PM Surya Ghar Yojana:- नमस्कार मित्रांनो! भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पीएम सूर्य घर मोफत वीज योजनाची सुरुवात केली आहे. ही योजना पूर्ण भारतात लागू होणार आहे. या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत भारतातील एक करोड पेक्षा अधिक लोकांनी रजिस्ट्रेशन केले आहे. या योजनेचे फायदे तुम्हाला असे मिळणार आहे की दर महिने तुमच्या वीज बिलात 300 युनिट पर्यंतची वीज ही तुम्हाला मोफत मिळेल. या योजनेचे लाभ योजना सुरू झाल्यानंतर भारतातील एक करोड घरांना मिळणार आहे.
या योजनेमध्ये केंद्र सरकार हे भारतवासीयांच्या घरांवर सोलर पॅनल इन्स्टॉल Solar Panel Install करणार आहे. योग्य पात्रतेमध्ये योजनेला अर्ज केल्यानंतर 78000 पर्यंतची सबसिडी मिळण्याची देखील सुविधा या योजनेमध्ये आहे. या ब्लॉग मध्ये आपण मोफत वीज योजना काय असते, पात्रता काय असते, आवेदन कसे करायचे, सबसिडीसाठी पात्र कसे ठरायचे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तेव्हा हा आर्टिकल PM Surya Ghar Yojana पूर्ण वाचा.
Table of Contents
प्रधानमंत्री सूर्य घर योजना काय आहे? What is PM Surya Ghar Yojana?
वर्ष 2024 मध्ये भारतामध्ये सुरू करण्यात आलेली ही एक योजना आहे. ही योजना भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली आहे. या योजनेला हिंदीमध्ये पीएम सूर्य घर मुक्त बिजली योजना pm surya ghar muft bijli yojana देखील म्हटले जाते. या योजनेच्या अंतर्गत भारतामधील एक करोड परिवारांना मोफत वीज प्रदान केल्या जाईल. ही वीज मोफत प्रदान करण्याकरिता केंद्र सरकार 1 करोड भारत वासियांच्या घरांवर रूफ टॉप सोलर Rooftop solar लावणार आहे. आपण म्हणू शकतो की ही केंद्र सरकारची एक रूफ टॉप सोलर स्कीम आहे. या योजनेअंतर्गत भारतातील असे परिवार ज्यांचे महिन्याचे वीज बिल हे 300 युनिट पेक्षा कमी आहे अश्या परिवारांच्या घरांवर रूफ स्टॉप सोलर सिस्टम लावले जाणार आहे . सोलर पॅनल करिता केंद्र सरकार सबसिडी देखील उपलब्ध करून देत आहे.
ही सबसिडी जवळपास 60% पर्यंत आहे. म्हणजे याच्या व्यतिरिक्त इतर अन्य खर्च हे स्वखर्चाने करायचे आहे. पीएम सूर्य घर योजना च्या अधिकृत वेबसाईटवर सबसिडी कशी असणार आहे याचे सबसिडी स्ट्रक्चर देण्यात आले आहे. अधिकृत वेबसाईटवर प्रदान केलेल्या माहितीनुसार प्रति किलोवॅट 30 हजार रुपये पर्यंतची सबसिडी मिळणार आहे. म्हणजेच जर तुमचे सोलर रूप टॉप सोलर पॅनल हे 3 किलोवॅट पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 78000 पर्यंतची सबसिडीचे लाभ होऊ शकेल.
पीएम सूर्य घर योजना मध्ये किती सबसिडी मिळणार ? Subsidy in PM Surya Ghar Yojana
पीएम सूर्य घर योजना मध्ये केंद्र सरकार द्वारा सबसिडी प्रदान करण्यात येणार आहे. ही सबसिडी तुमच्या रूफ टॉप सोलर सिस्टमच्या किलोवॅट प्रमाणेच्या आधारावर देण्यात येणार आहे. याबद्दलची अधिक माहिती आपल्याला खालील तक्त्यात कळेल-
The above media is taken from the PM Surya Ghar Yojana official website for reference.
