What is GATE Exam in 2025? आवेदन प्रक्रिया पासून कौन्सिलिंग राऊंड पर्यंतची Useful Information

What is GATE exam
What is GATE exam

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गेट GATE परीक्षाआयोजित केली गेलेली आहे. गेट 2025 GATE 2025 ची परीक्षा भारतातील आयआयटी रुरकी IIT Roorkee द्वारा केली गेली आहे. गेट ही परीक्षा विज्ञान शाखेची निगडित अभ्यासक्रम जसे की इंजीनियरिंग किंवा टेक्नॉलॉजी (Engineering/Technology) त्याचप्रमाणे आर्किटेक्चर (Architecture) अशा विविध पाठ्यक्रम मध्ये पदवीत्तर उच्च शिक्षण घेण्याकरिता प्रवेश परीक्षा म्हणून आयोजित केली आहे. या आर्टिकलच्या माध्यमातून आपण GATE 2025 ची पूर्ण माहिती घेणार आहोत. या आर्टिकल मध्ये गेट एक्झाम काय असते (what is GATE Exam), GATE 2025 ची तारीख काय असणार आहे, कुठले ब्रांचेस साठी गेट एक्झाम असते, त्यांचे सिल्याबस काय आहे आणि मागील वर्षांमध्ये निघालेला गेट या परीक्षेचे कट ऑफ मार्क्स किती असणार आहेत याबद्दल जाणून घेणार आहोत. तेव्हा आर्टिकल पूर्ण वाचा.

Gate Exam 2025
Gate Exam 2025

गेट एक्झाम काय असते? What is Gate Exam?

GATE 2025 याचे संक्षिप्त रूप Graduate Aptitude Test in Engineering असे आहे. इंजीनियरिंग तथा आर्किटेक्चर या शाखेतील अभ्यासक्रम घेणाऱ्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्याची गरज पडत असते. या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी पी एस यु PSU पब्लिक सेक्टर युनिट मध्ये सरकारी नोकरीवर कामाला लागू शकतात. त्याचप्रमाणे अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याला जर पदवीत्तर अभ्यासक्रम मास्टर्स (Masters) करण्याकरिता या परीक्षेची प्रवेश परीक्षा म्हणून याचे मार्क्स गृहीत धरल्या जाते. ही परीक्षा इंजीनियरिंग शाखेतील प्रत्येक विद्यार्थ्यांकरिता अनिवार्य आहे.

GATE 2025 ची परीक्षा आयआयटी रुडकी आयोजित करणार आहे. ही परीक्षा 1,2, 15 आणि 16 फरवरी 2025 ला ऑनलाइन परीक्षेच्या माध्यमातून आयोजित केली गेलेली आहे. आयआयटी रुडकी द्वारा GATE 2025 आवेदन पत्र भरणाऱ्या उमेदवारांना GATE 2025 च्या एप्लीकेशन फॉर्म मध्ये श्रेणी, पेपर आणि परीक्षेचे केंद्र बदलण्याची अंतिम तारीख ही 20 नोव्हेंबर होती. GATE 2025 चे पंजीकरण विलंब शुल्का सोबत हे 11 ऑक्टोंबर 2024 पर्यंत संपन्न झाले. GATE 2025 चे आवेदन प्रक्रियेची लिंक खालीलप्रमाणे आहे.

LINKhttps://gate2025.iitr.ac.in/index.html

विना विलंब शुल्क गेट रजिस्ट्रेशन करण्याची तारीख ही 03 ऑक्टोंबर होती. याच्या अगोदर आयआयटी रुडकीने बिना विलंब शुल्क GATE 2025 च्या रजिस्ट्रेशनची तारीख ही 26 सप्टेंबर ठेवली होती.

GATE 2025 करिता महत्त्वपूर्ण तारीख (GATE 2025 Exam Date)

खालील माहितीच्या माध्यमातून आपण GATE 2025 मध्ये असणाऱ्या प्रमुख तारखाबद्दल माहिती घेणार आहोत.

EVENT INFORMATIONIMPORTANT DATES
Online application started 24 AUGUST 2024
Last date of online application26 SEPTEMBER 2024
Last date of online application with Late fees11 OCTOBER 2024
Correction in Application FormUp to 20 NOVEMBER 2024
Issue of Hall ticket2 JANUARY 2025
Date of Examination1,2,15,16 FEBRUARY 2025
Answer Key FEBRUARY 2025
Result Date19 MARCH 2025
Availability of Score Card28 MARCH-31 MAY 2025
Counselling Startsfrom MARCH 2025
This table is taken from the dates issued by the official notification from exam organizing institute.These dates are liable to change.

