Air Hostess काय असते ? Full Information | Uplift Career in 2025

Air Hostess- एअर होस्टेस हे एक प्रोफेशनल कोर्स आहे आणि उच्च पदाची हाय प्रोफाइल असणारी नोकरी आहे. लाखो मुलींचे स्वप्न असते की एअर होस्टेस व्हायचे. एअर होस्टेस बनुन तुम्हाला परदेशात फिरण्याची संधी प्राप्त होते. त्याचबरोबर मोठमोठ्या सेलिब्रिटींना भेटण्याची संधी देखील मिळते. त्यामुळे एअर होस्टेसच्या करियर मध्ये तुम्ही जीवनामध्ये बरेच गोष्टी शिकता. या नोकरीमध्ये पगार देखील चांगला मिळतो. दिवसेंदिवस प्रवाशांचा कल हा विमानाने प्रवास करण्याकडे वाढत चाललेला आहे. त्यामुळे येणाऱ्या भविष्याच्या काळात एव्हिएशन इंडस्ट्री (Aviation Industry)ला खूप डिमांड आहे.

AIR HOSTESS COURSE
AIR HOSTESS

त्यामुळे या एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या लोकांना जसे की पायलट, टेक्निशियन अशा अनेक पदांवर नोकऱ्या भविष्यकाळात येणार आहेत. त्यामुळे एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये एअर होस्टेस होणे तुमच्या करियरला चांगला पर्याय राहू शकतो. आजच्या या आर्टिकल मध्ये आपण एअर होस्टेस कसे व्हायचे, त्यासाठी पात्रता काय, एअर होस्टेस बनण्याकरिता कुठले कोर्स करावे लागते, भारतामध्ये एअर होस्टेस कसे व्हायचे, एअर होस्टेस झाल्यानंतर पगार किती मिळतो आणि त्याच बरोबर इतर प्रश्नांची उत्तरे या आर्टिकल मधून घेणार आहोत. तेव्हा चला जाणून घेऊ एअर होस्टेस बद्दल पूर्ण माहिती.

एअर होस्टेस चांगले काम केले तर त्यांचे प्रमोशन देखील होत असते. एअर होस्टेसच्या प्रमोशनवर त्यांना सीनियर फ्लाईट अटेंडंट आणि त्याच्यानंतर हेड अटेंडंट पदांवर प्रमोशन होत असते. या नोकरीला आपण सरासरी 8 ते 10 वर्षांपर्यंत करू शकतो.

एअर होस्टेस काय असते ? What is Air Hostess?

Air Hostess– एअर होस्टेसला आपल्या मराठी भाषेत हवाई सुंदरी असे देखील ओळखले जाते. एका साधारण विमानामध्ये अनेक प्रकारचे प्रवासी प्रवास करत असतात. परंतु एकदा का जमिनीवरून विमान उडाले तर विमानातील प्रवाशांची जबाबदारी ही सगळी विमानात असलेल्या crew मेंबर्सची असते. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका एअर होस्टेस निभावतात. प्रत्यक्षात आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनात देखील एअर होस्टेसला मोठ्या जबाबदाऱ्या पाडाव्या लागतात. विमानामध्ये प्रवाशांना त्यांचा विमानाचा प्रवास आरामदायी वाटे याकरिता एअर होस्टेसची निवड करण्यात येते.

त्यांचे काम प्रवाशांचे तक्रारी सोडवणे, प्रवासा दरम्यान त्यांना जे हवं असेल ते देणे, प्रवास आरामदायी होवो याकरिता प्रयत्न करणे आणि पायलटने दिलेल्या माहितीची पूर्णपणे पालन करणे.फ्लाईट मध्ये येणाऱ्या सगळ्या प्रवाशांचे आदरपूर्वक आतिथ्य त्यांना करावे लागते. त्यामुळे त्या प्रवाशांना त्यांचा प्रवास हा आरामदायी वाटो, त्यांच्या काही तक्रारी असेल तर त्या सोडवणे आणि खूप शांत डोक्याने आणि सयंमाने त्यांच्या प्रश्नांना सोडवणे हे एअर होस्टेसचे काम असते.