वरील तक्त्यातील आपल्याला असे समजते की घर वापरीसाठी 2kw चा पावर प्लांट लावल्यानंतर आपल्याला 30 हजार रुपये पर्यंतची सबसिडी मिळू शकते. त्याचप्रमाणे 3 kwचा सोलर प्लांट लावल्यावर आपल्याला 78 हजार रुपयांची सबसिडी मिळू शकते. तसेच वरील दिलेल्या इमेज मध्ये सरासरी मासिक वीज खपत (युनिट्स) आणि त्याचप्रमाणे रूफ टॉप सोलर प्लांट कॅपॅसिटी माहिती मिळते. सोलर प्लांट लावल्यानंतर तुम्ही तुमच्या जवळ असणारे इलेक्ट्रिक बाइक किंवा इलेक्ट्रिक कार देखील चार्ज करू शकता.
प्रधानमंत्री सूर्य घर योजनाचे फायदे (Benefits of PM Surya Ghar Yojana)
- प्रधानमंत्री सूर्य घर योजनाचे एक फायदा म्हणजे असा की भारतातील प्रत्येक घरांमध्ये वीज पोहोचवणे. त्याकरिता रूफ टॉप सोलर सिस्टमचा वापर करून प्रत्येक घरामध्ये मोफत वीज पुरवू शकतो.
- त्याचप्रमाणे ऊर्जा क्षेत्रामध्ये आत्मनिर्भरता वाढण्यास मदत होईल.
- या योजनेच्या मदतीने दर महिन्याला येणाऱ्या विजेच्या बिलामध्ये कपात होण्यास मदत होईल.
- त्याचप्रमाणे पर्यावरणला स्वच्छ ठेवण्याकरिता देखील ही योजना फायदेशीर आहे.
- देशातील एक करोड गरीब आणि मध्यमवर्ग परिवारांच्या घरांच्या छतांवर रूफ टॉप सोलर लावण्यात येणार आहे. ज्यामुळे त्या घराला 24 तास वीजपुरवठा होणार आहे.
- सोबतच महिन्याला येणाऱ्या विजेच्या बिला पासून सुटकारा मिळणार आहे.
- केंद्र सरकारने सबसिडी उपलब्ध करून दिलेली आहे. 3 केजी वॉटर सोलर प्लांट लावल्यावर तुम्हाला 60% पर्यंत सबसिडी मिळू शकते.
- ज्या दिवशी हा रूफ टॉप सोलर सिस्टम तुमच्या घरांवर लागेल त्या दिवशीपासून तुमच्या घराला वीज प्रदान करण्यात येईल.
- सोलर सिस्टम 25 वर्षांपर्यंत आहे.
- भारतामध्ये ही योजना सुरू झाल्यानंतर या योजनेअंतर्गत नवीन रोजगार निर्मिती होणार. त्यामुळे भारतातील बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यास ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
प्रधानमंत्री सूर्य घर योजने करिता कोण आवेदन करू शकतात
तुम्ही देखील प्रधानमंत्री सूर्य घर योजनेचे लाभ घेण्यास इच्छुक असाल तर खालील दिलेली माहिती पूर्णपणे वाचा.
- आवेदन करणारा व्यक्ती हा भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे.
- आवेदन करणाऱ्या व्यक्तीचे वय हे 18 वर्षे पूर्ण किंवा त्यापेक्षा अधिक असणे गरजेचे आहे.
- ही योजना गरीब आणि मध्यमवर्गकरिता आहे. या योजनेमध्ये प्राथमिकता देण्यात येणार आहे.
- आवेदन करणाऱ्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे एक किंवा दीड लाखांपेक्षा जास्त नसणे गरजेचे आहे.
- आवेदन करणाऱ्या व्यक्तीजवळ सगळ्या कागदपत्रांची सत्यप्रत असणे गरजेचे आहे.
