Fashion Designer कसे बनायचे ? Full Information | 2025 मधील Best Career opportunity !


Fashion Designer कसे बनायचे ? – आजच्या या आधुनिक युगामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये फॅशन आले आहे आणि हे फॅशन लवकरच बदलत राहते. याच कारणामुळे लोकांना फॅशन इंडस्ट्रीमध्ये खूप आवड निर्माण झालेली आहे. बदलत्या काळाची फॅशनची गरज ही एका फॅशन इंडस्ट्री मध्ये रूपांतर झालेली आहे. तुम्हाला सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की या फॅशन इंडस्ट्रीमध्ये एक अशी फिल्ड आहे जिथे माणसामध्ये असलेल्या कलेला वाव मिळते आणि त्या फिल्डचे नाव आहे फॅशन डिझायनिंग Fashion Designing. फॅशन डिझायनिंग मध्ये तुम्हाला क्रिएटिव्हिटी , कलाकौशल्य, सुरू असलेले प्रचलित ट्रेंड्स आणि त्यांच्यात बदलत राहणाऱ्या व्यक्तिगत कपड्यांच्या स्टाईल्स अशा नाना प्रकारच्या कला कौशल्यांना शिकण्याचा मोका मिळतो.

How to become Fashion Designer
How to become Fashion Designer

जर तुम्ही देखील फॅशन डिझायनिंग मध्ये इच्छुक असाल आणि एक उत्कृष्ट फॅशन डिझायनर Fashion Designer बनण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्हाला या फिल्डमध्ये माहिती देण्याचे काम आम्ही आजच्या या ब्लॉगमध्ये करणार आहोत. या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला फॅशन डिझायनर कसे बनायचे या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत. सोबतच फॅशन डिझायनर Fashion Designer कोर्स कसे करायचे, कोर्स केल्यानंतर या फॅशन इंडस्ट्रीच्या फील्डमध्ये चांगली नोकरी कशी मिळवायची आणि आपला चांगला करियर कसा घडवायचा याबद्दल देखील मार्गदर्शन करणार आहोत. तेव्हा हा ब्लॉग तुमच्यासारख्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये आवड ठेवणाऱ्या व्यक्तींच्या खूप उपयोगाचा ठरणार आहे. या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती संपूर्ण वाचा.

Table of Contents

या ब्लॉग मध्ये तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो फॅशन डिझायनिंग फक्त कपडे शिवणे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांना डिझाईन देऊन कपडे बनवणे इतकेच नव्हे. तर विविध प्रकारचे शरीरावर धारण करणारे वस्तू डिझाईन करणे, कपड्यांवर जरीचे काम करणे, उत्कृष्ट अशी डिझाईन तयार करणे आणि व्यक्तिगत स्टाइल्स लोकांपर्यंत पोहोचवण्याचा काम करणे. ह्या सगळ्या गोष्टी या फिल्डशी निगडित आहेत. तेव्हा जाणून घेऊ या फिल्ड बद्दल पूर्ण माहिती.

Also Read- 12वी सायन्स नंतर Top Career Options.जाणून घ्या तुमच्यासाठी कुठले बेस्ट!

फॅशन डिझायनिंग म्हणजे काय ? What is Fashion Designing?

फॅशन इंडस्ट्री मधला हा महत्त्वाचा कोर्स आहे. फॅशन डिझायनिंग मध्ये कापड बनवणाऱ्या फॅब्रिकचे योग्य अशा विशिष्ट डिझाईनमध्ये आखून एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या गरजेनुसार कपडे तयार करणे. त्याचसोबत त्या व्यक्तीचे व्यक्तिगत कपड्यांकरिता आणि कपड्यांवर शोभून दिसेल अशा वस्तूंना डिझाईन करणे ज्यामुळे की त्या व्यक्तीला सुंदर असा क्रिएटिव्ह लूक दिसणार. या गोष्टींबद्दल माहिती प्रदान केली जाते. नवनवीन बदलते ट्रेंड्स, कपडे, ॲक्सेसरीज, ज्वेलरी, शूज इत्यादींचा समावेश आपण फॅशन डिझायनिंग मध्ये करत असतो. कपड्यांची डिझाईन केले गेल्यानंतर त्याची निर्मिती करू शकतो आणि मार्केटिंगच्या भरोशावर आपण त्यांना बाजारामध्ये चांगल्या किंमतीमध्ये विकू देखील शकतो.