Gate 2025 परीक्षेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट फोटो खालील दिलेल्या साईज नुसार
  • 3.5cm x 4.5cm
  • रिझोल्युशन रेंज- 240x 320 पिक्सेल , 480 x 640 पिक्सेल
  • सही काळ्या किंवा निळ्या सहीने केलेली
  • रिझोल्युशन रेंज 80 x 280 पिक्सेल , 160 x 560 पिक्सेल

गेट 2025 चे आवेदन पत्र (Application form of Gate)

प्रत्येक उमेदवाराला गेटची एप्लीकेशन फॉर्म भरण्याअगोदर खालील माहिती वाचणे आहे.

  • उमेदवार गेट 2025 चे फॉर्म गेट ऑनलाइन एप्लीकेशन प्रोसेसिंग सिस्टीम (Gate Online Application Processing System GOAPS) च्या माध्यमातून एप्लीकेशन फॉर्म भरू शकतात.
  • गेट 2025 करिता आवेदन फॉर्म हे 24 ऑगस्ट 2024 पासून अधिकृत वेबसाईटवर भरणे सुरू झाले.
  • आवेदन फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 3 ऑक्टोंबर 2024 होती.
  • लेट फीज चार्जसोबत आवेदन फॉर्म हे 11 ऑक्टोबर 2024 पर्यंत भरू शकता.
  • प्रत्येक उमेदवाराला आवेदन पत्र भरतानी खूप काळजी घ्यायची आहे. रजिस्ट्रेशन आणि वेरिफिकेशन झाल्यानंतर देखील तुम्ही माहिती मध्ये सुधार करू शकता.

Also Read:- IES Exam 2024 काय असते ? इंजिनिअरिंगची Top पोस्ट | Full information

आवेदन शुल्क (Application Fees for the exam)

गेट 2025 परीक्षेसाठी आवेदन शुल्क फक्त ऑनलाईन मोड माध्यमातून जमा केले जातील. विद्यार्थ्याला GATE 2025 ची फीज जमा करताना क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगचा उपयोग करू शकतो.

Exam Centre in IndiaApplication FeesWith Late Fees
For Women applicants900/-1400/-
For SC/ST/PwD applicants900/-1400/-
Other applicants1800/-2300/-
This table is taken from the notification issued by the official notification from exam organizing institute.

Note: GATE 2025 ची विदेशी परीक्षा केंद्रामध्ये आयोजित करण्यात येणार नाही.

GATE 2025 करिता पात्रता (GATE Exam Eligibility 2025)

खालील दिलेल्या माहितीनुसार गेट 2025 मध्ये पात्र विद्यार्थ्याची माहिती खालील प्रमाणे आहे.