एअर होस्टेसचे कोर्स कसे करावे ? Air Hostess Course

कुठल्याही फिल्ड मध्ये करिअर बनवण्याकरिता सगळ्यात पहिला प्रश्न जो आपल्या मनात येतो तो म्हणजे की हा कोर्स करण्याकरिता किंवा या फिल्डमध्ये करियर घडवण्यासाठी मला किती शिकलेला किंवा माझे शिक्षण काय असले पाहिजे. त्यामुळे तुम्हाला एअर होस्टेस बनायचे असेल तर तुमच्या मनात देखील हा प्रश्न नेहमी आला असेल की एअर होस्टेस बनण्याकरिता कुठला कोर्स Air Hostess Course करावा लागतो.एअर होस्टेस हा कोर्स अनेकांना वाटते की खूप सोपं असतो. एअर होस्टेस बनण्याचा कोर्स हा बारावीच्या परीक्षेनंतर सुरू होत असतो.

एअर होस्टेसच्या कोर्स (Air Hostess Course)ला प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही शाखेतून 12 वीची परीक्षा उत्तीर्ण करणे हे गरजेचे असते. त्याचप्रमाणे Aviation Industry क्षेत्राशी निगडित Course करणे गरजेचे असते. एअर होस्टेस होण्यासाठी काही सर्टिफिकेट, डिप्लोमा आणि डिग्री कोर्स अश्या तीन अभ्यासक्रमांच्या माध्यमातुन हा कोर्स करता येतो. हा कोर्स करताना मुलांना व्यवस्थापन कौशल्य, इमर्जन्सी किंवा आपत्ती व्यवस्थापन, आदरातिथ्य करण्याची पद्धत, त्याचप्रमाणे विमान नेवीगेशन संबंधित कौशल्य, विमानाचे मूलभूत सामान्य ज्ञान आणि याचबरोबर प्रवाशांसाठी केटरिंग सर्विसेस अशा काही गोष्टींची माहिती प्रदान करण्यात येते.

याचसोबत एअरलाइन्स कंपनी दहावीची परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना देखील एअर होस्टेस बनण्याची संधी प्रदान करत आहेत.

सर्टिफिकेट कोर्स– जे विद्यार्थी 12 वीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत असे विद्यार्थी हा सर्टिफिकेट कोर्स करू शकतात. या सर्टिफिकेट कोर्स मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट कोर्सचा देखील समावेश आहे. वेगवेगळ्या एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या संस्थेनुसार या सर्टिफिकेट कोर्सचा कालावधी ठरवलेला आहे. परंतु आपण सामान्य सर्टिफिकेट कोर्सचा कालावधी पाहिला तर तो सहा महिन्यांपासून ते एक वर्षांपर्यंत असते. काही कंपन्यांमध्ये फास्ट सर्टिफिकेट कोर्स देखील प्रदान करण्यात येते जे की फक्त तीन महिन्याचे असते.

डिप्लोमा कोर्स– 12 वीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एअर होस्टेस बनण्याकरिता डिप्लोमा कोर्स हा एक उत्तम पर्याय आहे. डिप्लोमाचे शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही पीजी डिप्लोमा कोर्स देखील करू शकता. कुठल्याही मान्यताप्राप्त संस्थेचे डिप्लोमा कोर्सचा कालावधी हा 6 ते 12 महिन्यांचा असतो. डिप्लोमा इन एअर होस्टेस ट्रेनिंग, केबिन क्रू फ्लाईट अटेंडंट ट्रेनिंग, डिप्लोमा इन एव्हिएशन अँड हॉस्पिटल मॅनेजमेंट असे कोर्स करून तुम्ही एअर होस्टेस मध्ये आपले करिअर घडवू शकता.