बदलत्या काळानुसार फॅशन डिझायनिंग हा फक्त कपड्यांपर्यंत सीमित राहिलेला नाही. तर जर कुठल्या एखाद्या विशिष्ट व्यक्तीने डिझाईन केलेले कपडे परिधान केले असतील तर त्या व्यक्तीमध्ये त्या कपड्यांवर वस्तू जसे की हातामध्ये असलेली पिशवी, शूज किंवा चप्पल, वस्तू किंवा ज्वेलरी, घडी किंवा नेकलेस या सर्व गोष्टींचा समावेश करून त्या व्यक्तीला एक क्रिएटिव्ह लूक दिला जातो.

दिवसेंदिवस वाढणाऱ्या ट्रेंड्समुळे आणि लोकांच्या आवडीचे फॅशन येत असल्यामुळे या फॅशन इंडस्ट्रीमध्ये नोकऱ्यांना भरपूर मागणी मिळत आहे. तर तुम्ही देखील आपल्या मनामध्ये असलेली कला आणि कौशल्याच्या भरोशावर या फॅशन इंडस्ट्रीमध्ये एक चांगला कोर्स करून तुम्ही एक फॅशन इंडस्ट्रीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवु शकतात.

Fashion Designing Course​ करण्यासाठी फॅशन डिझायनिंगला लागणारे आवश्यक गोष्टी

एक चांगला फॅशन डिझायनर होण्याकरिता फॅशन डिझायनिंगचा कोर्स Fashion Designing Course​ केल्याने तुमच्या अंगी खालील दिलेले आवश्यक कौशल्य देखील असणे गरजेचे आहे.

  • तुम्ही जर चांगले डिझायनर असाल तर तुम्हाला बनवलेल्या डिझाईनमध्ये कुठला कापड वापरणे गरजेचे आहे हे ठाऊक असणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे कपड्याचे सिलेक्शन डिझाईन प्रमाणे करणे खूप गरजेचे आहे.
  • काही कपडे काही विशेष कार्यक्रमासाठी डिझाईन केले जातात. त्यामुळे अशा पॅकेजेसचे कपडे डिझाईन करण्याची कला तुमच्या अंगी असणे गरजेचे आहे.
  • फक्त कपडे डिझाईन करून आणि कपडे निर्माण करून देणे एवढेच नव्हे तर तुमच्या अंगी कपडे प्रस्तुत करण्याच्या अगोदर थीम किंवा एखादी गोष्ट असणे खूप गरजेचे आहे. म्हणजेच तुम्हाला मार्केटिंगची आवड असणे गरजेचे आहे.
  • मार्केटमध्ये उपलब्ध असलेले डिझाईन यांना तुमच्या क्रिएटिव्हिटी कसे उत्कृष्ट बनवता येईल याचे शिक्षण असणे गरजेचे आहे.
  • मार्केट रिसर्च कौशल्य अंगी असणे गरजेचे आहे.
  • फेमस आणि पॉप्युलर फॅशन ट्रेंड्स नेहमी बघत राहणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्याकडे ऑब्झर्वेशन स्किल Observation Skill असणे गरजेचे आहे.

फॅशन डिझायनिंग कोर्स काय असते ? What is Fashion Designing Course?

