Poultry Farm Loan Subsidy Scheme : सरकार देणार सब्सिडी | Best Business in 2025

Poultry Farm Loan Subsidy Scheme- नमस्कार मित्रांनो! भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि या बदलत्या आधुनिक काळात आपला भारत देश कृषी क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस प्रगतीपथावर आहे. देशामध्ये कृषी क्षेत्रातील व्यवसायामुळे आपल्या देशामध्ये बरेच उद्योग सुरू झालेले आहेत. त्याचबरोबर कृषी क्षेत्रामध्ये सुरू झालेल्या उद्योगांमुळे नवीन रोजगार देखील झालेला आहे. अशाच कृषी संबंधित उद्योगाबद्दल आपण आज बोलणार आहोत. या उद्योगाचे नाव आहे पोल्ट्री फार्म Poultry Farm.

तुम्हीदेखील पोल्ट्री फार्मचे व्यवसाय सुरू करू इच्छिता तर हा आर्टिकल तुमच्यासाठी आहे आणि सोबतच हा उद्योग सुरू करण्यासाठी भारत सरकार एक नवीन योजना घेऊन आलेली आहे. त्या योजनेचे नाव आहेत पोल्ट्री फार्म लोन सबसिडी योजना (Poultry Farm Loan Subsidy Scheme). या योजनेअंतर्गत पात्र उमेदवाराला 30% पासून 75 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्याचे भारत सरकारने ठरवले आहे. या ब्लॉग मध्ये आपण पोल्ट्री फार्म लोन सबसिडी योजना बद्दल देखील माहिती करून घेणार आहोत.

subsidy loan for poultry farm
subsidy loan for poultry farm

पोल्ट्री फार्मचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. सरकारदेखील पोल्ट्री फार्मच्या विकासासाठी प्रजनन, पालन, प्रोसेसिंग आणि हॅचिंग अशा अनेक प्रक्रियांमध्ये निवेश करत आहे जेणे करून भारताला या क्षेत्रामध्ये उन्नती प्राप्त होणार. पोल्ट्री फार्मिंग मध्ये कुक्कुटपालन हा मुख्य रूपाने केली जाते. एका रिपोर्टच्या अनुसार जवळपास दोन करोड कृषी शेतकरी आणि 50 लाख शेतकरी हे पोल्ट्री उद्योगांमध्ये काम करत आहेत आणि त्यांच्यामुळे भारताच्या आयमध्ये 26000 ते 30,000 करोड रुपयांचे योगदान आहे.

त्यामुळे सरकार देखील या पोल्ट्री फार्म व्यवसायाला अधिक महत्त्व देत आहे. फायदेशीर दिसणाऱ्या या पोल्ट्री फार्म व्यवसायाला अधिक लोकांनी सुरू करावा म्हणून सरकारने पोल्ट्री फार्म लोन सबसिडी योजना (Poultry Farm Loan Subsidy Scheme) आणलेली आहे. जर तुम्ही देखील पोल्ट्री फार्म व्यवसाय करण्याचे मन बनवत आहात तर त्यासाठी तुम्हाला व्यवसायाबद्दल पूर्ण माहिती असणे खूप गरजेचे आहे. या आर्टिकलमध्ये आपण पोल्ट्री फार्म काय असते, पोल्ट्री फार्मचे रजिस्ट्रेशन कसे करायचे असते, सोबत सरकारने सुरू केलेल्या पोल्ट्री फार्म लोन सबसिडी योजना (Poultry Farm Loan Subsidy Scheme), तुम्ही या योजनेचे फायदा कसा घेऊ शकता, याबद्दल माहिती घेणार आहोत. तर हा ब्लॉग पूर्ण वाचा.

पोल्ट्री फार्म काय असते ? What is Poultry Farming Project ?

कुठलाही शेतकरी आपल्या शेतीसोबत जोड व्यवसाय करू इच्छितो जो की कमी खर्चामध्ये त्याची लागत असेल त्या व्यवसायातून मिळालेला मुनाफा किंवा कमाई चांगली असेल. तर तो शेतकरी पोल्ट्री फार्म Poultry Farmचा व्यवसाय सुरू करू शकतो. हा व्यवसाय तो शेतकरी तेव्हाच चालू करू शकतो जेव्हा त्याला पूर्ण माहिती असेल. या व्यवसायामध्ये तुम्हाला कुक्कुटपालन करायचे असते. साधारणतः कुकूटपालन करून मास आणि अंडा हे विकून या व्यवसायामध्ये फायदा होत असतो.