डिग्री कोर्स– 12 वीच्या परीक्षा नंतर एअर होस्टेस बनण्याकरिता डिग्री कोर्स करणे हा एक सर्वोत्तम उपाय पर्याय आहे. कारण की हा कोर्स भविष्याच्या काळामध्ये खूप खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कोर्सचा कालावधी तीन वर्षांचा आहे हा कोर्स करून उत्तम एअर होस्टेस होऊ शकता. प्लेसमेंट साठी एविएशन इंडस्ट्रीज एअर होस्टेस डिग्री कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांना अधिक प्राधान्य मिळते. बीएससी इन एअर होस्टेस ट्रेनिंग, बीएससी एव्हिएशन बॅचलर ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट असे काही कोर्सेसची नावे आहेत.

Also Read- पायलट(Pilot) कसं बनायचं? Eligibility Criteria, Admission Process, Course, Fees, 1लाखची Salary!

एअर होस्टेसचे महत्वपूर्ण कामे (Work of Air Hostess)

या एअर होस्टेसला फ्लाईट अटेंडंट, केबिन क्रू मेंबर अशा नावाने देखील ओळखले जाते. खालील दिलेल्या माहितीनुसार आपण जाणून घेऊ त्यांचे जबाबदाऱ्या काय असते.

एकदा का विमान उडाले की विमानामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सगळी जिम्मेदारी ही एअर होस्टेसची असते. प्रवास करणाऱ्या यात्रियांचे स्वागत करणे, विमानामध्ये प्रवास करणाऱ्या यात्रियांचे स्वागत करून त्यांना आपल्या सीटवर बसण्याकरिता मार्गदर्शन करणे, त्याचसोबत यात्रीच्या कॅरिऑन सामान ठेवण्यामध्ये त्यांची मदत करणे, त्याचप्रमाणे उडानच्या दौरान येणाऱ्या यात्रीयांकडे लक्ष ठेवणे, खास करून असे लोकं जे विकलांग आणि ज्यांना चिकित्सा अशा लोकांकडे काळजीपूर्वक लक्षात ठेवणे.

सुरक्षा ब्रीफिंग देणे– विमान उडण्याच्या अगोदर सगळ्या यात्रियांना सुरक्षा बद्दल माहिती प्रदान करणे. त्याचप्रमाणे प्रत्येक यात्रीला सुरक्षाची प्रक्रिया काय आहे आणि सुरक्षेचे उपकरण काय आहे हे सगळे दाखवणे. जसे की इमर्जन्सी एक्झिट डोअर, ऑक्सिजन मास्क वगैरे, सुरक्षा आणि आपत्कालीन प्रोटोकॉलचे पालन करणे.

सेवा प्रदान करणे – दरम्यान प्रवाशांना खाण्यापिण्याची सेवा प्रदान करणे. प्रवाशांनी विचारलेल्या प्रश्नांची काळजीपूर्वक उत्तरे देणे.

इमर्जन्सी सिच्युएशन- आपत्कालीन स्थितीमध्ये यात्रियांची सुरक्षा याच्याकडे आवश्यक लक्ष देणे.

टीम वर्क- आपल्या सोबत प्रवास करणाऱ्या मेंबर सोबत चांगला टीम वर्क ठेवणे.

एअर होस्टेससाठी लँग्वेज (Language for Air Hostess)

अनेकांच्या मनामध्ये प्रश्न असतो की एअर होस्टेस बनण्याकरिता आपल्याला इंग्लिश या भाषेची गरज असते. तर ही गोष्ट पूर्णपणे सत्य आहे. आजच्या युगामध्ये इंग्लिश भाषा ही खूप महत्त्वाची भाषा ठरलेली आहे. त्यामुळे एअर होस्टेस बनण्याकरिता तुम्हाला इंग्लिश बोलणे किंवा इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. त्याचसोबत डोमेस्टिक एरलाईन्स मध्ये होण्याकरिता इंग्लिश आणि हिंदी या भाषांवर कमांड असणे गरजेचे आहे. या दोन भाषांवर कमांड असलेले विद्यार्थी आणि त्याच बरोबर त्यांना येत असलेली एखादी विदेशी भाषा जसे की जर्मन, फ्रेंच किंवा स्पॅनिश अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या एअर होस्टेस करिअरमध्ये खूप फायदा होत असतो. नोकरी आंतरराष्ट्रीय एअरलाइन्स मध्ये लागू शकते.