फॅशन इंडस्ट्री मधला हा एक प्रसिद्ध फॅशन डिझायनिंग कोर्स आहे. या कोर्समध्ये तुम्हाला कपड्यांची सुंदरता कशी वाढवली जाते याबद्दलची माहिती पुरवली जाते. कपड्यांवर कुठले डिझाईन उठून दिसेल, कपड्यावर जरीचे काम कसे केले जाते याबद्दल माहिती प्रदान केली जाते. प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये स्वतः सुंदर दिसण्याची मन भावना असते. आपण घातलेल्या कपड्यांचा प्रभाव आपण दुसऱ्यांवर पाडला पाहिजे हे त्यांच्या मनात नेहमी चालत असते. त्याकरिता त्याच्या आवडीनुसार त्याच्या मनात असलेल्या डिझाईन नुसार तो कपडे शिवून घेत असतो. म्हणूनच फॅशन डिझायनिंगच्या कोर्सला खूप महत्त्व आलं आहे.

फॅशन डिझायनिंग आत्ताच्या युगामध्ये फक्त कपडे शिवण्यापर्यंत मर्यादित राहिलेली नाही. तर कपड्यांवर कुठली एम्ब्रोईडरी करायची, त्याचे प्रकार किती असते, डिझाईन कसे काढायचे, कुठल्या कपड्यांवर कुठल्या रंगाचा कपडा उठून दिसेल, कपडे तयार करून झाल्यानंतर त्यांची रखरखाव कशी करायची अशा अनेक प्रकारच्या गोष्टी या फॅशन डिझायनिंगच्या कोर्समध्ये शिकवले जातात.

आजच्या याबद्दलचा युगामध्ये पारंपारिक वेशभूषा ही पूर्णतः समाप्ती वर आहे. परंतु डिझायनिंग मुळे समाप्त झालेली ही वेशभूषा नवीन स्वरूपामध्ये नवीन स्पर्धेच्या युगामध्ये कसे आणता येईल बद्दल फॅशन डिझायनर नेहमी प्रयत्न करत असतात आणि आपण देखील जुन्या स्टाईलमध्ये असलेले कपडे परिधान केल्यानंतर आपला प्रभाव हा दुसऱ्यांवर कसा पडतो हे पाहण्याची आपल्या मनामध्ये उत्सुकता असते. त्यामुळे आपण अशा कपड्यांना जास्त किमतीमध्ये विकत घेत असतो. तर फॅशन डिझायनिंग कोर्स मध्ये मार्केटिंग बद्दलचे देखील ज्ञान पुरवले जाते.

Also Read- Air Hostess काय असते ? Full Information | Uplift Career in 2025

Fashion designer Trends
Fashion designer Trends

फॅशन डिझायनिंग कोर्स | Fashion Designing course

खालील दिलेले काही फॅशन डिझायनिंगचे कोर्स आहे. हे करून तुम्ही आपल्या फॅशन डिझायनर करिअरला सुरुवात करू शकता.

यामध्ये खालील काही कोर्सेस आहेत जे तुम्ही दहावीची परीक्षा झाल्यानंतर करू शकता. अशा कोर्सेसला फॅशन डिझायनर डिप्लोमा कोर्स नावाने संबोधले जातात. तर हे डिप्लोमा कोर्सेस खालीलप्रमाणे आहेत.

  • Diploma in Fashion Designing
  • Diploma in Fashion Stylist and Image Consultant
  • Diploma in Fashion Stylist
  • Diploma in Fashion and Textile Design

10वी नंतर देखील फॅशन डिझायनिंगचे कोर्सेस उपलब्ध आहेत.

कोर्सेस करण्याकरिता तुम्हाला बारावीची परीक्षा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. 12 वी नंतरचे फॅशन डिझायनिंग कोर्सला फॅशन डिझायनर पदवी / बॅचलर कोर्स या नावाने देखील संबोधले जाते. खालील दिलेले काही 12 वी नंतरचे बॅचलर कोर्स आहेत.

  • Bachelor in Fashion Design
  • Bachelor in Textile Design
  • BA Honors in Fashion Design and Creative Direction
  • BA Honors in Fashion Design and Manufacturing
  • BSc Fashion Designing
  • Bachelor of Fashion Technology

पदवी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर इच्छुक विद्यार्थ्यांना मास्टर्स करायचे असल्यास किंवा उच्च शिक्षण घ्यायचे असल्यास फॅशन इंडस्ट्रीमध्ये खालील Fashion Designing Courses करून तुम्ही फॅशन डिझायनिंग मध्ये मास्टर्स पदवी मिळवू शकता.

