Current Affairs 05 December 2024
Current Affairs 05 December 2024:- सध्याच्या परीक्षेच्या युगामध्ये करंट अफेयर्सचे ज्ञान प्राप्त करणे खूप गरजेचे आहे. याने विद्यार्थ्यांना त्यांची आकलन कसे होत आहे बद्दलची माहिती मिळते आणि अध्ययन क्षेत्राच्या संबंधित विशेष घटना त्याबद्दल माहिती मिळते. घटना किंवा करंट अफेयर्स हे परीक्षेमध्ये विचारले जाते. या करंट अफेअर्स चे काम तुम्हाला RAILWAY, SSC, SSB, CGL, UPSC, MPSC, RRB, LOCOPILOT, JUNIOR LEVEL EXAM, STATE PUBLIC SERVICE COMMISSION, POLICE ENTRANCE EXAM, RTO, MVO, PSU, GATE, ENGINEERING ENTRANCES ETC अशा अनेक सरकारी आणि शासकीय स्पर्धा परीक्षेमध्ये उपयोगी पडणार आहे. Vidyarthiyash मधील करंट अफेयर्स वाचून निबंध लेखन करता येते. त्यामुळे परीक्षेच्या तयारीच्या वेळेस करंट अफेयर्स नित्यनेमाने रोज वाचणे गरजेचे आहे. Please read Current Affairs of 09 December 2024.
आजचे सुविचार-
‘आयुष्यात कुठल्याही परीस्थितीत सुखी राहण्याचा प्रयत्न करा, दुःखी राहिल्याने उद्याचे प्रॉब्लेम सुटणार नाहीयेत उलट आजचे सुख सुद्धा निघून जाईल.’
Current Affairs 05 December 2024
1. नुकतेच बिहार पवेलियनला 43 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यामध्ये सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले.
2. नुकतेच राज मनचंदा यांचे निधन झाले आहे. ते एक प्रसिद्ध स्क्वॅश खेळाडू होते.
3. नुकतेच मध्य प्रदेश या राज्यातील रातापानी अभयारण्य हे मध्य प्रदेश राज्याचे 9वे टायगर रिझर्व बनलेले आहे. रातापानी हा अभयारण्य भोपाल जवळ आहे. मध्यप्रदेश राज्यातील हा नववा टायगर रिझर्व असणार आहे. मध्यप्रदेश राज्य सरकारने 2 डिसेंबर रोजी याची सूचना जारी केली आहे. त्यासोबतच एक डिसेंबरला केंद्र सरकारने शिवपुरीच्या माधव नॅशनल पार्कला मध्यप्रदेशचा आठवा टायगर रिझर्व घोषित केला आहे. सोबतच आपण मध्यप्रदेश बद्दल थोडीशी माहिती घेऊ. मध्यप्रदेश या राज्याची राजधानी भोपाल शहर आहे. मध्यप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री हे डॉक्टर मोहन यादव आहेत. मध्यप्रदेश राज्याचे राज्यपाल मंगुभाई पटेल आहेत. नुकतेच पंकज त्रिपाठी यांना मध्य प्रदेश पर्यटन चेहरा घोषित केला आहे. मध्य प्रदेश या राज्यामध्ये भारताचा पहिला कागद रहित चुनाव आयोजित केला गेला. चौथा राष्ट्रीय हिंदी विज्ञान संमेलन 2024 भोपाल मध्ये आयोजित झाला.
4. नुकतेच श्रीनगर या शहराला वर्ल्ड क्राफ्ट सिटीचे टॅग मिळाले आहे.
5. नुकतेच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने ब्रेन रोट Brain Rot ला वर्ड ऑफ द इयर घोषित केले आहे.
6. मारिया विक्टोरिया जुआन यांनी एस्टर गार्डियन्स ग्लोबल नर्सिंग अवॉर्ड 2024 Aster Guardians Global Nursing Award 2024 जिंकलेला आहे.
7. नुकतेच एशिया मधील पहिली जल परिवहन सेवा उबर शिकारा डाल लेक येथे सुरू करण्यात आली.
8. नुकतेच भारत हा पहिल्यांदा दृष्टी बाधित महिला T-20 विश्व कप ची मेजवानी करणार आहे.
9. नुकतेच इयान रेडपात यांचे निधन झालेले आहे. ते ऑस्ट्रेलियाचे पूर्व क्रिकेटर होते. आपण ऑस्ट्रेलिया या देशाबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी कॅनबेरा आहे. ऑस्ट्रेलिया या देशामध्ये ऑस्ट्रेलियन डॉलर हे चलनामध्ये आहे. ऑस्ट्रेलिया या देशाचे प्रधानमंत्री अंतोनी अल्बनी आहे. 55 व्या भारत आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवचा फोकस देश म्हणून ऑस्ट्रेलिया या देशाला घोषित करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया या देशामधील प्रसिद्ध मेलबर्न विश्वविद्यालय ने नवी दिल्ली येथे आपला पहिला ग्लोबल सेंटर उघडला आहे. ऑस्ट्रेलिया या दिशाने t20 इंटरनॅशनल क्रिकेट इतिहासामध्ये पावर प्ले मध्ये सगळ्यात मोठे रन टोटल बनवले आहे. ऑस्ट्रेलिया या देशाने सोशल मीडियावर मुलांची सुरक्षाकरिता आयु मर्यादा लावण्याचे कानून बनवले आहे.
10 नुकतेच दक्षिण कोरिया South Korea emergency या देशामध्ये इमर्जन्सी लावण्यात आलेली आहे. दक्षिण कोरिया या बद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. दक्षिण कोरिया या देशाची राजधानी सियोल आहे. दक्षिण कोरियामध्ये वन चलनामध्ये आहे. दक्षिण कोरियाच्या सरकारने भारतीय अभिनेत्री अनुष्का सेन यांचा सन्मान केला आहे. दक्षिण कोरिया जगातील सगळ्यात मोठ्या चीप सेंटरचे निर्माण करणार आहे. दक्षिण कोरिया आपला पहिला स्वदेशी अंतरिक्ष रॉकेट नुरी लॉन्च करणार आहे.
11. नुकतेच नवी दिल्ली येथे 20 वी एशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप सुरू करण्यात आली आहे झाली.
12.नुकतेच जाहीर केलेल्या आकडा नुसार भारतामध्ये वाघांची संख्या ही 3682 झाली आहे.
The above information is taken from the published articles, well noted newspapers, articles trending on social media, popular TV news channels, etc.
तुम्हाला आमच्या वेबसाईट बद्दलची माहिती Current Affairs 05 December 2024 आवडली असल्यास ही माहिती तुम्ही आपल्या मित्र परिवारात नक्की शेअर करा आणि अशाच करंट अफेयर्सच्या माहितीबद्दल आमच्या Vidyarthiyash वेबसाईटला फॉलो करत जा.