- आवेदन करणारा व्यक्ती जर गव्हर्मेंट सर्विस मध्ये असेल, तर तो या योजनेचे फायदे घेऊ शकणार नाही.
प्रधानमंत्री सूर्य घर योजना करिता अप्लाय कसे करायचे? PM Surya Ghar Yojana online apply
भारतातील नागरिकांना जर प्रधानमंत्री सूर्य घर योजनेचे लाभ घ्यायचे असेल तर त्यांनी खालील दिलेली माहिती पूर्ण वाचावी.
प्रधानमंत्री सूर्य घर योजनेचे लाभ उचलण्याकरिता सगळ्यात आगोदर अधिकृत वेबसाईटवर भेट द्यायची आहे. तुम्ही खालील दिलेल्या लिंकचा वापर करू शकता.
PM Surya Ghar Yojana official website- https://www.pmsuryaghar.gov.in/
आपण प्रधानमंत्री सूर्य घर योजना करिता ऑनलाईन आवेदन कसे करायचे त्याबद्दल जाणून घेऊ.
Step 1- प्रधानमंत्री सूर्यग्रहण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट दिल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. अधिकृत वेबसाईटवर भेट केल्यानंतर सगळ्यात अगोदर होम पेज ओपन होईल. होम पेज ओपन झाल्यानंतर आपल्या लेफ्ट साईडला अप्लाय फोर रूफ टॉप सोलर Apply for Rooftop Solar हा ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करून घ्यायचे आहे.
Step 2- त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची माहिती अचूक भरायची आहे. रजिस्ट्रेशन करण्याकरिता तुम्हाला तुमच्या राज्याची माहिती, राज्यामध्ये इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी आणि त्याचप्रमाणे तुमच्या घरी येत असलेल्या इलेक्ट्रिसिटी बिल मधून इलेक्ट्रिसिटी कंजूमर नंबर, त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी ह्या सगळ्या गोष्टींची माहिती भरून घ्यायची आहे.
Step 3- एकदा का रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला लोगिन Login वाल्या ऑप्शन वर येऊन तुम्हाला लॉगिन करून घ्यायचे आहे. त्याकरिता तुम्हाला तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर, कॅपच्या भरून लोगिन करून घ्यायचा आहे.
Step 4- रूफ टॉप सोलर करिता तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्यामध्ये अचूक माहिती भरायची आहे.
Step 5- माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करायची आहे. सबमिट बटन यावर क्लिक करायचे आहे.
After Successful Form Filling
फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला फिजिबिलिटी अप्रूवल Feasibility Approval मिळेल. त्यानंतर तुमच्या इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन Electricity Distribution च्या रजिस्टर वेंडर करून तुम्हाला तुमच्या घरच्या छतांवर सोलर प्लांट बसवून घ्यायचा आहे.
तुमच्या घरावर प्लांटचे इंस्टॉलेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला प्लांट डिटेल सबमिट करायची आहे. त्यानंतर तुम्हाला नीट मीटर साठी अप्लाय करावे लागेल.
नीट मीटर इंस्टॉलेशन आणि DISCOM द्वारा इन्स्पेक्शन झाल्यानंतर पोर्टलवर कमिशनिंग सर्टिफिकेट Commissioning Certificate जनरेट करून घ्यायचा आहे.
एकदा का तुमच्याकडे कमिशनिंग रिपोर्ट मिळाली त्याच्यानंतर तुम्ही बँक अकाउंट डिटेल, कॅन्सल चेक पोर्टलवर सबमिट करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी सबमिट केल्यानंतर 30 दिवसाच्या वर्किंग डेज मध्ये अकाउंटमध्ये सबसिडीची रक्कम जमा होऊन जाईल.
Also Read:- PM Vidya Lakshmi Yojana 2024: सरकार देत आहे विद्यार्थ्यांना बिना गॅरंटी दहा लाख रुपये | Official News
पीएम सूर्य घर योजना करिता लागणाऱ्या कागदपत्रे (Documents for PM Surya Ghar Yojana)
खालील दिलेल्या माहितीनुसार आपण पीएम सूर्य घर योजने करिता आवश्यक कागदपत्रांवर माहिती घेणार आहोत. ती आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे आहे.