  • Master in Fashion Design
  • Master in Sustainable Fashion Design
  • Master in Fashion Technology
  • Master’s Program in Fashion, Textile and Textile Design
  • Master in Fashion Collection Management
  • Master of Fashion Management

फॅशन डिझायनिंग कोर्स साठी पात्रता आहे काय ? Eligibility Requirement for Fashion Designing Course

फॅशन डिझायनिंग आकर्षक करिअर आहे. या क्षेत्रामध्ये क्रिएटिव्हिटी तर आहेच पण त्याचसोबत भरपूर जबाबदाऱ्या देखील आहेत. म्हणूनच या इंडस्ट्रीच्या क्षेत्रामध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला काही पात्रता पार पाडावी लागणार आहे. ही पात्रता खालीलप्रमाणे आहे.

  • जर तुम्हाला कोर्सेस करायचे असले तर तुम्हाला 10 वीची परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्याचसोबत काही संस्थांमध्ये 10 वी नंतर डिप्लोमा कोर्स करण्याकरिता प्रवेश परीक्षादेखील असू शकते.
  • बॅचलर कोर्स करण्याकरिता तुम्हाला 12 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. 12 वी मध्ये तुम्हाला विज्ञान, वाणिज्य किंवा कला या क्षेत्रातून चांगले गुण आणणे खूप गरजेचे आहे. डिप्लोमा कोर्स सारखेच बॅचलर कोर्स प्रदान करणाऱ्या संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी तुम्हाला प्रवेश परीक्षा देण्याची गरज देखील पडू शकते.
  • या प्रवेश परीक्षांमध्ये सामान्यतः डिझायनिंग बद्दल जनरल प्रश्न विचारले जातात. जसे की ड्रॉइंग, डिझाईन क्षमता, रंग संगती आणि त्याच बरोबर सामान्य ज्ञान आणि इंग्रजी भाषेचे प्रश्न विचारले जातात.

Also Read- हॉटेल मॅनेजर कसे बनायचे? Hotel Management courses after 12th Full True Information

फॅशन डिझायनिंग कोर्स साठी टॉप विदेशी युनिव्हर्सिटी | Top Foreign Universities for Fashion Designing Course

फॅशन डिझायनिंगचे कोर्स प्रदान करणाऱ्या खालील काही विदेशी टॉप युनिव्हर्सिटी आहेत.

  • कोरिया युनिव्हर्सिटी ऑफ वेलिंग्टन
  • मॅंचेस्टर मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटी
  • युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स
  • युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्स लंडन
  • यूनिवर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी सिद्दी सिडनी
  • बर्मिंगहॅम सिटी यूनिवर्सिटी
  • गिफ्ट युनिव्हर्सिटी इत्यादी

फॅशन डिझायनिंग कोर्स करिता टॉप इंडियन कॉलेजेस | Best Fashion Designing Colleges in India​

फॅशन डिझायनिंगचा कोर्स खालील दिलेल्या काही टॉप इंडियन कॉलेजेस (Best Fashion Designing Colleges in India​) मध्ये उपलब्ध आहेत.

NIFT for Fashion Designer
NIFT for Fashion Designer : Image Reference- Website of NIFT
  • पर्ल अकॅडमी
  • जेडी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी
  • नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन
  • एमिटी स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी
  • आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन अँड डिझाईन
  • इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाईन
  • नोर्थरन इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मोहाली इत्यादी

फॅशन डिझायनिंग कोर्स करिता प्रवेश परीक्षा | Entrance Exam For Fashion Designing Course

खालील दिलेले काही डिझायनिंग कोर्स करिता लागणाऱ्या प्रवेश परीक्षेची नावे आहेत.