पण त्याकरिता कुठल्या गुणवत्तेचे कुकूट पालन केल्याने तुम्हाला फायदा होणार याबद्दल माहिती असणे खूप गरजेचे आहे. साधारणतः थंडीच्या दिवसात पोल्ट्री फार्मची डिमांड खूप वाढलेली असते. पोल्ट्री फार्म मध्ये मिळालेल्या मास आणि अंड्यांचा वापर हा थंडीच्या दिवसांमध्ये अधिक होत असतो. त्यामुळे सगळ्यात जास्त नफा या व्यवसायामध्ये थंडीच्या दिवसात होत असतो. परंतु वर्षाच्या 12 महिन्यात देखील आपल्या भारत देशामध्ये मास आणि अंड्यांचे सेवन केले जाते. त्यामुळे हा एक कारण आहे की पोल्ट्री फार्म बिझनेस बद्दल वर्षभर डिमांड असते.

आता जाणून घेऊ पोल्ट्री फार्म मध्ये कोणत्या प्रकारचे कुकूटपालन केल्याने व्यवसायामध्ये फायदा होणार.

साधारणतः पोल्ट्री फार्म व्यवसायामध्ये तीन प्रकारचे कुक्कुटपालन केले जाते. ज्यामध्ये देसी, ब्रॉयलर आणि लेयर अशा कुकुटचे संगोपन असते. कुकुट सोबत पोल्ट्री फार्मिंग मध्ये बदक देखील ठेवले जाते जेणेकरून या कुक्कुटपालन पासून मिळालेला नफा वाढवता येणार.

लेयर प्रकारचे कुकुट– या कुकुटमध्ये अंडी देण्याची क्षमता जास्त असते. साधारणतः चार ते पाच महिन्यानंतर ह्या जातीच्या कुकुट अंडे देण्याला सुरुवात करते आणि आयु एक वर्ष असते.

ब्रायलर– या प्रकारची कुकुट फक्त मास विकण्यासाठी पाडले जातात. दुसऱ्या प्रकारच्या कुकुटच्या तुलनेमध्ये ब्रॉयलर हे खूप लवकर वाढ घेते.

देसी कुक्कुट- देसी कुक्कुट ही सगळ्या कुकुटमध्ये श्रेष्ठ मानली जाते. हे तुम्ही अंडे आणि मास दोन्ही विकून फायदा करू शकता. या कुकुटाचे अंडे आणि मास खूप श्रेष्ठ असते. त्यामुळे याचे दर देखील जास्त असते.

पोल्ट्री फार्म लोन सबसिडी स्कीम काय आहे ? What is Subsidy Loan for Poultry Farm Scheme?

भारत सरकारने स्वयंरोजगार वाढवण्याकरिता देशातील युवाकरिता अनेक योजना सुरू केलेली आहे. अशाच एका योजनेचे नाव आहे पोल्ट्री फार्म लोन सबसिडी योजना. यामध्ये पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी सरकार तुम्हाला सबसिडी प्रदान करीत आहे.

पोल्ट्री फार्म करिता लोन कसे मिळणार ? How to get Subsidy Loan for Poultry Farm Scheme?

जर तुम्हाला कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करायचा असेल तर बँक तुम्हाला कर्ज प्रदान करत आहे. ब्रॉयलर प्लस स्कीमच्या अंतर्गत बँक तुम्हाला कर्ज प्रदान करते. कुठलाही नागरिक, शेतकरी किंवा युवा आपल्या पात्रतेनुसार त्याच्या जवळच्या बँकेमध्ये पोल्ट्री फार्म कर्जाकरिता आवेदन करू शकतो.

बँकेतून कर्ज मिळाल्यानंतर कर्जाला फेडण्याची अवधी ही पाच वर्षांपर्यंतची असते.

