डिप्लोमा कोर्स करणे आवश्यक असते. 12वी सायन्स घेतल्यानंतर तुम्ही डिप्लोमा कोर्स करू शकता. खालील दिलेले काही नामांकित डिप्लोमा कोर्सेसची नावे आहेत.

  • Diploma In Engineering
  • Diploma In Nursing
  • Diploma In Nautical Science
  • Diploma In Digital Marketing
  • Diploma In Animation
  • Diploma In Advertising
  • Diploma In Education Technology

डिप्लोमा कोर्स केल्यानंतर तुम्ही संबंधित क्षेत्रामध्ये पदवी अभ्यासक्रम देखील करू शकता आणि आपल्या करिअरची वाटचाल सुरू करू शकता.

10. Business

सध्याच्या आधुनिक काळात आंतरप्रेनरशिपला Entrepreneurship खूप महत्त्व मिळत आहे. यामध्ये युवकांचा कल वाढत चाललेला आहे. स्वतःचा बिझनेस सुरू करून त्याला उंच शिखरावर घेऊन जाण्याचे स्वप्न आजकालचे युवक पाहत आहेत. बारावी सायन्सचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही बिझनेस क्षेत्राकडे वळू शकता. बिजने क्षेत्रांमध्ये पहिली पायरी म्हणून तुम्ही बीबीए BBA- Bachelor of Business Administration हा कोर्स घेऊ शकता. आजकालच्या युवा पिढीला स्टार्ट-अप StartUp करणे याचा छंद लागलेला आहे.

स्टार्टअप करून ऑनलाईन बिजनेस सुरू करणे किंवा रिटेल मार्केटमध्ये बिझनेस सुरू करणे, त्याचप्रमाणे एखाद्या कंपनीशी निगडित बिजनेस करणे हे पर्याय उपलब्ध आहेत. बिझनेस करण्यासाठी रिस्क टेकिंग अबिलिटी Risk Taking Ability जे की युवा पिढींमध्ये खूप असते त्यांचा वापर करून बिजनेसची सुरुवात करता येते. उच्च शिक्षणासाठी तुम्ही एमबीए MBA- Master Of Business Administration देखील करू शकता. बिजनेस करण्यासाठी काही कौशल्य तुमच्या अंगी असायला हवेत जसे की मार्केटिंग (Marketing), सेलिंग (Selling), अकाउंटिंग (Accounting), ॲडव्हर्टायझिंग (Advertising), प्रॉडक्ट डिझाईनिंग (Product Designing) आणि इतर.

अधिक माहिती घेण्यासाठी वाचा – www.startupindia.gov.in

Conclusion on Top Career Options

वरील दिलेले Top Career Options हे तुम्ही बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर निवडू शकता. कुठल्याही क्षेत्रात जाण्याअगोदर त्या क्षेत्रासंबंधीत जाणकार व्यक्तींशी संपर्क साधावा. इंटरनेट वरून मिळालेली माहिती गोळा करावी आणि निगडीत क्षेत्राच्या ऑफिशियल वेबसाईट (Official Website) वर संपर्क साधून अधिक माहिती गोळा करणे आवश्यक आहे. वरील दिलेली Top Career Options after 12th ही एक सर्वसाधारण माहिती आहे.

FAQs On Top Career Options

1. बारावीत सायन्स स्ट्रीम म्हणजे काय?

दहावी नंतर बारावी शिक्षण घेण्यासाठी तुमच्याकडे पुरेशे विकल्प असतात जसे की कला, विज्ञान, वाणिज्य. त्यामध्ये बारावी सायन्स म्हणजे बारावी मध्ये विज्ञान हा विषय निवडणे. Top Career Options निवडल्यानंतर तुम्हाला Physics, Chemistry, Maths, Biology या विषयांवर भर दिला जातो आणि समोर प्रोफेशनल कोर्स करण्याकरिता Science Stream गरजेचे असते.

2. वरील दिलेल्या माहितीनुसार Top Career Options कुठला निवडावा?

वरील दिलेल्या ब्लॉग मधील ही माहिती सर्वसाधारण आहे. वरील दिलेले Top Career Options तुम्ही बारावी सायन्स स्ट्रीम मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर घेऊ शकता. तुम्हाला तुमचा करिअर ज्या क्षेत्रामध्ये घडवायचा आहे, त्या क्षेत्राबद्दल बारावी मध्ये कोर्स घेणे अनिवार्य असते.

वरील दिलेल्या ब्लॉग मधील माहिती तुम्हाला आवडली असल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा आणि करिअर बद्दल अधिक माहिती मिळवण्याकरिता आमचा ब्लॉग Vidyarthiyash नेहमी वाचा.

Leave a Comment