- आधार कार्ड Aadhar Card
- वार्षिक उत्पन्नाचा दाखला Income Certificate
- मोबाईल नंबर Mobile Number
- पत्त्याचा पुरावा Address Proof
- ई-मेल आयडी E-mail Id
- राशन कार्ड Ration Card
- इलेक्ट्रिसिटी बिल Electricity Bill
- डोमिसाइल सर्टिफिकेट Domicile Certificate
- बँक पासबुक Bank Passbook
- पासपोर्ट साईज फोटो Passport size photo
FAQs on PM Surya Ghar Yojana
1.पीएम सूर्य घर मोफत वीज योजना काय आहे?
पीएम सूर्य घर मोफत योजना केंद्र सरकार द्वारा नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र लोकांना प्रति महिन्याला 300 युनिटपर्यंतची मोफत वीज प्रदान करण्यात येणार आहे.
2. घरांवर सोलर पॅनल लावल्यानंतर पूर्ण वर्ष समान उर्जा मिळणार का?
नाही. सौर उर्जे पासून वीज निर्मिती करिता काही आवश्यक घटक आहेत. तापमान आणि विकीरण. त्यामुळे प्रत्येक दिवशी वीज निर्मिती ही समान राहणार नाही.
3. नेट मीटरिंग काय असते?
छतावर लावण्यात येणारे सगळे सौर ऊर्जेचे पॅनल हे फक्त दिवस असतानाच वीज निर्मिती करते. नेट मीटरिंग सिस्टीम मध्ये उत्पन्न झालेल्या विजेचे उपयोग स्वतःच्या ठिकाणी केले जाते. जर तुमच्या सोलर प्लांटवर ग्रीड उपलब्ध असेल तर अतिरिक्त निर्माण झालेली वीज तुम्ही ग्रीडला निर्यात देखील करू शकता.
4.ग्रॉस मीटरिंग काय असते?
ग्रॉस मीटरिंग पद्धतीमध्ये रूफ टॉप सोलर प्लांट पासून उत्पन्न झालेल्या विजेला ग्रीडला निर्यात केले जाते. जेव्हा तुम्ही ग्रीडला निर्यात करता तेव्हा तुम्हाला DISCOM द्वारा पूर्व निर्धारित टेरिफ मिळतो.
5.केंद्र सरकारने भारतामध्ये रूफ स्टॉप सोलर प्लांट लावण्याकरिता काय लक्ष ठेवले आहे?
केंद्र सरकारने 2026 पर्यंत 40 हजार मेगावॅट रूफ टॉप सोलर विज स्थापित करण्याचे लक्ष ठेवले आहे.
6.माझ्या घरावर किती किलो वॉटचा सोलर सिस्टम लावण्यात येईल?
साधारणतः 1 केजी वोट रूफ टॉप सोलर सिस्टम लावण्याकरिता दहा ते पंधरा स्क्वेअर मीटर जागेची जरुरत पडते. त्याचप्रमाणे या जागेवर कुठलेही प्रकारची सावली येता कामा नये.
7.1kw पावर सोलर प्लांट प्रतिदिवशी किती एनर्जी जनरेट करते?
सूर्याची किरणे जर पर्याप्त असली तर एक किलोवाट सोलर पावर प्लांट हा 4 ते 5.5 युनिट्स प्रतिदिवशी जनरेट करते.
8. पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेबद्दल अधिक माहितीसाठी कुणाशी संपर्क करावा?
जर तुम्हाला पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत कुठल्याही प्रकारची माहिती पाहिजे असल्यास तुम्ही त्यांच्या अधिकृत दूरध्वनीवर फोन करून माहिती प्राप्त करू शकता.
अधिकृत फोन नंबर असा आहे- 15555