  • All India Entrance Test for Design
  • Symbiosis Entrance Exam for Design
  • Pearl Academy Entrance Exam
  • IIAD Entrance Exam
  • NIIFT Entrance Exam
  • FDDI AIST Entrance Exam
  • NID Entrance Exam
  • United World Institute of Design Aptitude Test
  • GLS Institute of Design DAT

फॅशन डिझायनरचे करियर स्कोप | Career Scope of Fashion Designer

फॅशन डिझायनिंग कोर्स करून तुम्ही फॅशन डिझायनर Fashion Designer बनता. खालील दिलेले काही फॅशन डिझायनिंगचे करियर आहेत.

  • रिटेल मॅनेजर
  • फॅशन डिझायनर
  • मेकअप आर्टिस्ट
  • फॅशन मॉडेल
  • फॅशन जर्नालिस्ट
  • टेक्स्टाईल डिजाइनर
  • ज्वेलरी डिझायनर
  • फुटवेअर डिझायनर आणि स्टायलिस्ट
  • फॅशन स्टायलिस्ट

भारतातील काही प्रसिद्ध फॅशन डिझायनरची (Famous Fashion Designer) नावे खालील प्रमाणे आहेत.

  • Manish Malhotra
  • Anju Modi
  • Ritu Kumar
  • Anamika Khanna
  • Neeta Lulla

FAQs on Fashion Designer

1.फॅशन डिझायनिंगचा कोर्स केल्यानंतर किती सॅलरी मिळते ?

आजकालच्या आधुनिक युगामध्ये आणि बदलत्या ट्रेंडनुसार फॅशन इंडस्ट्रीमध्ये खूप स्कोप आहे. ज्याच्या अंगी क्रिएटिव्हिटी असते आणि कला कौशल्याचे गुण असतात तो व्यक्ती मेहनत करून या क्षेत्रामध्ये चांगल्या पगाराची नोकरी करू शकतो. तो स्वतःच्या मेहनतीच्या बळावर स्वतःचे फॅशन डिझायनिंगचे बिझनेस देखील सुरू करू शकतो. रिपोर्टच्या अनुसार भारतामध्ये फॅशन डिझायनरची एवरेज सॅलरी ही 380000 रुपये वार्षिक आहे. परदेशात पहाला तर याची डिमांड भरपूर आहे. परदेशामध्ये जवळपास 28 लाख रुपये वार्षिक उत्पन्न आहे. याचा अर्थ असा की फॅशन इंडस्ट्रीमध्ये पाश्चिमात्य देशांमध्ये खूप स्कोप मिळत आहे.

2. फॅशन डिझायनिंग कोर्स हा किती वर्षाचा असतो ? Duration Of Fashion Designing Course

सर्वसाधारणतः फॅशन डिझायनिंगचा कोर्स हा एका वर्षापासून चार वर्षांपर्यंत असू शकतो. परंतु कोर्सचा कालावधी तुम्ही घेतलेल्या कोर्सवर निर्भर असतो. जसे की जर तुम्ही डिप्लोमा कोर्स करत असेल तर हा कोर्स एक ते दोन वर्षाचा असू शकतो. जर तुम्ही बॅचलर कोर्स करत असाल तर हा कोर्स 3 ते 4 वर्षापर्यंत असू शकतो.

3. फॅशन डिझायनिंग कोर्स मध्ये काय विषय शिकवले जातात ?

खालील दिलेले काही विषयांची नावे आहेत जे की फॅशन डिझायनिंग कोर्स मध्ये सर्वसामान्य पद्धतीने शिकवले जातात.
टेक्स्टाईल वेट प्रोसेसिंग
फॅशन डिझायनिंग
एलिमेंट ऑफ फॅशन डिझाईन
पॅटर्न मेकिंग
फॅशन मार्केटिंग
बिझनेस डेव्हलपमेंट
क्वालिटी मॅनेजमेंट
फॅशन कम्युनिकेशन
ड्रॉपिंग अँड निडल क्राफ्ट
गारमेंट कन्स्ट्रक्शन
टेक्सटाइल टेस्टिंग
कल्चर कम्युनिकेशन
फॅशन पोर्टफोलिओ इत्यादी