Qualifying DegreeQualifying DegreeYear of AppearingYear of Qualification not Later rhen
B.E./B.Tech./B.Pharmइंजीनियरिंग/टेक्नॉलॉजी मध्ये डिग्री धारक इंजीनियरिंग आणि टेक्नॉलॉजी मध्ये 10 + 2 नंतर चार वर्ष/ तीन वर्ष बीएससी किंवा डिप्लोमा.पूर्ण किंवा वर्तमान मध्ये अंतिम वर्षात2026
B.Arch.आर्किटेक्चर मध्ये डिग्री धारक पाच वर्षाचा अभ्यासक्रम /नावेल आर्किटेक्चर चार वर्षाचा अभ्यासक्रम /प्लॅनिंग चार वर्षाचा अभ्यासक्रमपूर्ण किंवा वर्तमान मध्ये अंतिम वर्षात2027
B.Sc./B.S.विज्ञान क्षेत्रामध्ये डिग्री (पोस्ट डिप्लोमा 10 + 2 नंतर चार वर्ष)पूर्ण किंवा तिसऱ्या वर्षांत2026
D.Pharm (10+2)सहा वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये डिग्री धारक सहाव्या वर्षाच्या वेळेस इंटर्नशिप किंवा रेसिडेन्सी प्रशिक्षण युक्तवर्तमान मध्ये तिसऱ्या/ चौथ्या /पाचव्या /सहाव्या सेमिस्टर मध्ये किंवा पूर्ण2028
M.B.B.S.एमबीबीएसची डिग्री धारक किंवा अभ्यासक्रम ज्याच्यामध्ये पाचव्या /सहाव्या / सातव्या सेमिस्टर मध्ये आहेपूर्ण किंवा वर्तमान मध्ये पाचव्या /सहाव्या/ सातव्या सेमिस्टरमध्ये2026
M.Sc./M.A./M.CAविज्ञान /गणित/ सांख्यिकी/ कम्प्युटर एप्लीकेशन/ कला आणि कुठल्याही क्षेत्रात मास्टर डिग्रीपूर्ण किंवा वर्तमान मध्ये प्रथम वर्षात2026
Int. M.E./M.Tech.(Post B.Sc.)इंजिनिअरिंग/ टेक्नॉलॉजी मध्ये बीएससी इंटिग्रेटेड मास्टर डिग्री प्रोग्रॅमपूर्ण किंवा वर्तमान मध्ये दुसऱ्या/ तिसऱ्या/ चौथ्या सेमिस्टर मध्ये2027
Int. M.E./M.Tech.(Diploma/ 10 + 2)इंटिग्रेटेड मास्टर डिग्री प्रोग्राम किंवा दुहेरी डिग्री प्रोग्रॅम (पाच वर्षाचा अभ्यासक्रम)पूर्ण किंवा वर्तमान मध्ये पहिल्या/ दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षाला2028
Int. M.Sc./Int. B.S.-M.S.इंटिग्रेटेड एमएससी किंवा पाच वर्षाचे इंटिग्रेटेड बी एस – एम एस कार्यक्रम.पूर्ण किंवा वर्तमान मध्ये तिसऱ्या वर्षात2027
This table is taken from the notification issued by the official notification from exam organizing institute.

GATE 2025 ची परीक्षा पॅटर्न (Exam Pattern for GATE 2025 )

विद्यार्थी खालील दिलेल्या माहितीनुसार परीक्षेचे पॅटर्न काय आहे याबद्दल जाणून घेणार

  • परीक्षा ही ऑनलाईन मोडणे आयोजित केली जाणार आहे. त्यालाच सीबीटी CBT मोड असे म्हणतात.
  • ही परीक्षा 30 विषयांच्या पत्रांसाठी आयोजित केली जाणार आहे. यावर्षी दोन नवीन विषय नौसेना वास्तुकला आणि समुद्री इंजीनियरिंग आणि जियो मॅट्रिक्स इंजिनिअरिंग हे दोन विषय नवीन जोडण्यात आले आहे.
  • प्रश्न बहुविकल्पीय प्रश्न म्हणजेच एमसीक्यू (MCQ) येणार आहेत. एकाधिक चयन प्रश्न (MSQ)आणि संख्यात्मक उत्तर प्रकार (NAT) अशा प्रकारचे प्रश्न पाहायला मिळतील.
  • प्रत्येक पेपर दोन प्रकारच्या सत्रांमध्ये होणार एक अनिवार्य आणि एक वैकल्पिक.
  • परीक्षेचे पूर्ण अवधी तीन तासांची राहणार.
  • परीक्षा प्रश्नपत्रिका हे 100 मार्क्सचा राहणार.
  • प्रश्नपत्रिका मध्ये 65 प्रश्न राहणार.
  • एका मार्क्सच्या निगेटिव्ह उत्तराला 1/3 मार्क कापले जाणार. त्याचप्रमाणे दोन मार्काच्या उत्तराला प्रत्येक चुकीच्या उत्तराला 2/3 मार्क कापले जाणार. संख्यात्मक प्रकारच्या प्रश्नांना कुठलेही नकारात्मक मार्किंग नसणार.

GATE 2025 Test Papers

गेट 2025 हे 30 विषयांच्या पेपराकरिता आयोजित करण्यात येणार आहे. खालील तक्त्यामध्ये त्या पेपरांची आणि त्याचे कोड बद्दल माहिती दिलेली आहे. विद्यार्थीला परीक्षा एक पेपर किंवा दोन पेपर मध्ये देता येते. परंतु दोन पेपर देण्यासाठी काही कॉम्बिनेशन ठराविक ठेवलेले आहेत.

gate 2025 test papers
GATE 2025 test papers

गेट 2025 Results

गेट परीक्षेचा निकाल हा 19 March 2025 ला लागणार आहे. गेट परीक्षेचा निकाल हा ऑनलाईन पद्धतीने लागणार आहे. गेटच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लोगिन करून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता. गेट परीक्षेचा निकाल हा परीक्षेपासून तीन वर्षांपर्यंत वैद्य राहतो. या निकालाचा उपयोग विद्यार्थी नोकरी करिता किंवा PG पाठ्यक्रम करिता उपयोग करू शकतो.