आदर्श एलिजिबिलिटी क्रायटेरिया (Eligibility Criteria for Air Hostess)

एअर होस्टेस बनण्याकरिता शैक्षणिक पात्रतेपेक्षा अन्य काही गोष्टी देखील महत्त्वाच्या ठरतात. या गोष्टींमुळे तुम्ही एअर होस्टेस बनण्याच्या लायक आहात की नाहीत असे समजते.

वय Age– आवेदकाचे वय हे किती असायला पाहिजे हे त्या एअर लाईन कंपनीच्या पॉलिसीज वर निर्भर असते. परंतु साधारणतः एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये एअर होस्टेस बनण्याकरिता 18 वर्षांपासून 27 वर्षांपर्यंत वय मर्यादा आहे.

Marital Status– एअर होस्टेसचे लग्न झाले असणे गरजेचे आहे किंवा नाही या प्रश्नाचे उत्तरे देखील तुम्हाला पर्टिक्युलर एअरलाइन्स कंपनीच्या पोलिसी मध्ये नमूद केलेले दिसेल. परंतु एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये ज्या मुलींचे लग्न झालेले नसतात अशा मुलींना जास्त डिमांड असते. परंतु काही संस्थांमध्ये विवाहित मुलींना देखील प्राधान्य दिले जाते. त्यामुळे जो आवेदक हा अन मॅरीड असेल त्याला जास्त प्राधान्य मिळणार.

हाईट Height- उंची बद्दल बोलायचे झाले तर उमेदवाराची कमीत कमी उंची ही 155 cm असणे गरजेचे आहे. पुरुष करिता ही उंची 165 cmअसणे गरजेचे आहे.

वजन Weight- मिळालेल्या माहितीनुसार असे समजते की एअरलाइन्स किंवा एविएशन इन्स्टिट्यूटमध्ये वजनाबद्दल असे कुठलेही आकडे स्पष्ट केलेले नाहीत. परंतु तुमचे शरीराचे वजन हे तुमच्या उंचीनुसार अनुपात असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे तुम्ही स्वस्थ आणि फिट असणे गरजेचे आहे. या प्रक्रियेसाठी बॉडी मास इंडेक्स BMI चा वापर केला जातो. महिलांकरिता बॉडी मास इंडेक्स हा 18 ते 22 तर पुरुषांसाठी बीएमआय इंडेक्स 18 ते 25 पर्यंत असणे गरजेचे आहे.

विजन Vision- उमेदवाराची विजन कमीत कमी 6/9 असणे गरजेचे आहे. उमेदवारांच्या डोळ्यांवर जर कॉन्टॅक्ट लेन्स असेल तरीही ते स्वीकारल्या जातील.

स्ट्रेंथ Strength- उमेदवाराच्या मध्ये 90 किलोच्या सर्विस कार्टला ढकलण्याची क्षमता असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे प्रवाशांच्या luggageला overhead storage मध्ये ठेवण्याची strength गरजेचे आहे.

स्विमिंग Swimming- फ्लाईट अटेंडंट किंवा एअर होस्टेसला स्विमिंग येणे खूप आवश्यक आहे. ऍडमिशन करतानी कुठलाही स्विमिंग टेस्ट घेतल्या जात नाही. परंतु इंटरव्यू मध्ये नेहमी विचारले जाते की उमेदवाराला स्विमिंग येते किंवा नाही. विद्यार्थ्याला वॉटर सिकनेस किंवा वॉटर फोबिया असता कामा नये. डोमेस्टिक एअर लाईन अप्लाय करतानी स्विमिंग असणे गरजेचे नाही. इंटरनॅशनल एअर लाईन मध्ये अप्लाय करायचे असल्यास स्विमिंग येणे खूप गरजेचे आहे.