Animal Husbandry Website in Maharashtra for Poultry Farming
Animal Husbandry Website in Maharashtra for Poultry Farming

महाराष्ट्र राज्याची पशुसंवर्धनची अधिकृत वेबसाईट हि आहे- https://dahd.maharashtra.gov.in/

पोल्ट्री फार्म करिता लागणारी पात्रता

  • आवेदन करणारा हा भारत देशाचा मूळ निवासी असणे गरजेचे आहे. त्याचे त्याच्याकडे प्रमाणपत्र देखील असणे गरजेचे आहे.
  • आवेदन करणाऱ्या व्यक्तीजवळ त्याच्या हक्काची 1 ते 3 एकर जमीन असणे गरजेचे आहे.
  • आवेदन करणाऱ्या व्यक्तीजवळ बँकेमध्ये जमा खाते असणे गरजेचे आहे.
  • आवेदन करणाऱ्या व्यक्तीजवळ आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
  • याच सोबत आवेदन करणाऱ्या व्यक्ती जवळ असलेल्या जमिनीचे पूर्ण दस्तावेज असणे गरजेचे आहे.

पोल्ट्री फार्म व्यवसाय करण्याचे फायदे

  • वर्षभर असलेल्या मास आणि अंड्याच्या डिमांड मुळे हा व्यवसाय चांगली कमाई करतो.
  • हा व्यवसाय तुम्ही घरी किंवा शेतात सुरू करू शकता.
  • बाजारामध्ये कुकुटच्या मास आणि अंड्यांची डिमांड वाढत चाललेली आहे.
  • पोल्ट्री फार्मिंग व्यवसाय मुळे भारतामध्ये रोजगार आणि उद्योग धंदे करण्याचे नवीन साधन सुरू होत आहेत.
  • पोल्ट्री फार्म सुरू केल्यानंतर तुम्हाला सबसिडी अनुदान सरकार देत आहे.

पोल्ट्री फार्म लोन वर सबसिडी किती मिळेल

तुम्ही जर पोल्ट्री फार्म Poultry Farm उघडण्याचा निश्चय केला असेल तर पोल्ट्री फार्म उघडण्याकरिता जवळपास 4 लाख ते पाच लाख रुपयांची गरज पडते. जर तुमच्याकडे इतके पैसे नसेल तर बँक मध्ये लोनची सुविधा देखील उपलब्ध आहे. तुम्ही कुठल्याही सरकारी किंवा खाजगी बँकेतून लोन घेऊ शकता आणि आपला पोल्ट्री फार्मचा व्यवसाय सुरू करू शकता. लोन घेतल्यानंतर तुमच्या खर्चाचा 75% सबसिडी हे केंद्र सरकार तुम्हाला देईल. तुम्हाला 10 लाख रुपयाच्या कर्जावर मिळू शकेल.

Also Read- PM Aadhar Card Loan Yojana 2024: मिळणार आधार कार्डवर 2 लाख रुपयांचे पर्सनल लोन |तेही Without Guarantee | Easy Process

कर्ज व्याजदर

Poultry Farm पोल्ट्री फार्म करिता लोन घेण्यासाठी तुम्हाला प्रत्येक बँकेचे व्याजदर हे माहीत असणे आवश्यक आहे. वेगळा बँकांचे व्याजदर हे वेगवेगळे असू शकतात. उदाहरणार्थ स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्याजदर 10.75 टक्के असेल तर इतर बँकांमध्ये हा व्याजदर काही प्रमाणात कमी तर काही प्रमाणात जास्त देखील असू शकते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मिळणाऱ्या सबसिडीची रक्कम हे देखील विभागानुसार बदलू शकते. या योजनेमध्ये सर्वसाधारण गटातील नागरिकांना 25% सबसिडी मिळणार आहे. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील नागरिकांना 33 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते.

पोल्ट्री फार्मचे रजिस्ट्रेशन लायसन्स प्राप्त कसे करायचे ?

जर तुम्हाला पोल्ट्री फार्म Poultry Farmचा व्यवसाय सुरू करायचा आहे तर तुम्हाला पोल्ट्री फार्म लायसन्स असणे आवश्यक आहे.

सगळ्यात आगोदर तुम्हाला पशुपालनच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यायची आहे.

Animal Husbandry Poultry Farm Website
Animal Husbandry Poultry Farm Website

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा – https://nlm.udyamimitra.in/

वेबसाईटवर भेट दिल्यानंतर तुम्ही वेबसाईटच्या होमपेजवर येणार.

या होम पेजवर तुम्हाला पोल्ट्री फार्मच्या लिंकवर क्लिक करायचे आहे.

लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कुक्कुटपालन बद्दल संपूर्ण माहिती दिली जाणार.

सगळ्या माहितीला पूर्ण वाचल्यानंतर तुम्हाला अप्लाय ऑनलाइनच्या (Apply Online) लिंकवर क्लिक करायचे आहे.

पोल्ट्री फार्म साठी एक आवेदन फॉर्म येणार.

या फॉर्ममध्ये आवश्यक माहिती जसे की नाव, गाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर, पॅन नंबर, बँक खाता अशा अनेक माहिती न चुकता भरायची आहे.

ही माहिती भरून झाल्यानंतर सगळे दस्तावेज यांना स्कॅन करून अपलोड करून घ्यायचे आहे.

सगळे डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर तुम्हाला फॉर्मला सबमिट करायचे आहे. जर तुमचे आवेदन स्वीकारला गेला तर तुम्हाला ओरिजनल डॉक्युमेंट सोबत पशुपालन विभागामध्ये बोलावण्यात येईल. यानंतर तुम्हाला पोल्ट्री फार्मचे व्यवसाय करण्याचे लायसन्स प्राप्त होणार.

पोल्ट्री फार्म Poultry Farm लोन साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

खालील दिलेल्या माहितीनुसार आपण जाणून घेऊ की पोल्ट्री फार्म लोन सबसिडी अंतर्गत तुम्हाला आवश्यक कागदपत्रांची गरज पडणार आहे.

  • योजनाचे फॉर्म
  • जागेचे कागदपत्रे
  • आवेदन करणाऱ्या व्यक्तीचा आधार कार्ड
  • आवेदन करणाऱ्या व्यक्तीचा पॅन कार्ड
  • आवेदन करणाऱ्या व्यक्तीचे दोन पासपोर्ट साईज फोटो

पोल्ट्री फार्म Poultry Farm लोन सबसिडी योजना करिता आवेदन कसे करायचे

  • लोन घेण्यासाठी सगळ्यात अगोदर तुमच्याकडे सगळे कागदपत्रे आवश्यक असणे गरजेचे आहे.
  • तुमच्या जवळच्या कुठल्याही सरकारी किंवा खाजगी बँकला भेट द्यायची आहे.
  • बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत तुम्हाला पोल्ट्री फार्म लोन बद्दल माहिती प्राप्त करायची आहे.
  • बँकेच्या अधिकाऱ्यांना सांगायचे आहे की पोल्ट्री फार्म प्रोजेक्ट करिता किती रुपयांची गरज आहे.
  • जर तुम्ही सांगितलेल्या प्रोजेक्ट नुसार बँक तुमच्या प्रोजेक्टला मंजुरी देत असेल तर तुम्हाला लोन मिळू शकते.
  • तुमच्या खात्यामध्ये बँक द्वारा लोन रक्कम ट्रान्सफर केली जाणार.
  • अधिक जानकारी साठी तुम्ही बँकेच्या कर्मचाऱ्यांची माहिती प्राप्त करू शकता.
  • वरील दिलेली माहिती ही फक्त सर्वसाधारण आहे.

पोल्ट्री फार्म सुरू करण्याकरिता किती रुपयांची गरज पडेल

महाराष्ट्र राज्यामध्ये पोल्ट्री फार्म सुरू करण्याकरिता तुमच्याजवळ किमान दीड लाख रुपये ते 10 लाख रुपये पर्यंतची गरज पडणार. ही रक्कम तुमच्या पोल्ट्री फार्मच्या साईज वर अवलंबून राहणार. तुम्ही लावलेल्या रकमेचे उपयोग हे कुकुट घेण्याकरिता, जागेची किंमत, कुक्कुटपालन करिता लागणाऱ्या साहित्यांची सामग्री यांची किंमत, कुक्कुटपालन व्यवसायामध्ये ठेवलेल्या लोकांना पगार, कुक्कुटपालन करिता लागणारा खाद्य आणि इतर मटेरियल, त्याचप्रमाणे बिझनेस वाढवण्याकरिता मार्केटिंग आणि इतर खर्च.

या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असल्यास आपल्या मित्र परिवारात आणि नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा आणि अशाच सरकारच्या योजनेबद्दल माहिती प्राप्त करण्याकरिता आमच्या वेबसाईटला नेहमी भेट देत चला. धन्यवाद!