GATE Exam Syllabus

​प्रत्येक ब्रांचच्या गेट परीक्षेमध्ये येणारा सिल्याबस हा त्याच्या information Brochure मध्ये दिलेला आहे. ते डाऊनलोड करण्याकरिता येथे क्लिक करा.

Click Here to download GATE Exam Syllabus

गेट 2025 एक्झाम क्रॅक करण्याची नीती (Preparation Tips to crack exam)

प्रत्येक उमेदवाराचा स्वप्न असते की त्यांनी गेटची परीक्षा चांगल्या मार्कांनी क्रॅक करावे. म्हणून खालील दिलेल्या टिप्स तुम्हाला तुमच्या अभ्यासात उपयोगी पडणार आहेत.

  • सगळ्यात अगोदर गेट 2025 मध्ये विचारल्या येणाऱ्या पूर्ण सिल्याबस कम्प्लीट करणे. त्याच बरोबर परीक्षा पॅटर्न काय असणार याची पूर्ण माहिती घेणे.
  • एक योजना आखणे की आपल्याला कुठल्या वेळेस कुठला अभ्यास करायचा आहे. कठीण असणारे विषय सगळ्यात अगोदर अभ्यासाला घ्या आणि आखलेल्या योजनेचे नियमित पालन करा.
  • प्रख्यात प्रसिद्ध असलेले पुस्तक गेटच्या परीक्षे करिता वाचा.
  • त्याचप्रमाणे अभ्यास केल्यानंतर तुमच्या अभ्यास कुठपर्यंत पोहोचला आहे याचे आकलन करण्यासाठी मॉक परीक्षा द्या.
  • रिविजनला भर द्या आणि वेळोवेळी त्याचे पालन करा.
  • मागील 10 ते 15 वर्षांचे विचारलेल्या प्रश्नांना सोडवा.
  • सेंटर वर जाऊन ऑनलाइन मॉक टेस्ट द्या.
  • तब्येतीची काळजी घ्या.
  • पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे.

FAQs on Gate 2025 Exam

1.गेट 2025 बद्दल अडचणी आल्यास / अतिरिक्त माहिती पाहिजे असल्यास संपर्क करावे?

खालील दिलेल्या माहितीनुसार तुम्ही गेट 2025 संबंधित कुठल्याही प्रश्नांची उत्तरे घेऊ शकता. अधिकृत नंबर- 01332 284531

सकाळी 9:30 वाजता पासून दुपारी एक पर्यंत आणि दुपारी दोन पासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार). खालील दिलेल्या ईमेल आयडी वर देखील तुम्ही संपर्क साधू शकता- helpdesk.gate@iitr.ac.in

2.गेट ची परीक्षा ही कठीण असते का?

होय. गेटची परीक्षा खूप कठीण असते. या परीक्षेकरिता प्रश्नांची निवड हे भारतातील आयआयटी कॉलेजेस मधून केली जाते. त्याकरिता विद्यार्थ्याला या परीक्षेचे सखोल अभ्यास असणे गरजेचे आहे.

3.मी बीए /बीकॉम/ बीएससीच्या तिसऱ्या वर्गाला शिकत आहे. मी गेट 2025 ची परीक्षा देऊ शकते का?

होय. पदवी अभ्यासक्रमात असणारा विद्यार्थी जो की तिसऱ्या वर्षात आहे किंवा तिसऱ्या पेक्षा जास्त वर्षामध्ये आहे ,कुठल्याही सरकार मान्यताप्राप्त कॉलेजेस मध्ये शिकत आहे तो गेट 2025 ची परीक्षा देऊ शकतो.

4.गेट परीक्षा देण्याकरिता कुठलीही वयोमर्यादा आहे का?

नाही. गेट परीक्षा देण्याकरता कुठलीही वयोमर्यादा नाही.

5.गेट परीक्षा किती अटेम्प्ट मध्ये देता येते?

गेटची विद्यार्थी परीक्षा कितीही वेळा देऊ शकते.

6.गेटच्या परीक्षे करिता ऑनलाइन एप्लीकेशन कसे करायचे.

या संकेतस्थळाला भेट द्या- https://gate2025.iitr.ac.in/index.html