काही एअरलाइन्स स्विमिंग टेस्ट देखील घेत असतात. त्यामध्ये उमेदवाराला 25 m पोहणे गरजेचे असते.

एअर होस्टेस बनण्याकरिता स्किल्स (Top Skills Required for Air Hostess)

खाली दिलेल्या माहितीनुसार आपण जाणून घेऊ की एअरहोस्टेस होण्याकरिता तुम्हाला कुठल्या स्किल्सची गरज आहे.

कम्युनिकेशन स्किल्स- एअर होस्टेस होणे हा एक प्रोफाइल नोकरी आहे. त्यामुळे तुम्हाला कम्युनिकेशन तुमच्या संवाद कौशल्य चांगले असणे खूप गरजेचे आहे. संवाद कौशल्य मध्ये तुम्हाला इंग्लिश आणि इतर इंटरनॅशनल लँग्वेज येणे गरजेचे आहे.

मनभावक व्यक्तित्व- सुंदर दिसण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे असते आपले मन सुंदर ठेवणे. आपल्या बोलीमध्ये मधुरता असणे. एअर होस्टेस बनण्याकरिता मित्रत्वाची भावना यात्री सोबत करावी लागते. त्यामुळे त्यांचा व्यवहार मिळणारा असावा.

टीम वर्क- प्रत्येक एअर होस्टेसला आपल्या टीम मध्ये चांगल्या प्लेयरची भूमिका निभवावी लागते. साधारणतः एका केबिन क्रू मध्ये 12 ते 14 सदस्य असतात. त्यामुळे सगळ्या फ्लाईट अटेंडन्सला टीम मध्ये काम करणे खूप गरजेचे आहे.

एका एअर होस्टेस चे दृष्टिकोन हे सकारात्मक असणे गरजेचे आहे.

कधीकधी वातावरण खराब झाल्या कारणाने विमानाची उडान हे उशिरा होत असते. त्याकरिता एअर होस्टेसच्या अंगी जास्त वेळ काम करण्याची तयारी असणे गरजेचे आहे.

एअर होस्टेस कोर्सचे प्रशिक्षण संस्था (Top Institute for Air Hostess Course Training)

भारतातील टॉप एअरलाइन्स

  • जेट एअरवेज
  • सिंगापूर एअरलाइन्स
  • इंडिगो
Indigo
Indigo
  • स्पाइस जेट
Spicejet
Spicejet
  • गो एअर
  • एअर एशिया
  • विस्तारा एअरलाईन

एअर होस्टेस सॅलरी (Air Hostess Salary)

भारतामध्ये विचार केला तर एअर होस्टेसची सॅलरी ही दर महिन्याला 40 ते 50 हजार रुपयांपर्यंत असते. काही कंपन्यांमध्ये एअर होस्टेसची सुरुवातीची सॅलरी ही 50,000 ठरवलेली असते. आंतरराष्ट्रीय एअर होस्टेस बनल्यावर तुमच्या सॅलरी मध्ये वाढ होत असतो. त्याचप्रमाणे भारतामध्ये एअर होस्टेस बनल्यावर प्रमोशन मिळाल्यावर तुमचा पगार वाढ होतो. सॅलरी बद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही कंपनीच्या पॉलिसीजला वाचू शकता.

1.मुले देखील एअर होस्टेसचा कोर्स करू शकतात का?

होय. मुले देखील एअर होस्टेस सारखा कोर्स करू शकतात. त्या कोर्सला फ्लाईंग स्टुवर्ड असे म्हणतात.

2.एअर होस्टेस कोर्सला प्रवेश घेण्याकरिता कुठली शैक्षणिक पात्रता गरजेची आहे?

एअर होस्टेसचा कोर्स करण्याकरिता तुम्हाला 12 वीची परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

3.एअर होस्टेस कोर्सला किती खर्च येऊ शकतो

साधारणतः या कोर्ससाठी तुम्हाला तीन लाख रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो.